शशक पूर्ण करा २ - डायरेक्टरस् कट- धनुडी

Submitted by धनुडी on 17 September, 2021 - 02:28

"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ... "

कट कट, संज्योत लक्ष कुठे आहे? तू काय तुलाच कान गोष्टी सांगतेयस का? आवाज कसा लावत्येस? आणि काय म्हणे पुरूषोत्तम करंडक मिळवलाय? अजून हवेतच आहात, जमीनीवर या माझ्याकडे फाजील लाड चालणार नाहीत. आधीच्या कामांचे गोडवे किती दिवस गाणार. नवीन काही तरी द्या जगाला आणि हो उद्या पासून शार्प दहाला हजर पाहिजे. साधा कॉल टाईम सांभाळता येत नाही? जमत नसेल तर तसं सांग, हा डायलॉग खराच करू , जा परत एकटी घरी.......

चला चला बाकीच्यांनी पोझिशन घ्या. संज्योत तुला कोण दिसलय ते चेहऱ्यावर दाखवायचय......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

चांगली लिहिलीएस.
नाही नाही म्हणत तीन शशक लिहल्यास कि..मस्त मस्त.

छान

छान

छान.

मंजूताई, मोहीनी, सामो, मृ, कवे, माऊमय्या, अमितव, मानव, बिपीनसांगळे, वंदना सर्वांचे आभार.
मृ बघ ना, नाही नाही म्हणायचंच कशाला? Lol