पारंपारिक लग्नात मंगळसूत्र, टिकली हे बायकांनाच का ?

Submitted by गारंबीचा शारूक on 25 January, 2022 - 02:41

माझ्या एका मोठ्या मित्राकडे पूजा होती. तेव्हां तो यजमान होता आणि त्याची कायद्याने असलेली धर्मपत्नी नुसते हाताला हात लाऊन मम म्हणत होती. हे चित्र खूप ठिकाणी पाहिले आहे. आमच्या घरावर त्यामुळेच मी हट्टाने आईच्या नावाची पाटी लावून घेतली होती.

माझ्या त्या मित्रानेही आरतीचे ताट न फिरवता त्याच्या पत्नीला सांगितले की तूच कर पुढचे सगळे. मी मम म्हणतो. मला त्याचा अभिमान वाटला. स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा मारण्यापेक्षा करून दाखवण्यात माझ्यासारखाच त्याचाही विश्वास आहे.

हे आठवायचे कारण म्हणजे सध्याच्या गर्लफ्रेण्डने लग्नासाठी पिच्छा पुरवला आहे. मला लग्न म्हणजे वेड्यांचा बाजार वाटतो. कुणी तरी कुणावर हक्क गाजवणे ही कल्पनाच गुहायुगीन आहे. गुहेत तरी एक स्त्री असायची आणि ती पुरूष पाळायची. तिच्या हाताखाली पुरूष नेमून दिलेली कामे करत. हे चित्र युद्धाची अवजारे आल्यावर बदलले. मला त्या इतिहासाचे पोस्टमार्टेम करायचे नाही. जे चालले आहे त्यात जे चूक आहे ते लहानपणापासून जाणवते तर ते तिथेच सांगायचे हा माझा स्वभाव आहे. नाहीतर मग ते अंगवळणी पडते. तसे ते पडू द्यायचे नाही.

गर्लफ्रेण्डला तसे सांगितले तर ती म्हणाली तू लग्नाला टाळाटाळ करतोस का ? तर मी तिला म्हणालो की आपण एकत्र राहूयात. पण लग्न नको करायला. माझ्या मित्रांचे लग्नाचे अनुभव सगळेच चांगले नाहीत. काही काही मित्र तर लग्न झाल्यावर परवानगीशिवाय भटकायला येत नाहीत. काही तर बायकोचे गुलाम झाले आहेत. तसेच बायका पण गुलाम होतात. पण हे झाले ऐच्छिक. लग्नात बायकांना रूढी, परंपरा आणी धार्मिक बंधनांनी जखडून टाकले जाते तसे पुरूषांना मोकळे सोडले जाते. बायकांना कपाळाला कुंकू, नाकात नथणी, कानात डूल, ओठात पण काहीतरी असते, गळ्यात गोफ, मंगळसूत्र, , हातात बांगड्या, पायात पैंजण आणि पायाच्या लंबुळक्या बोटात नथ इतके सारे घालावे लागते. त्यामुळे बाई लग्न झालेली आहे, हिचा मालक कुणीतरी आहे हे इतरांना कळते. पण पुरूषाची मालकीण आलेली आहे हे कुणालाच कळत नाही.

मी समानता मानतो. मला हा भेदभाव मान्य नाही. त्यामुळेही माझा लग्नावर विश्वास नाही. जर माझे लग्न झाले तर बायकोला जे जे घालावे लागेल ते नवर्‍याला सुद्धा घालावेच लागेल ही माझी अट असेल. पण दागिने स्त्रिया घालतात म्हणून लोक हसतील. त्यामुळे मंगळसूत्राच्या ऐवजी लॉकेट, त्यात बायकोचा फोटो मी ठेवणार. बायका कुंकू लावतात, त्याला समांतर प्रथा मी पुरूषांसाठी सुरू करीन. कुंकू लावून बाहेर गेलं तर लोक हसतील. त्यामुळे लायसेन्स आहे हे दर्शवणारं काहीतरी केलंच पाहीजे. पूर्वीच्या काळी होती तशी शेंडी ठेवायची पद्धत पण चांगली आहे. किंवा कानात भिकबाळी घातली तर याचे लग्न झाले आहे हे सर्वांना समजेल. आता त्यामुळे लाखो सुंदर तरूणी दु:खी होतील आणि सुंदर तरूणी दु:खी झाल्या तर माझ्या काळजाला यातना होतील, पण हे चालायचंच. स्त्री पुरूष समानतेपुढे काही काही बाळी तर द्यावेच लागणार आहेत. आपणच जर त्याग केला नाही, चटके सहन केले नाहीत तर या प्रथा कशा पुढे चालू राहतील ?

