नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील.
ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.
मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.
२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.
३. Health आणि व्यायाम :
A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.
४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.
५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.
६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!
छान संकल्प आहेत. शुभेच्छा!
छान संकल्प आहेत. शुभेच्छा!
नवीन वर्षाचे संकल्प ते वर्ष
माझे नवीन वर्षाचे संकल्प
१. दहा किलो वजन कमी करणे
२. नर्मदा परिक्रमा करणे
३. सर्वांशी गोड बोलणे
४. राजकीय धाग्यावर न जाणे
५. मायबोलीवर न येणे
६. रोज पहाटे ऊठून धावणे
७. यानंतर सायकल व प्राणायाम
८. मानव जातीच्या कल्याणासाठी वाहून घेणे
९. एकपत्नीव्रत चालूच ठेवणे
१०. परीसर,शहर,राज्य, देश,पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे
११. हे सर्व उपक्रम नवीन वर्षात पार पाडणे.
नवीन वर्ष किमान नऊ दिवस नवे राहण्यासाठी प्रयत्न करणे.
किल्ली/पल्लवी, सर्व संकल्प
किल्ली/पल्लवी, सर्व संकल्प सिद्धीस जाण्यासाठी शुभेच्छा.
तुझी माझी यादी जवळपास सारखी आहे #६ सोडून.
र आ, तुम्हालाही शुभेच्छा.
मला तुमच्या क्र 4 आणि 5 बद्दल थोड्या शंका आहेत
मुखपृष्ठचित्र आणि संकल्प
मुखपृष्ठचित्र आणि संकल्प छान आहेत.
शुभेच्छा!
धन्यवाद.
मी_अनु , धन्यवाद.
शेवटपर्यंत वाचले तर सर्व शंका दूर होतील.
संकल्पासाठी शुभेच्छा किल्ली !
संकल्पासाठी शुभेच्छा किल्ली !
माझा एकच संकल्प मनात आहे.. नवीन वर्षात एकतरी हिमालयन ट्रिप करायची!
A.नियमितपणे walking सुरु
A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल>> एक हल्ला If possible add strength training to this. It will give better result.
रआ,
रआ,
१२.. या सगळ्यांचा अपडेट वेळोवेळी मायबोलीवर देणे..
हे राहिले..
कृ. ह. घ्या.
पल्लवी : तुमच्या संकल्पासाठी
पल्लवी : तुमच्या संकल्पासाठी शुभेच्छा. २०२४ पर्यंत थांबूच नका. आज वाटते आहे ना, आजच सुरु करा.
र आ तुम्ही माबोवर आणि राजकीय धाग्यावर जरूर या. राजकीय चर्चांमध्ये पार्टनर कमी नको पडायला.
हा असला धागा आला की उगाच
हा असला धागा आला की उगाच आठवून इथे काहीतरी लिहायला संकल्प करावेसे वाटतात
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष द्यायचे आहे. २०२० पासून प्रत्येक वर्ष चढत्या भाजणीने वाईट गेले आहे. आता नवीन वर्ष काय घेऊन येतंय हि भीती आहे.
किल्ली आणि सगळ्या मायाबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! तुमचे संकल्प पूर्णत्वास जावो.
केवळ वर्ष बदलल्याने काही बदलत
केवळ वर्ष बदलल्याने काही बदलत नाही. नविन वर्ष काही घेऊन येईल ही आपलीच अपेक्षा किंवा काय घेऊन येईल की काय की ही आपलीच भीती. जो काही तुमचा वाईट काळ सुरू आहे त्यावर मात करण्यास तुम्हास मानसिक व शारीरिक बळ येवो आणि पुढील काळ चांगला जावो यासाठी शुभेच्छा.
खरं आहे मानव. Thank you.
खरं आहे मानव. Thank you.
ज्या क्या पाकृ धाग्यांत
ज्या क्या पाकृ धाग्यांत "नक्की करून बघणार" असे मी लिहिले पण केल्या नाहीत त्या करून पाहण्याचा संकल्प मी करत आहे.
१) जपानी अन्न प्रकार बनवायला
१) जपानी अन्न प्रकार बनवायला शिकणे, यशस्वी झाल्यास त्याचा व्लॉग बनवणे, किमान पक्षी जपानी अन्नाच्या बाबतीत भारताची ज्युलिया चाइल्ड होउ शकते अशी महत्वा कांक्षा आहे. सध्या भारतीय यु ट्युबर्स फक्त फोडणीत कांदा लसुण आले मिरची टोमाटो ग्रेव्ही करतात व काय पण घालतात. रणएवीर ब्रार, अजय चोप्रा सारखे पॅट्रार्की वाले पंजाबी लोक्स फक्त श्रीमंत ग्रुहिणींनाच जमतील व शक्य होतील अस्या रेसीपी टाकतात. त्या मानाने जपानी / कोरिअन जेवण साधे सोपे व मेन पचायला हलके वाटते. व्लॉगला चांगले नाव सुचवा.
२) स्वतःची व कुत्र्याची तब्येत म्यानेज करणे मेन फोकस हा च ठेवणे.
