गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचे स्वातंत्र्य . अजुन काय हवे वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि तिला ते दृष्य दिसलं - आभाळात उपडी चांदणपरडी , दरीत असंख्य मिणमिणते खोपोलीचे दिवे. कार्ला गडावर कीर्र काळोखाचं राज्य. अष्टमीची रात्र. गडावर जंगली श्वापदांचे राज्य, भणाणणारा वारा. आणि आईची प्रसन्न छबी स्मरून, तिला आठवले विष्णुदासांचे स्तोत्र -
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला||
.
आदि मध्य - आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला||
- ११० शब्द
-------------------------------------------------------------------- कथा #२ - दुसरी एक गारुडीण--------------------------------------------------
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचे स्वातंत्र्य . अजुन काय हवे वाटत असतानाच तिचे समोर लक्ष गेलं आणि तिला कारच्या स्टिअरिंग व्हीलच्या मागुन, ती सुंदरी डोकावताना दिसली. काळीशार, गटाण्या, खुनशी डोळ्यांची, शेपटी तुटलेली. रोखलेल्या, जरबेच्या नजरेने तिच्याकडेच बघत नजरकैद करणारी, गारुडीण. मध्यरात्र, घाटाचा चिंचोळा रस्ता, कुठे म्हणुन सुरक्षितपणे थांबायची सोय नाही. बाजूस खोल दरी, जराशा चुकीला शिक्षा मृत्युचीच.
मागे गाणे वाजत होते -
'डोळे हे जुल्मी गडे , रोखुनि मज पाहु नका,
जादूगिरी त्यात पुरी, येथे उभे राहू नका'
आणि सुंदरी, झेप घेण्याच्या आवेशात चुकचुकू लागली 'चुक चुक चुक चुक - चूक चूक चूक चूक'
शब्दसंख्या- ९८
छान आहे.स्तोत्र तर सुरेख आहे.
छान आहे.स्तोत्र तर सुरेख आहे.
धन्यवाद देवकी. खूप आभार.
धन्यवाद देवकी. खूप आभार.
अगं १२ कडवी आहेत मूळात. खापरेवरती बरीच आहेत. त्यांची फार सुंदर असतात स्तोत्रं. त्यांची खासियत ही की - एकच शब्द २ प्रकारे वापरायचा. उदा -
एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें, घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
.
हे सुधाकरासी देति, पुष्टी श्लोक आकरा । कोण या नको म्हणेल, पुण्यश्लोक 'आ' करा
.
तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी ,विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
.
काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी, काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
--------------------------------------------------------------
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥
तारिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात कीं
हेचि पाय हांसतील कौतुकें तुला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥२॥
एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीनं कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥३॥
मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघें तुझेंचि कृत्य हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके तुला ॥४॥
तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
नित्य मार शत्रुहातिं मारवीसि कां मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके ! तुला ॥५॥
जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मीं तसा कधीं न कांहिं बाइ ! कापिला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥६॥
रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना
ती उनाड सांगतीस आटपावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥७॥
ओढती न पेरुं देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम - क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ रखितेस हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥८॥
काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी
काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥९॥
काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वतीं
काय घातलासि हा अनाथ देह कर्वतीं
काय लोटलेंसि घोर दुःखसागरीं मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१०॥
काय लीहिलेंसि दैविं गर्भवास सोसणें
काय दीधलेंसि जन्म - मृत्युलागिं पोसणें
काय लाविलेंस नित्य तोंड वासणें मला
हें विहीत काय, सांग माय रेणुके ! तुला ॥११॥
आदि मध्य - आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला ॥१२॥
बापरे सामो! काय अफाट वाचन आहे
बापरे सामो! काय अफाट वाचन आहे ग तुझे!.
एकच शब्द २ प्रकारे वापरायचा. >>>> हे आवडले.
फक्त वाचन असतं तर विसरले असते
फक्त वाचन असतं तर विसरले असते गं. पण मी मला आवडलेल्या वाचनाचा संचय करते. एक प्रायव्हेट ब्लॉग आहे जिथे ही स्तोत्रे टिपून आणि वेचून ठेवलेली आहेत. कॉपीराईट वगैरे भानगडी नकोत म्हणुन खाजगी ठेवल आहे. पण बरेचदा तिथे जाउन वाचत बसते.
दुसरी कथा अॅडवलेली आहे.
दुसरी कथा अॅडवलेली आहे.
माझी दुसरी कथा नक्की मिसलेली
माझी दुसरी कथा नक्की मिसलेली आहे त्यामुळे वर काढते आहे.
चामर वृत्त गुगल
चामर वृत्त
गुगल
ब्लॅककॅट चामर वृत्त?
ब्लॅककॅट चामर वृत्त? अच्छा स्तोत्र? ओके ओके.
बापरे सामो! काय अफाट वाचन आहे
बापरे सामो! काय अफाट वाचन आहे ग तुझे!.
एकच शब्द २ प्रकारे वापरायचा. >>>> हे आवडले.
Submitted by देवकी on 17 September, 2021 - 08:23
सामो
अजून वेगळी काय पावती हवी ?
तुम्ही मला एका टोचणी या शशकला प्रतिक्रिया देताना , तुमचं वाचन कमी आहे असं म्हणलं आहे . तुमचं ते विधान अमान्य .
खूप शुभेच्छा !
>>बापरे सामो! काय अफाट वाचन
>>बापरे सामो! काय अफाट वाचन आहे ग तुझे!.<<
न जाणो कधी समोर भेटलीस तर माझा साष्टांग दंडवत तिथेच!!!!
सर्वांचे आभार. आता खापरे इथे
सर्वांचे आभार. आता खापरे इथे जुन्या ग्रंथांचे इतके भांडार आहे की वेगळं काही शोधावंच लागत नाही. त्यामुळे विशेष कष्ट्साध्य असा हा छंद राहीलेला नाही.
तरी सर्वांचे मनापासून आभार.