आज मी सुरूवात केली. उद्या माझे पाहून आणखी दहा जण लॉकेट, भीकबाळी आणि शेंडी ठेवतील. हळूहळू सगळेच ते स्विकारतील आणि मग ती धार्मिक परंपराच होऊन जाईल. यामुळे थोडी तरी का होईना समानता आणण्यास मी कारणीभूत ठरेन. जर माझे लग्न झाले तर ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

पण कोमल तरूणींचे हृदयही दुखवायचे नाही, वेडगळ परंपराही पुढे न्यायच्या नाहीत आणि समानताही हवी असेल तर लग्नाची काय गरज आहे ? जोपर्यंत दोघांचे चांगले जमते तोपर्यंत एकत्र रहावे नाहीतर वेगळे व्हावे. मी गर्लफ्रेण्डला हे सर्व समजावून सांगितले तर ती मला आताच सोडण्याच्या धमक्या देतेय !

याला काय म्हणावे ? जिच्यासाठी केला अट्टाहास ती म्हणते मागचेच पाढे पचास. अशाने कशी समानता येणार ? पुरूष समानता आणू पाहत असतील तरी मुली या अशा पुराणमतवादी विचारांनी लग्नाच्या धमक्या देत राहतात. यामुळेच आपला देश मागे राहिला आहे.

शेवटी तत्त्व आणि गर्लफ्रेण्ड यातले एक काहीतरी निवडण्याची वेळ आली तर नवीन गर्लफ्रेण्ड हाच ऑप्शन डोळ्यासमोर दिसतो. याबाबतीत जाणकार मायबोलीकर योग्य सल्ले देतीलच. त्यांचा मी आधीच आभारी आहे.

जयहिंद !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायकांना कपाळाला कुंकू, नाकात नथणी, कानात डूल, ओठात पण काहीतरी असते, गळ्यात गोफ, मंगळसूत्र, , हातात बांगड्या, पायात पैंजण आणि पायाच्या लंबुळक्या बोटात नथ >>>>>> interesting

बायकांना कपाळाला कुंकू, नाकात नथणी, कानात डूल, ओठात पण काहीतरी असते, गळ्यात गोफ, मंगळसूत्र, , हातात बांगड्या, पायात पैंजण आणि पायाच्या लंबुळक्या बोटात नथ >>>>>> interesting

शेवटी तत्त्व आणि गर्लफ्रेण्ड यातले एक काहीतरी निवडण्याची वेळ आली तर नवीन गर्लफ्रेण्ड हाच ऑप्शन डोळ्यासमोर दिसतो. >> काहीही निवड करायच्या आधी धागा काढायची आवड हे खरे तत्व आहे ना फक्त???

शेवटी तत्त्व आणि गर्लफ्रेण्ड यातले एक काहीतरी निवडण्याची वेळ आली तर नवीन गर्लफ्रेण्ड हाच ऑप्शन डोळ्यासमोर दिसतो >> Proud

बरोब्बर आहे गर्लफ्रेंड काय मिळत राहतील
एकदा तत्व गेलं की गेलं Happy

झुकेगा नही साला
हे पुष्पा सरांचे वाक्य कोरून घ्या मनावर

लोकांचे खूप गंभीर प्रश्न आहेत.अनेक समस्या आहेत.
नथ आणि मंगळसूत्र हा गंभीर विषय नाही
लेखक लय च गंभीर वाटत असेल तर लेखकाने पारंपरिक लग्नात फॅमिली बरोबर जाताना .
स्वतः पण मंगळसूत्र,नथ,पैंजण,बांगड्या, मेंदी,nail पॉलिश, फॅसिंग,pad वाल्या ब्रा ,परिधान करू जावे .
म्हणजे स्त्री पुरुष समान पातळीवर येतील.
त्या नंतर बायको सोडून गेली तर त्याला आम्ही जबाबदार नाही.

