।।५।।
“प्रणाम, आचार्य! मी आपले मार्गदर्शन घ्यावे असे वासुदेवांनी सुचवले म्हणून मी आपल्या दर्शनासाठी आलो.”
“सुखी भव. ये बाळ इथे बैस. त्याने मला कळवले होते त्यामुळे मी तुझी वाटच बघत होतो. तुझा प्रवास सुरळीत पार पडला असेल अशी आशा करतो.”
“होय आचार्य.”
“बाळ मानवी मनाचा त्या परमतत्वाशी सुसंवाद प्रस्थापित करायचा असेल तर आधी मनातील ताणतणाव, क्लेश ह्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. मनाची ही ताणरहित अवस्था प्राप्त करण्यासाठी अथर्ववेदात सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्याचाच उपयोग करुन आपण तुझ्या मनातील कल्लोळ शांत करणार आहोत. खरे म्हणजे तु स्वतः करणार आहेस, मी फक्त तुला मार्ग दाखवणारा वाटाड्या आहे. हे करताना तुला विधिवत संकल्प सोडावा लागणार आहे, आणि मी शिकवलेल्या मंत्रांचे पठण करुन तुझ्या अंतर्मनात तुला ब्रह्मकवच धारण करावे लागणार आहे. तुला तुझ्या सुप्त मनापर्यंत पोहोचवण्यासाठी गरज पडल्यास मी संमोहनाचा प्रयोग करीन. तुझी तयारी आहे ना ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होण्याची?”
“होय, आचार्य”
“उत्तम! आपण तुझ्या जागृत मनापासून प्रारंभ करु. शरीरातील सगळे स्नायु क्रमाक्रमाने शिथिल करत शवासन कर आणि श्वासोच्छ्वासावर चित्त केंद्रीत कर. ह्याने तुला चित्त एकाग्र करायला मदत होईल. हे झाले की मी तुला प्रश्न विचारीन. तु दिलेल्या उत्तरातुन माझ्या पुढच्या प्रश्नांची दिशा ठरेल. असे करत हळूहळू आपण तुझ्या समस्येचे स्वरूप जाणून घेऊ.”
“जशी आज्ञा, आचार्य”
“मला सांग बाळ तु कोण आहेस?”
“मी पांचाल नरेश द्रुपद आणि महाराणी पृषती ह्यांचे ज्येष्ठ अपत्य आहे, आचार्य. मला द्रौपदी आणि द्यृष्टद्युम्न ही दोन जुळी भावंडे आहेत.”
“तू स्वतःची ओळख सांगताना तुझ्या पत्नीचा उल्लेख केला नाहीस बाळ. जिचे प्रारब्ध तुझ्या बरोबर जोडले आहे तिचा समावेश तुझ्या आप्तेष्टांत व्हायला हवा असे तुला वाटत नाही का?”
“ती माझी भार्या नाही,आचार्य. आमचा विवाह हा माझ्या आणि तिच्या दुर्दैवाचा परिपाक आहे.”
“ असे तुला का वाटते बाळ?”
“माझा जन्म पुरुष म्हणून झाला आचार्य. पण मला समजायला लागले तेव्हा पासून माझ्या लक्षात आले की शरीर पुरुषाचे असले तरी मनाने मी एक स्त्री आहे. हे जसे जसे समजायला लागले तसा तसा माझ्या मनाचा गोंधळ उडायला लागला. माझ्या अवतीभोवती असलेल्यांपैकी कुणालाही अशी जाणीव असल्याचे मला दिसत नव्हते. मग मला जे वाटतेय ते वास्तव आहे की आभास हे पण मला कळेना. माझ्या शंकेचे निरसन करू शकेल अशी कुणी व्यक्ती माझ्या अवतीभोवती नव्हती त्यामुळे मी कुणाजवळ ही ह्याबद्दल कधी बोललो नाही. अगदी माझ्या मातेला सुद्धा मी काही सांगितले नाही. मी आतल्या आत कुढत होतो.
माझ्या विद्यार्थी दशेत मी पूर्णपणे ह्याच मानसिक द्वंद्वात अडकलो होतो. माझ्या विद्याभ्यासात हे मानसिक द्वंद सतत अडथळा ठरत होते. तरीही मी माझ्या परीने शक्य तेवढे प्रयत्न केले पण माझी प्रगती महाराज दृपदांना समाधानकारक वाटत नव्हती. त्यांना अत्यंत पराक्रमी पुत्र हवा होता, जो द्रोणाचार्यांसारख्या कुशल योद्ध्याचा पराभव करू शकेल.
माझ्यातला पराक्रम जागृत करण्यासाठी आधी माझ्यातल पौरुषत्व जागृत करणे आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले. सामान्यपणे ज्या वयात मुलांच्या विवाहाचा विचार केला जातो त्यापेक्षा लहान वयात असताना त्यांनी माझा विवाह ठरवला. ह्या विवाहामुळे माझ्यात बदल झाला तर उत्तमच पण नाही झाला तर मला होणाऱ्या पुत्रांकडुन त्यांच्या अपेक्षेची पुर्ती होइल असा त्यांना विश्वास होता.
