तुमचं शिक्षण, वाचन, विचार या प्रक्रीयेला सुरुवात होण्याच्याही अगोदरच्या वयातल्या, बालपणातल्या गोष्टी त्यांच्या रंग, रूप, नाद, स्पर्श अशा शब्दांव्यतीरीक्त बाबींनी स्मरणात राहतात. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक माझ्या आयुष्यात अशाच बालवयात शब्दांच्या आधी, त्या शब्दांच्या अर्थाच्या आधी त्यातील नाद, रंग, रूप, हालचाली, आवाज या स्वरुपात आलं.
आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मोठा कार्यक्रम करायचं ठरलं. सांस्कृतिक कार्यक्रम, खूप सार्या स्पर्धा, बक्षीससमारंभ, सत्कार समारंभ, जेवणावळ- असा एकंदर भरगच्च थाटमाटच उडवून द्यायचं ठरलं. शिक्षकांपासून मुलांपर्यंत एकच लगबग सुरू झाली. साफसफाई सुरू झाली. तुटक्या फरशा, टेबलं, बाकडी, कपाटं असं कितीतरी सामान रद्दीत जाऊन नवंकोरं आलं. शाळेची रंगरंगोटी सुरू झाली. जिकडे तिकडे चित्रं आणि सुभाषितं रंगवताना आमच्या ड्रॉईंग मास्तरांना, म्हणजे शिरापूरी सरांना वेळ कमी पडू लागला. फुलझाडांचे नवीन वाफे तयार झाले आणि बागकामाची माती वाहून वाहून आमच्या माळीकाकांची कंबर गेली.
Submitted by सीमंतिनी on 12 September, 2021 - 22:41
स्त्रियांचे आरोग्य हवामानाशी निगडीत आहे ही बाब हल्ली प्रकर्षाने जाणवत आहे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.