सध्याची गर्लफ्रेंड ? म्हणजे काय? Uhoh ऋन्म्याला बायको नी दोन पोरे पण आहेत ना? Uhoh मग असं काय लिहीतोय हा? भ्रम झाला का याला?

एकदा तत्व गेलं की गेलं Happy
हे गाढवही गेलें नी ब्र्ह्मचर्यही...... या चालीवर वाचले :))

आता पुढचा आयडी (डु) शारंबीचा गारुख कां ?????

>> कोमल तरूणींचे हृदयही दुखवायचे नाही

जसे इकडे "लाखो सुंदर तरूणी दु:खी होतील" तसे तिकडे "लाखो देखणे तरुण दु:खी होतील" हीच तर समानता आहे. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. समानतेने लग्न करा आणि तत्त्व गर्लफ्रेण्ड दोन्ही निवडा.

प्रतिसाद क्रमांक ३ :-

धागा नव्वदीच्या पुढे गेला की शंभरी पर्यंत न्यायला परत येईन हे सांगायला हा प्रतिसाद

१७

तुम्हाला स्त्री पुरुष समानता हवी आहे ते मान्य पण तुमच्या गर्लफ्रेंड / होऊ घातलेल्या पत्नीलाच जर मंगळसुत्र, नथ इ. इ. घालायचे असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि इथे लेख पाडून काय होणार आहे? एवढाच समानतेचा वसा घेतला असेल तर उद्यापासून साडी नेसून हिंडा बिन्धास्त! कोणी थांबवले आहे तुम्हाला? तशा शहरात आता बायका आता सर्रास टॉप ट्राऊसर, जीन्स वगैरे "पुरुषी" वेष परिधान करतात आणि अनेक (बर्‍याचश्या) बायका बाय चॉईस मंगळसुत्र वगैरे रोज घालत नाहीत. गावाकडे वेगळी परिस्थीती असेल तर माहिती नाही.
तेव्हा तुम्हाला लग्न करायचे नाही कि स्त्री पुरुष समानता हवी आहे ते एकदा नक्कि करा. लग्न केले कि नाते "कायदेशीर" होऊन तुम्हाला हवे तेव्हा बाहेर पडायचे स्वातंत्र्य रहाणार नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे का? कारण एवढे प्रेम असेल तिच्यावर, तर लग्न केले काय आणि नाही केले काय, फरक पडतच नाही! आणि केलेतच लग्न, तर नका हक्क गाजवू बायकोवर. राहु द्या तिला हवे तसे. पोषाखापेक्षा आचरणावर (तुमच्या मित्रासारखे) भर द्यावा. शुभेच्छा.

रीया धन्यवाद. प्रत्येक नवीन आयडी माझाच असल्याचा संशय येतो लोकांना.
मी ही तो तसाच राहू देतो. मला आवडतो हा खेळ.

@ रीया, हा माझा आयडी नाही हे मला कळणे अवघड नाहीच. पण कोणाचा आहे हे मला कळले नाही. म्हणजे मी मुरलेला माबोकर नाहीये तर Happy

अर्थात तसे मला कोण कोणाचा आयडी हे शोधण्यात रसही नसतो म्हणा, त्यापेक्षा याचा फायदा कसा उचलता येईल हे मी बघतो Happy

पण जो कोणी आहे त्याने फार बोअर लिहिले आहे. काही जण खूप मजेशीर लिहितात. वाचायला मजा येते. ईथे ती आली नाही म्हणून प्रतिसादात जास्त फिरकावेसे वाटले नाही. तुझा प्रतिसाद तेवढा ईंटरेस्टींग वाटला Happy

ऋन्मेषजी, तुम्ही स्वतःच क्लिअर केलं हे बरं झालं. आता मी तुमचा ड्युआय आहे असा संशय कुणाच्या मनात राहणार नाही.
तुम्हालाही त्रास झाला असेल. तुमच्यावर पण खूप आरोप झालेत. तुम्ही ज्या शांतपणे हे सर्व हाताळता त्यातूनच मी शिकतो आहे.
लवकरच मी सर्वांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.

हा माझा आयडी नाही हे मला कळणे अवघड नाहीच >>>

हे वाचून बरं वाटलं.

