मायबोली गणेशोत्सव २०२१

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ७ - चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी

Submitted by संयोजक on 17 September, 2021 - 10:24

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी'.

हस्तकला स्पर्धा- मोठा गट - भेटकार्ड बनवणे - धनुडी

Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 06:56

IMG_20180107_231948078.jpg

2)
IMG_20180108_004502260.jpg

3) एन्व्हलप

IMG_20180107_231852611.jpg

विषय: 

शशक पूर्ण करा २ - गारुडीण- सामो

Submitted by सामो on 17 September, 2021 - 03:42

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचे स्वातंत्र्य . अजुन काय हवे वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं - आभाळात उपडी चांदणपरडी , दरीत असंख्य मिणमिणते खोपोलीचे दिवे. कार्ला गडावर कीर्र काळोखाचं राज्य. अष्टमीची रात्र. गडावर जंगली श्वापदांचे राज्य, भणाणणारा वारा. आणि आईची प्रसन्न छबी स्मरून, तिला आठवले विष्णुदासांचे स्तोत्र -

विषय: 

शशक पूर्ण करा २ - डायरेक्टरस् कट- धनुडी

Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 02:28

"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ... "

कट कट, संज्योत लक्ष कुठे आहे? तू काय तुलाच कान गोष्टी सांगतेयस का? आवाज कसा लावत्येस? आणि काय म्हणे पुरूषोत्तम करंडक मिळवलाय? अजून हवेतच आहात, जमीनीवर या माझ्याकडे फाजील लाड चालणार नाहीत. आधीच्या कामांचे गोडवे किती दिवस गाणार. नवीन काही तरी द्या जगाला आणि हो उद्या पासून शार्प दहाला हजर पाहिजे. साधा कॉल टाईम सांभाळता येत नाही? जमत नसेल तर तसं सांग, हा डायलॉग खराच करू , जा परत एकटी घरी.......

विषय: 

शशक पूर्ण करा - शूर - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 17 September, 2021 - 02:03

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो आणि ’ईssssssss' किंचाळत आम्ही सारे पसार होतो. पिंट्या कपाटावर चढून बसतो, मनी खिडकीच्या गजांना लटकते आणि मी थेट घराबाहेरच धावते!
पण बाथरूम मधून बाहेर पडलेल्या बाबांच्या चेहर्यावर विजयी भाव! युद्धातल्या शूरासारखं ते प्लास्टिकच्या पिशवीतला मेलेला उंदीर हातात उंच धरून सगळ्यांना दाखवतात आणि आम्ही सारे पुन्हा जमिनीवर येतो. बाबा किती शूर!

माझ्या आठवणीतली मायबोली- फारएण्ड

Submitted by फारएण्ड on 17 September, 2021 - 01:54

गणपती बाप्पा मोरया!

यावेळच्या उपक्रमातील इतरांनी लिहीलेल्या आठवणी वाचून मलाही माझी माबोवरची गेली १६ वर्षे बरीचशी आठवली.

मी मायबोलीवर आलो ते २००५ साली. इथे अमेरिकेत येउन ४-५ वर्षे झालेली होती. मराठी वाचायला मिळणे खूप अवघड होते. सकाळ, केसरी वगैरेंच्या साइट्स सुरू झाल्या होत्या पण त्यातही खूप वाचनीय फारसे नसे. इथले मित्रमंडळ बरेचसे अमराठी होते आणि जे मराठी होते त्यांच्याशीही गप्पांचे विषय सहसा वेगळे असत. मराठी वाचणे, मराठीतून आवडीच्या विषयांवर गप्पा, चर्चा या बाबतीत काहीतरी मिसिंग आहे असे सतत वाटायचे.

विषय: 

शशक पूर्ण करा... जीवन प्रवाही असतं... दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 September, 2021 - 01:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. एकाएकी पडलेल्या विजेरीचा प्रकाशझोत असह्य झाल्याने तो डोळे मिटतो. शुध्दीवर आल्यावर स्वत:लाच विचारतो.
“मी इथे इस्पितळात कसा. मी पुरात वाहात होतो. गाव वाहून जात होता”
बाजूला उभी असलेली नर्स त्याला सांगते
“तुम्ही वाचलात. एनडीआर‌एफच्या टीमने तुम्हाला इथे बेशुद्ध अवस्थेत आणले”
त्याने हात जोडून विचारले माझे कुटुंबिय, गाववाले कोणी वाचले का?
“माहित नाही. तुम्हाला वाचवू शकलो. तेही वाचतील धीर धरा.”

शशक पूर्ण करा- कथा आरंभ-२

Submitted by संयोजक on 17 September, 2021 - 00:58

गणेशोत्सव तर सरत आलाय परंतु लेखणी थांबू नये आणि बुद्धीला अजून चालना मिळावी म्हणून आम्ही शशक पूर्ण करण्यासाठी अजून एक थोडी वेगळी सुरुवात देत आहोत. धाग्याचे शीर्षक शशक पूर्ण करा -२ - कथेचे नाव - मायबोली आयडी असे देऊन कथा पूर्ण करा.

"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."

यापुढे कथा तुम्ही पूर्ण करा.

विषय: 

तुंदिलतनू तरि..

Submitted by साजिरा on 16 September, 2021 - 23:45

आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मोठा कार्यक्रम करायचं ठरलं. सांस्कृतिक कार्यक्रम, खूप सार्‍या स्पर्धा, बक्षीससमारंभ, सत्कार समारंभ, जेवणावळ- असा एकंदर भरगच्च थाटमाटच उडवून द्यायचं ठरलं. शिक्षकांपासून मुलांपर्यंत एकच लगबग सुरू झाली. साफसफाई सुरू झाली. तुटक्या फरशा, टेबलं, बाकडी, कपाटं असं कितीतरी सामान रद्दीत जाऊन नवंकोरं आलं. शाळेची रंगरंगोटी सुरू झाली. जिकडे तिकडे चित्रं आणि सुभाषितं रंगवताना आमच्या ड्रॉईंग मास्तरांना, म्हणजे शिरापूरी सरांना वेळ कमी पडू लागला. फुलझाडांचे नवीन वाफे तयार झाले आणि बागकामाची माती वाहून वाहून आमच्या माळीकाकांची कंबर गेली.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२१