अभ्यास केला पण भोकात गेला
शिकून काय झाले
मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही
ओझे तसेच राहिले
लहानपणी मी खिडकीतून
मुले खेळताना बघितली
हाती पुस्तक धरूनही
वीतभर फाटत राहिली
साहेब साहेब करूनहि माझे
कल्याण नाही झाले
पुस्तक माथी मारूनही
माझे बालपण हरवले
आज छकुला निरागसपणे
अहोरात्र खेळत राहतो
मी मात्र इथं कामावरती
दिवसभर चोळत राहतो
चोळण्यासाठी जन्म नव्हे हा
हे कळतेय मजला आज
स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी
अंगी असावा लागतो माज
कसं पटवावं पोरीला ?
शोधत होतो लवगुरु
अथक प्रयत्नांनी एक मिळाला
ज्याची लफडी होती सुरु
माग काढुनी भेट घेतली
पण वाटला तो थकलेला
प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी
असेल कदाचित पिकलेला
मी पण होतो आसुसलेलो
एक पोरगी पटवण्यासाठी
सांगेल ते मी करणार होतो
माझ्या मधल्या काठीपोटी
पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो
मलापण प्रेम करायचंय
तुमच्यावानी रुबाबात पार
पोरींना घेऊन फिरायचंय
ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान
जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण
सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही.
चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार?
बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगत असतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो, " मृत्यूने पायात पैंजणं घातली आहेत, सध्या ती शेताच्या
बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा
आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैं जणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."
धाग्याचं शीर्षक स्पष्ट आहे. अनेकांना वाचण्याची लिहिण्याची हौस असते. मी जेव्हा जॉब करायला सुरवात केली त्यावेळी माझा एक रूम पार्टनर होता त्याला लिहिण्याची हौस होती. त्याने लिहिलेले एक दोन लेख मी वाचले. खूपच सुमार दर्जाचे होते. पण मी त्याच्या तोंडावर छान आहे मस्त लिहिलंय असच बोलत असे, किंबहुना तसं बोलायला लागत असे. तो ते लेख कंपनीतल्या काही लोकांना पण वाचायला देत असे ते लोकंसुद्धा त्याच्या तोंडावर वाहवा करत असत पण पाठ फिरली कि हाणत असत. तर त्यावेळी तो लेख सोशल मीडियावर टाकत नसे. समजा जर त्याने ते सोशल मोडियावर टाकले असते तर लोकांनी चांगलंच फटकारलं असतं.
आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.
हे नीले गगन के तले धरती का प्यार पले
ऐसे ही जग में आती हैं सुबहें ऐसे ही शाम ढले
तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूं
आणि
किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है
परस्तिश की तमन्ना है, इबादत का इरादा है
मोबाईलची बॅटरी शून्य होते. मी तो चार्जरला जोडतो. तासा दोन तासाने फोनची आठवण होते. पाहतो तर मोबाईल अजूनही झोपलेलाच. काय तर चार्जर नुसताच लावलेला असतो. बटण चालूच केले नसते. त्यासोबत बटणही चालू करावे लागते हा बालिश कॉमनसेन्स माझ्याकडे असूनही मी दहा पैकी तब्बल सहा वेळा हे विसरतोच.