मला माझ्या होणाऱ्या विवाहाबद्दल कळले तेव्हा मला धक्काच बसला. मला विवाह करायचा नाही हे मी धैर्य गोळा करून माझ्या मातेला आणि महाराज दृपदांना सांगितले. महाराजांच्या क्रोधाचा भडका उडाला. त्यांनी माझे काहीही ऐकून घेण्यास नकार दिला. मातेने माझे मत परिवर्तन करण्याचा चंगच बांधला. त्या दोघांच्या हट्टापुढे माझे काहीही चालले नाही.
मीच स्वतःला पुरुष म्हणून स्वीकारु शकत नव्हतो तर ह्या विवाहाची परिणीती काय झाली असेल ह्याची कल्पना आपण करू शकाल आचार्य. माझ्या श्वशुरांना ही त्यांची फसवणूक वाटली. त्यांनी महाराज दृपदांवर तसा आरोप केला. स्वतःच्या झालेल्या अपमानाने महाराज दृपद भयंकर संतापले. त्यांनी मला पुत्र मानण्यास नकार दिला. कळत्या वयातल्या दृष्टद्युम्न आणि द्रौपदी ला महालात घेऊन आले. द्रौपदीच्या सौंदर्याची किर्ती आता सगळीकडे पसरली आहे, अनेक राजघराण्यातून तिला मागण्या येताहेत. त्यामुळे महाराज दृपद पराक्रमी जावई मिळवण्यासाठी सज्ज आहेत. दृष्टद्युम्न आणि हा होणारा जावई ह्या दोघांवर आता त्यांच्या अपेक्षा केंद्रित झाल्या आहेत.
माझं अस्तित्व त्यांनी जणू विस्मृतीत घालवुन टाकले आहे. पण माझी माता मात्र माझ्यासाठी रात्रंदिन तळमळत असते. तिला वाटते मी स्वतःला बदलाण्याचा प्रयत्न करावा म्हणजे महाराज मला पुत्र म्हणून स्वीकारतील. पण स्वतःला बदलणं माझ्या हातात नाही, आचार्य. कदाचित विधात्याच्या चुकीपायी मी पुरुष म्हणून जन्म घेतला. पण मी पुरुष नाही, आचार्य. मी एक स्त्री आहे. हे सत्य कदापि बदलु शकत नाही.”
“ जग्गनियंत्याकडुन चुका होत नाहीत, बाळ. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काही तरी निश्चित असे कारण असते. ते कारण आपल्याला शोधायचे आहे. एकदा ते कारण कळले की तुझ्यासकट सगळ्यांना तुझा स्वीकार करणे सोपे होईल. त्यासाठी तुला तुझ्या अंतरात्म्याच्या वास्तव स्वरुपाचे आकलन होणे आवश्यक आहे. ह्याच शोधाचा संकल्प उद्या तु सोडणार आहेस.”
खुप इंटरेस्टिंग आहे.
खुप इंटरेस्टिंग आहे. महाभारतात ह्याचा उल्लेख वाचलेला आठवत नाही.
पुढचे भाग येऊ द्या.
धन्यवाद साधना. हे महाभारताला
धन्यवाद साधना. हे महाभारताला मी लावलेले ठिगळ (फॅन फिक्शन) आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात शिखंडी ची अशी कथा नाही फक्त उल्लेख आहे तो ही डायरेक्ट युद्धाच्या वेळी. इंटरनेट वर शोधले तेव्हा काही ठिकाणी तो मुळ मुलगा म्हणून जन्माला आला असा उल्लेख आहे तर काही ठिकाणी मुलगी म्हणून जन्माला आला आणि लग्न झाल्यावर सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा एका गंधर्वांच्या सिद्धिने स्त्री चे पुरुषात रुपांतर करण्यात आले असा उल्लेख मिळाला.
ह्या कथेत फॅंटसी यामिनी च्या संदर्भात आहे त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून आधीची कथा रिऍलिस्टिक फिक्शन.
छान चाललीये कथा!
छान चाललीये कथा!
मस्त भाग आहे हा पण.
मस्त भाग आहे हा पण.
पुढचे भाग जरा मोठे टाका ही विनंती.
धन्यवाद रमड आणि आबा.
.
धन्यवाद रमड आणि आबा.
.
धन्यवाद रमड आणि आबा.
धन्यवाद रमड आणि आबा.
@आबा, हे दोन समांतर ट्रॅक चालले असल्यामुळे ह्यापेक्षा मोठे भाग टाकणं अवघड वाटतंय पण उरलेले भाग मी लवकर टाकते दर तीन दिवसांनी. तुमच्या प्रतिक्रिया बघुन मला वाटले ज्या पातळीची तुम्हाला अपेक्षा आहे कथेकडुन ती कदाचित मी गाठु शकणार नाही. होपफुली तुमचा अपेक्षाभंग होणार नाही.