आत्मविकास

Self development

भय इथले संपत नाही

Submitted by - on 6 February, 2024 - 11:41

काय खरे, आणि काय खोटे समजत नाही.....

काय बरोबर आणि काय चुकीचे समजत नाही .....

काय करावे आणि काय नाही करावे समजत नाही ....

मनाचे एकावे कि डोक्याने चालावे समजत नाही ....

मन मारून जगावे कि मनाप्रमाणे जगावे समजत नाही ....

म्हणूनच भय इथले संपत नाही .

मनाप्रमाणे जगणे मस्तच ...... पण डोक्याने जगल्यावर बाकी सगळे खुश. (बाकी सगळे म्हणजे जी चार लोक , जी आपल्याला नाव ठेवत राहतात ती खुश.)

ती चार लोक आपल्याला फक्त नाव ठेवतात.

प्रांत/गाव: 

वर्ष २०२४: संकल्प आणि plans

Submitted by किल्ली on 25 December, 2023 - 01:54

नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील. Happy

शब्दखुणा: 

कलाम कि गुलाम

Submitted by sawantrl on 29 November, 2023 - 02:13

लालसे पाई मला माझा धर्म सुद्धा कळत नाही
कोण हिंदू कोण मुस्लिम
जाती धर्माशिवाय राजकारणच होत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

आरक्षण आरक्षणाचा खेळ आहे चालू
समाजाची दिशाभूल अन पुढाऱ्याच पिल्लू
उद्धाराची वाट पाहणंच संपत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

दादा काका बाबा मामा साहेब सारे संधी साधू
हातावर घड्याळ बांधू कि धनुष्याने कमळ तोडू
हेच आता उमगत नाही
मी कलाम कि गुलाम माझं मलाच कळत नाही

शब्दखुणा: 

क्वाएट- माझे नुकतेच प्रकाशित अनुवादित बेस्टसेलर

Submitted by रेव्यु on 16 November, 2023 - 23:09

सुसान केन या क्वाएट या पुस्तकाच्या लेखिका असून हे पुस्तक संडे टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाचा तीसहून अधिक भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांचे TED वरील व्याख्यान ऑन-लाइन उपलब्ध झाल्यापासून ते तीस लाखाहून अधिक दर्शकाकडून पाहिले गेले आहे.

युद्ध नको बुद्ध हवा.

Submitted by शब्दब्रम्ह on 3 October, 2023 - 06:34

आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो,वा आपल्याच विचारांचं घोडं नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट.सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे.पण क्षणभूंगुर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच मुळी.ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते.तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो. या सत्ता ग्रहाणासाठी मग एकच मार्ग उरतो... युद्ध...ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक हकनाक मारले जातात.युद्ध... जिथे सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर ओरबडण्यापर्यंत.

आईच विद्यापीठ - प्रवीण दवणे

Submitted by विश्राम कुलकर्णी on 1 October, 2023 - 10:48

प्रवीण दवणे हे ललित लेखक, गीतकार, कवी म्हणून परिचित आहेतच. पण माझ्या दृष्टीन हि व्यक्ती माणसानं कस जगावं यावर खूप छान भाष्य करते. त्यांची शेकडो व्याख्यान , त्यांनी लिहिलेली पुस्तक सर्वच प्रेरणादायी असतंच . अंतर्मुख करणार असत . मी त्यांच्या पुस्तकांचा 'वाचन वेडा ' म्हणा हवं तर , पण वाचक आहेच. 'सावर रे ',' रे जीवना '  सारखी पुस्तक मनावर एक गारुड उभं करतात. त्यांचं म्हणणं मात्र नीट समजून आलं पाहिजे इतकंच . 

स्व -शोधताना

Submitted by विश्राम कुलकर्णी on 27 September, 2023 - 23:05

आटपाट नगर होत. आपल्या घरट्यात सर्वाना खाऊ पिऊ घालण्यासाठी ती वणवण भटकायची. पण सर्वच जीवांना सुखी जगता यावं यासाठी तिची धडपड सुरु असायची. दुखणी खुपणी , राग लोभ , स्वभाव विशेष, आवडी निवडी सगळंच जपता जपता स्वतः एक जीव आहोत हेच कधी कधी विसरून जायची . काळ पुढे जात होता. मनातील एक पोकळी मात्र कायम असायची . हे सार कुणासाठी . जाणीव नसलेल्यांसाठी? म्हणतात ना जी नाती सहज उपलब्ध होतात ती हळू हळू बोथट होत जातात. त्याची जाणीवच नाही राहत .  आणि एक भीतीही असायचीच. आपल्या माघारी यांचं काय होईल .  मग तीन ठरवलं घरटं सोडायचं .. हो सोडायचं .. आणि काही काळ का होईना इतरांना स्वावलंबी बनायला शिकवायचं ..

सन्मान.

Submitted by Revati1980 on 31 August, 2023 - 04:44

तो गरजला, ती मौन राहिली
तिचं मौन, तो समजू शकला?
विचारले त्याने काय झाले
मौन तिचा तसाच राहिला

मर्यादा आणि आत्मसन्मान
या प्रगल्भ विचारांचा
तर्क जिंकण्यापेक्षा, तिला
अधिक नाही का महत्त्वाचा?
..

शब्दखुणा: 

कुठला धागा काढू ?

Submitted by ढंपस टंपू on 21 July, 2023 - 12:19

आज कोणता धागा काढावा हे समजलंच नाही. मती गुंग झाली. डोकं काम करेनासं झालं.
डोळे गरागरा फिरले. तुम्हीच बघा हे आणि सांगा आता कोणता धागा काढू ?

https://www.youtube.com/watch?v=AxBtJrsAOvM

Pages

Subscribe to RSS - आत्मविकास