शशक पूर्ण करा... जीवन प्रवाही असतं... दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 September, 2021 - 01:13

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. एकाएकी पडलेल्या विजेरीचा प्रकाशझोत असह्य झाल्याने तो डोळे मिटतो. शुध्दीवर आल्यावर स्वत:लाच विचारतो.
“मी इथे इस्पितळात कसा. मी पुरात वाहात होतो. गाव वाहून जात होता”
बाजूला उभी असलेली नर्स त्याला सांगते
“तुम्ही वाचलात. एनडीआर‌एफच्या टीमने तुम्हाला इथे बेशुद्ध अवस्थेत आणले”
त्याने हात जोडून विचारले माझे कुटुंबिय, गाववाले कोणी वाचले का?
“माहित नाही. तुम्हाला वाचवू शकलो. तेही वाचतील धीर धरा.”
“धीर कशाला सोडू? पुन्हा नव्याने आयुष्य जगायचंय. जीवन प्रवाही असतं. राम-कृष्णही आले; गेले ! त्याविण जग का ओसचि पडलें?”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार सर
प्रथम प्रतिसाद... खूप धन्यवाद.

छान

वाह!

चौथा कोनाडा,
अस्मिता
खूप धन्यवाद....