प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ७ - चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी

Submitted by संयोजक on 17 September, 2021 - 10:24

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी'.

चहा/कॉफी -बिस्कीट/टोस्ट जोडी

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

आवडता विषय Happy

हा घ्या झब्बू... होममेड अवॉकॅडो टोस्ट आणि चहा!

IMG_9638.JPG

वाह पातळ पोह्यांचा चिवडा. चालेल की. आणि गोरा गोरा दुधाचा चहाही मस्त दिसतोय. मी उठते आता आल्याचा चहा करुन फोटो टाकते.

त्रिकुट!!!
फॅट फ्री दुधाचा , सावळा चहा गोड मानुन घेणे.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUKmIgkGd7V9D_YOFpI-bH4RSrRlbT2b7MIiQmfsymgi6Aj8HZNAZCcs8jOmTHzvUCM9FLXAe2xOk-yTx6LPzQ_tSKlRFcGyT_WInvfGGNETj-WgZ_bwUyMpBMZZDNNeCgtl71EGksPRbuhGj8KMwdIDg=w881-h661-no?authuser=0

IMG_6930.JPG
चहा अणि पकोडे - अजून एक सुपरहिट कॉम्बो Happy

चहा आणि केक टोस्ट घरी केलेला
8E79B69E-411B-42D1-9ED9-3F40AE096CE1.jpeg

मागे दुसर्‍या धाग्यावर टाकलेला फोटो..
नवीन फोटो टाकणे अवघड आहे.. खाजगी जागा फुल्ल झाली येतेय. कोणाकडे काही आयड्या अश्यावेळी काय करायचे?

1625605011868.jpg

हो सामो, फोटो अपलोड करायची खाजगी जागा फुल्ल झाली. म्हणून मग मागचाच फोटो टाकला. नाहीतर ताजा ताजा काढून टाकला असता. कारण आताही मी सेम त्याच जागी, त्यात डेस्कवर, तोच लॅपटॉप घेत, त्याच कपात, फक्त कॉफीच्या जागी चहा घेऊन आणि ऋन्मेषच्या जागी अभिषेकमधून लॉगिन करून बसलो आहे. दर रात्रीचा दिनक्रम आहे हा आपला Happy

सहीच चहा आहेत सगळे.
पाव मस्त दिसताएय स्वस्ति
क्रिमरोल एकदम मस्त,मला पकोडे पण पाहिजेत.

भारी फोटो आहे स्वस्ति.. एक कप ऊचलून पार्टीत सामील व्हावेसे वाटले

कोकणातल्या चहा बिस्कीटचाही आवडला.. चहा घेऊन असे बाल्कनीच्या कट्ट्यावर वा टेरेसवर जाणे फार आवडते..

Pages