मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" . मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात. आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ शर्ट आणि करडा टाय होता. करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची. मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही. हे कारण असेल.
पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज स्नान करायचो. अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात.
लहानपणीचा काळ त्या वेळी जरा सुद्धा सुखाचा वाटत नाही. पण आता ते दिवस आठवले की पुन्हा एकदा नव्याने बालपण यावे असे वाटते.
ट्विटर वर एका सहा वर्ष वयाच्या मुलाचे टाईम टेबल प्रचंड व्हायरल झाले आहे. ते वाचून लोकांना हसू आवरत नसले तरी त्या मुलाने ते सिरीयसली बनवले आहे.
तुम्ही असे टाईम टेबल बनवले होते का? त्या वेळी कुणी बनवले असेल तर अभिनंदन!!
पण जर नसेल बनवले तर त्या वेळी तुमचा दिनक्रम ( अलिखित टाईम टेबल) काय असायचा हे आठवते का?
आठवून पहा.
काही लोक वाचनाची अजिबात आवड नसलेले तर काही वाचनाशिवाय जगूच न शकणारे. पैकी मी या स्पेक्ट्रममध्ये कुठे तरी पडते. पुस्तकवेडी आहे मी. लहानपणीच्या माझ्या आठवणी म्हणजे - वाचनात गढलेल्या, आई किंवा बाबांच्या शेजारी पडून त्यांचे नीरीक्षण करणे. मासिकांत तर चित्र नाहीत मग ही मोठी मंडळी पान का उलटत नाहीत - हा प्रश्न मला पडलेला लख्ख आठवतो. पुढे अक्षरांशी ओळख झाल्यानंतर, अक्षरक्षः दुकानावरच्या पाट्यांपासून ते भेळेच्या कागदापर्यंत सर्वाहारी वाचक अशी मी अमेरीकेत येउन हरवुन गेले होते. काही काळ मराठी वाचनापासून वंचित राहील्याने कठीण गेला. त्यातून मग मराठी संस्थळे सापडत गेली.
वेल, मायबोली वरचा माझा मागचा धागा... आणि आज अल्मोस्ट झालेला महिना.
खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मानसिक आधार दिला, त्याची भरपाई नाही करू शकत...
माझी एक मैत्रीण मला कायम म्हणते...
तू खूप अवघड आहेस.
वेल, हे काही अंशी खरं आहे.
मी अवघड आहे, आणि अती महत्वाकांक्षी सुद्धा...
मी प्रयत्न करतो, करतच राहतो... आणि अजिबात प्रयत्न सोडत नाही...
आणि त्या प्रयत्नांनीच बऱ्याचदा घात होतो...
पण एक आहे, घात झाला तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडायचं नसतं...
सो...
आज अजून काहीतरी सांगतो...
एक महिना झाला, मी धागा काढून... आणि आज काही बदललं आहे?
पुस्तके आवरायल घेतल की नैराश्य येत. काय ठेवायच काय नाही हे ठरवताच येत नाही . ज्योतिषातील अनेक दुर्मिळ पुस्तके, अंधश्रद्धा, तत्वज्ञान, मानसशास्त्र समाजशास्स्त्र ,अध्यात्म, विज्ञान, अशा विषयांवरील विविध पुस्तके त्या त्यावेळी घेतली होती. कधी वाटत आता बास झाल घालून टाकाव रद्दीत पण धाडस होत नाही. किती भूतकाळ उराशी बाळगायचा? पत्रव्यवहार कात्रणॆ हस्तलिखिते लेख यांच्या फाईली किती कवटाळायच्या. दर वेळी आवरायला घेतो व धाडस होत नाही. याला कचरा म्हणवत नाही. तरी महत्वाचा भाग ई ग्रंथालायांवर अपलोड करुन ठेवला आहे आपण गचकलो तरी तो जालसागरात उपलब्ध असेलच.
"तुझ्यासोबत प्रेमाच्या ह्या काटेरी रस्त्याने अनवाणी पावलांनी चालण्याची माझी तयारी आहे. मग मी रक्तबंबाळ झाले तरी पर्वा नाही..!"
अशा आवेशात नायिका व्यक्त होतेय.
तो एक ऊन्हाळी दिवस होता. आकाशात चिटपाखरूही दिसत नव्हतं. माणिकराव आज सकाळीच घरातून बाहेर पडले होते. झपाट्याने पावलं टाकत ते सासुरवाडीला निघाले होते. रणरणत्या उन्हामुळे त्यांचा जीव कासावीस झाला होता. म्हणून एका झाडाची सावली बघून ते घडीभर बसले. तंबाखूची चंची सोडली. गोळी दाढेखाली धरली. थोडा दम खाऊन पुन्हा चालू लागले. दिवस मावळतीला आला तेव्हा ते पिंपळगावी पोचले.
"सुमेss पावनं आलं बग" माणिकरावांना बघताच पारूआत्यांनी लेकीला हाळी दिली. आणि सुमाताई डोक्यावरून पदर घेत खुदकन लाजल्या.
(मी मार्गींचा ‘आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस’ हा धागा अगदीच correlate करू शकतो. खर तर त्यावर प्रतिसाद लिहायला गेलो पण तो जरा लांबला. त्यामुळे स्वतंत्र लेखच झाला).
✪ प्रखरता नव्हे शीतलता
✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी
✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर
✪ "छांदसी आणि सुमित्रा"
✪ पतझड़ है कुछ, है ना?
✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो?
✪ मै अहम हूँ यही वहम था
मित्रांनो, Personality Development साठी खास लेख लिहीत आहे. जरूर वाचा. जर काही शंका असेल तर जरूर विचारा. कौतुक करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. काही चुकभूल झाल्यास मात्र प्रेमाने कान पिळण्यासही विसरू नका.