३) कामाचा स्ट्रेस न घेणे. मला ह्याचा खरंच फार त्रास होतो शरीरावर व मनावर. पण काम कर णे गरजेचे आहे.
४) शेअर पोर्ट फोलिओ व्यवस्थित मॅनेज करणे व प्रॉफिट कमवणे.
५) पुण्यात टु बीएच के घर घेणे.
६) जून मध्ये बीटी एस चा वर्ल्ड वाइड हँडस म छोकरा - आता ३१ चा झाला हो. - आर्मी तून बाहेर येइ ल त्याच्या स्वागता साठी तयार राहणे.
मग काही आठवड्यात होप जे होप होबी बाहेर येइल . तो ही लै गोडु गोडू. त्यांचे स्वागत करणे.
इतकेच कमी के आर ए ठेवले आह्त
नोकरी सोडून निवांत शेतात २
नोकरी सोडून निवांत शेतात २ खोल्यांचे घर बांधून रहायचे. तिथलेच पिकवून खायचे. दोन गायी सांभाळायच्या. पोटा पुरतं पिकवायचं आणि तेल मिठापुरते चार पैसे शेतातूनच मिळणार्या उत्पन्नावर कमवायचे. बास काही नको मागे इतर व्याप. असा २०२४ चा संकल्प आहे. बघुया केंव्हा साधतोय ते.
- मला व्यावसायिक बळ मिळेल असे
- मला व्यावसायिक बळ मिळेल असे काहीतरी रोज करायचे आहे. सध्या बेरोजगार आहे. कदाचित डिसेंबर महीना असल्यामुळे असेल. पण कुठेच काही प्रगती नाहीये.
कृपया भसाभस संकल्प करू नका
कृपया भसाभस संकल्प करू नका लोकहो, मग एकही धड होत नाही. फार तर ३ वर लक्ष केंद्रित करा, अशी आग्रहाची विनंती.
हो हेही खरं.
हो हेही खरं.
अनु , विपू चेक करता का ?
अनु , विपू चेक करता का ?
उपाशी बोक्याशी 1000% सहमत आहे
उपाशी बोक्याशी 1000% सहमत आहे. जे अत्यंत गरजेच आणि आवश्यक आहे अशाच 2/3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
खरं तर कोणतीही एक गोष्ट करा पण perfect करा असं माझं मत असतं.
पण प्रत्यक्षात एक ना धड भराभर चिंध्या होतातच.. मग त्या जोडत बसा आणि quilt तयार करा आणि त्यातच सौन्दर्य शोधा वगैरे प्रकार होतात.
छान संकल्प, किल्ली.. तुझ्या
छान संकल्प, किल्ली.. तुझ्या संकल्पांत तुला अपेक्षित यश मिळो..
माबोवर न येण्यासाठी संकल्प
हे फार कठीण आहे.
केवळ वर्ष बदलल्याने काही बदलत
केवळ वर्ष बदलल्याने काही बदलत नाही. नविन वर्ष काही घेऊन येईल ही आपलीच अपेक्षा किंवा काय घेऊन येईल की काय की ही आपलीच भीती. >>> ह्म्म्म्म्म . बरोबर आहे मानव.
पुढच्या वर्षीचे माझे काही संकल्प --
१. मला रांगोळी काढायला शिकायची आहे . बोटांची रांगोळी काढता येते पण नीट नाही. फेविकॉलची बाटली वापरून नीट ठिपके आणि सरळ रेषा काढणारे बरेच व्हिडियो पाहिलेत . तसे शिकायचे आहेत . बाकी कलात्मक फारशा जमत नाही .
२. केसाची काळजी घेणे .
३. डोक्यात काही हस्तकलेचे प्रोजेक्ट्स आहेत , ते पूर्ण करायचे आहेत . घर सजावटीसाठी .
बाकी डोक्यात बरेच काही आहे , पण " जे जे होईल ते ते पहावे " या मोड मध्ये आहे . बघू काय होईल ते.
आपला जो स्वतःशी संवाद चाललेला
आपला जो स्वतःशी संवाद चाललेला असतो तो सकारात्मक ठेवण्याचा, भूतकाळामध्ये न जगण्याचा - प्रयत्न करेन.
सामो : बढिया खूप छान
सामो : बढिया
खूप छान
छान संकल्प सामो.
छान संकल्प सामो.
आपला स्वतःशी संवाद पूर्णपणे प्रामाणिक करून आपण जसे आहोत तसे स्वतःला बघण्याचा, मान्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा सध्या. आणि मला हे सोपे नाही वाटले एका ठराविक मर्यादेपर्यंत सोपे आहे त्यापुढे कठीण ते महकाठीण होत जाते.
Car driving चं शिक्षण पुन्हा
Car driving चं शिक्षण पुन्हा एकदा जोमाने सुरु झाले आहे मंडळी!
देव त्या trainer मॅम ना शक्ती देवो
वाह भारीच किल्ली.संकल्पाच्या
वाह भारीच किल्ली.संकल्पाच्या दिशेने वाटचाल.लवकर पूर्ण होवो आणि यश येवो.
धन्यवाद अनु
धन्यवाद अनु
Pages