उपग्रह वाहिनी

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

Submitted by राधानिशा on 16 September, 2019 - 08:07

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -

वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . आणखी लहान अशी अनेक राजघराणी आहेत ..

मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

कुछ रंग प्यार के ऐसे भी - सोनी वाहिनीवरची नवीन मालीका

Submitted by मिरची on 29 June, 2016 - 03:38

कुछ रंग प्यार के ऐसे भी सोनी वाहिनीवरची ९.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

नायक-नायिका आणि सर्वच कलाकार अतिशय उत्तम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फारशी वास्तवापासून दूर न जाता ही मालिका सादर केली आहे...अजूनतरी....

सहज सुंदर अभिनय व संवाद या मालीकेची बलस्थानं वाटतात...

कलाकार - शहीर शेख, एरिका फर्नांडीस, सुप्रिया पिळ्गावकर

krp.jpg

टी आर पी- अर्थात "टांगत राहिलेली पिरपिर"

Submitted by संतोष सराफ on 30 March, 2015 - 02:28

टी आर पी

प्रतिष्ठित लेखकू |
वाहिन्यासी आधारू |
मालिकांचा प्रसवू |
कर्तव्य योगी ||

रटाळ कथांचा स्वामी |
कल्पना अतिपुरोगामी |
सुचती उचापत्या नामी |
उगा कारणे ॥

आशयाच्या भराऱ्या प्रचंड |
घडवितो नाना कांड |
अंतिमत: ते थोतांड |
सिद्ध होतसे ||

घेउनिया अतिसुंदर तरुणी |
छळवीतसे नानाकारणी |
भलत्याच गेंड्याच्या चरणी |
सोडतसे ||

अत्यंत दुर्गुण संपन्न |
हीनांहूनही हीन |
प्रवेशती एकामागोमाग |
खालनायके ||

कधी नवीनच कथानक आणी |
एक होता चिमणा; पण कावळी 'काणी' |
अन् जुन्याच बाटलीतली जुनीच वारुणी |
वाद जनांचा ||

कधी कथा असे आखूड |
संपते तयातील गूढ |

लगोरी - मराठी मालिका

Submitted by परीस on 20 May, 2014 - 07:38

मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणार्या मैत्रीसारख्या अत्यंत पवित्र मानल्या जाणार्या नातेसंबंधावर भाष्य करणारी `लगोरी’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारीत होत आहे.
`एंडेमॉल इंडिया प्रा.लि.’या निर्मितीसंस्थेची निर्मिती असलेल्या `लगोरी’ची संकल्पना अतुल केतकर यांची आहे. दिग्दर्शक गौतम कोळी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होत असलेल्या या मालिकेचे लेखन सचिन दरेकर आणि अमृता मोरे यांनी केले आहे.
`लगोरी’ ही धनश्री नावाच्या मुलीची आणि तिच्या चार मैत्रीणींची कथा आहे.

'रील' ची रियल ष्टोरी (पहायला विसरु नका)

Submitted by मंजूताई on 22 November, 2013 - 00:54

शाळेत असताना किती भाबडी स्वप्न असायची नाही का? खूप मोठे व्हावं आणि पेपरमध्ये (त्या काळी पेपर हेच दृश्य एक साधन होतं झळकण्याचं) निदान फोटो नाहीतर नाही पण कमीत कमी कुठल्यातरी कोपर्‍यात नाव तरी छापलं जावं अन आपण झळकावं अशी आम्हा मैत्रिणींची इच्छा म्हणा किंवा स्वप्न म्हणा! पण असं काही होणं दुरापास्तच कारण आम्ही सामान्यातील सामान्य. चुकून माकून फोटो काढला गेला अन तो पेपरमध्ये आला तर ह्या आशेवर कधीतरी शाळेच्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला निघणार्‍या प्रभात फेरीत कितीही हात दुखला तरी हातात झेंडा घेऊन समोर उभं राहायचो. नाही म्हणायला खेळात होतो पण काळ्या - पांढर्‍या दहाजणीतील मी कोण?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उपग्रह वाहिनी