रीयाचे प्रतिसादरूपी किरण आयडी कोणाचा ह्या प्रश्नात दडलेल्या अंधारापर्यंत पोचतील का?

ओके भास्कराचार्य धन्यवाद
हल्ली सारी किरणं मलाच प्रकाशझोतात आणायला पृथ्वीतलावर अवतरतात असे वाटतेय Happy

हा आयडी माझाही नाही. हल्ली रडारवर इथल्या बातम्या लवकर येतात.
एक मी भास्कर नावाचा आयडी होता. त्याच्या एका धाग्यावर रूमाल असा शब्द लिहील्याने त्या आयडीने वाद घातला होता. शिव्या दिल्या होत्या. त्याला प्रत्त्युत्तर देताना माझा आयडी गेला. Lol तेव्हांपासून इथे मी एलियनच आहे. पण तो आयडी दामोदरसुत बनला, आचार्य बनला , गणितं सोडवता सोडवता कधी याचा फिल्मी करीअर करून मोठा झाला पण रूमाल वरून जी ठसठस आहे ती अजूनही काढतो हे आताच पाहिले.

ऋन्मेष - उगीच माझ्यावर संशय नको. बाकी ब्लॅक रॉबीन, स्ट्रेंजर यांना सांभाळ. लहान आहेत. दंगा करतात. कंट्रोलच्या बाहेर जाऊ देऊ नको. (हे आयडी माझे नाहीत असे म्हणणार असशील तर वादच मिटला). बाकीची मुलं कुणाला त्रास देत नाहीत.

एक प्रोफेसर होते. त्यांना घालवण्यासाठी अनेका ड्युआयडी अचानक अवतरले होते. त्यांच्या आईने आज हजेरी लावली. छान वाटलं. थोडक्यात मी इथे असो किंवा नसो, आठवण निघत राहणार. सर्वांच्या ड्युआयड्यांना शुभेच्छा ! काळजी घ्या.
माझा इथे कोणताच आयडी नाही.

१९ मिनिटांचा आयडी Happy
छे हो, मी असाच शब्दाला शब्द जोडला आणि डायलॉग मारला. माझा कोणावर संशय नाही. आणि आला तरी राग बिलकुल नाही. माणूस दुसर्‍याचा रागद्वेष करण्यात आपलीच मनःशांती घालवून बसतो हे वैश्विक सत्य आहे. सुदैवाने मला हे ऐन तारुण्यातच समजले आहे हे माझे भाग्यच Happy

१९ मिनिटांचा आयडी >>> रडारवर बातमी आल्यानंतर लगेच धावल्यावर किती जुना असायला पाहीजे ? पूर्वी एक तर उशिरा कळायचं. त्यात आयडी बनवायला उशीर व्हायचा. एव्हढे करून इथे येईपर्यंत सगळे उडवलेले असायचे. आता लगेच येऊन क्लिअर करणे बरे.

इतकी मायबोलीची ओढ असती तर ब्लॅक रॉबॉन, एस वालेकर, स्ट्रेंजर आणि बरेचसे आयडी नसते का बनवून ठेवले अशा प्रसंगासाठी ? Lol हे आयडी सर्वांवर प्रेमच करतात हे त्यांना बालपणातच समजले हे खूप छान आहे.
रूमाल वाल्या आयडींचा आणि शिव्या देणा-या मोहिनीताईंचा काय प्रॉब्लेम झाला हे मात्र समजले नाही. Happy
असो चालू द्या तुमचे.

सारी किरणं >> इथे 'सारे किरण' असं हवं आहे. तो एक किरण - ते अनेक किरण. तो किरण-ती किरणं असं अनेकवचन पुल्लिंगी शब्दांचं होत नाही. 'ती' हे सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचन किंवा नपुंसकलिंगी अनेकवचनात येतं. (ते मूल - ती मुलं, ते पुस्तक - ती पुस्तकं). 'सूर्याची किरणे/किरणं' हे 'सूरज की किरनें' चं चुकीचं भाषांतर आहे. किरण हा पुल्लिंगी आहे (पहा: कोटि कोटि किरण तुझे ('किरणं तुझी' नाही) फ्रॉम 'तेजोनिधी लोहगोल').

Pages