शेतकरी

माझी आई (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 26 November, 2014 - 23:37

देवाघरी बाप गेला दम्याने तरी माय शेतामधे राबली
कंठातुनी हाक बाहेर आली तिने मात्र ओठावरी दाबली
मातीत रेघा उभ्या मारताना तिची बांगडी ना कधी वाजली
पान्हा उन्हाने कमी होत गेला मला पेज पाण्यासवे पाजली...

कष्टांमुळे चामडी जीर्ण झाली शिरी केस झाले जरा पांढरे
बैलापरी ओढले नांगराला भरे कैक वेळा उरी कापरे
नेसायला वेदना घ्यायची ती घरी पातळे चांगली साचली
फ़ाटून गेल्या जुन्या सर्व चोळ्या नवी मात्र नाही कधी टाचली...

पायात काटे खडे टोचलेले मुके होउनी सोबती राहिले
झोळीमधे झोपलो मी सुखाने मी तिला राबताना स्वतः पाहिले
दुष्काळ आला तरी रोज पाणी सभोवार डोळ्यातले शेंदले

पाऊस कधीचा पडतो

Submitted by संतोष वाटपाडे on 14 July, 2014 - 04:38

थकलेल्या डोळ्यांमधला पाऊस कधीचा पडतो
जोमात बहरली दुःखे उपवास तरी का घडतो

मेल्यावरसुद्धा उरतो का श्वास उराशी बाकी
कौलावर घास गिळाया कावळा पुन्हा ओरडतो

दगडांनी काबिज केली वावरात काळी माती
दारात बैसला बाबा लाचार अजुनही रडतो

झाडावर अंध गिधाडे हुंगतात वार्‍यालाही
कुरणातील बैल बिचारा आखरी लढाई लढतो

हंबरते खुंट्याभवती झोपडी प्राण जाताना
हुंदका चुलीचा तेव्हा राखेत पिलागत दडतो

सावली पेटते जेव्हा अडखळल्या पायाखांली
बांधावर कुणबी वेडा नशिबास शिव्या हासडतो..

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

पंचनामा.

Submitted by किश्या on 16 March, 2014 - 05:58

आज सुदाम सकाळीच रानातुन चक्कर मारुन परतत होता. चेहर्यावर जरा जास्तच आनंद होता..डोक्यात काय काय विचार चालु होते.. या वेळेला पिक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही.. आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुध्दा राहिले नविन काहीच वस्तु पण घेता आली नाही.. कमीत कामी ह्या वर्षी तरी ते करता येईल... आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज देखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चला सुद्धा ठेवता येईल...

"काय सुदामा कसा काय म्हणतीय पिक पाणी?? औंदा काय लै मज्जा आहे राव तुझी.. जवारीच कणीस तांब्या सारख पडलयं मर्दा रानात" पाटील.

देशाला शेतकर्‍याची गरज नाही.............

Submitted by चिंतामण पाटील on 4 October, 2013 - 08:10

मायबोलीवर अनेक वर्ष मी आहे. इतक्या विषयांवर मायबोलीकर गप्पा मारतात की विचारता सोय नाही. अगदी सिरियाची समस्याही त्यांना आपली वाटते. पण शेतकरी त्यांना आपला वाटत नाही. मी याच चालू घडामोडीत अत्यंत महत्वाचे.... या सदरात शेतकरी सुरक्षा विधेयक तयार करण्या बाबत सगळ्यांना आवाहन केले. कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. ते सोडा, शेती आणि शेतकरी यातही शेतकरी सुरक्षा विधेयक मांडलं पण रिस्पॉन्स नाही. यावरुन मला आता पटायला लागलय की या देशाला शेतकर्‍याची गरज नाही. या नंतर शेतकरी ह्या विषयावर मी पण लिहिणार नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

संस्थान ड्युआयडी : कहाणी शेतकर्‍यांची : एक रुपककथा

Submitted by मी-भास्कर on 24 July, 2012 - 07:20

कहाणी शेतकर्‍यांची - खास श्रावण मासानिमित्त
( एक रुपककथा )

किंगफिशरला कर्ज मंजूर

Submitted by pradyumnasantu on 16 November, 2011 - 22:43

किंग्फ़िशरला कर्ज मंजूर !!

येतो बरंका सायेब!
खरं तर निघत न्हाई पाय
पन मुदत देना्र न्हाई म्हन्तासा
गरीबानं करावं तरी काय?

ईमान कंपनीला तुमी
दिले म्हणे चारशे कोटी
जप्ती आननार सांगतासा
माज्या पन्नास हजारापोटी

त्यांच्या ईमानातून
फिरशीला ढगांच्या तळ्यात
तवा ईचारा वरूणदेवाला
बरसशील का गरीबाच्या मळ्यात

ईमानातली परी आणंल तुमास्नी पक्वानाचं ताट भरल्यालं
तवा माजी पोरं खात असतील शिळंपाकं उरल्यालं
ब्यांक-म्यानेजरसायेब, इमानात जवा किंगफ़िसर बीअर पिशीला
तवा इसरू नगा म्या आनि माझी बायको सुशीला

बाटली हाये आमच्याबी खिशात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी कोण ?

Submitted by प्रकाश पोळ on 25 September, 2010 - 12:07

मी कोण,
मला नेहमी प्रश्न पडतो,
उत्तरच मिळत नाही,
खुप शोधावसं वाटतं,
पण गणितच उळत नाही.
नंतर लक्षात येतं,
मी आहे एक उपेक्षित माणूस,
कधी धरणग्रस्त, कधी शेतकरी,
तर कधी गिरणी कामगार.
भुमिका कशाही असल्या तरी,
पदरी उपेक्षाच,
सरकारकडून, समाजाकडून.
अन्यायाविरुद्ध पेटून उठतो,
परंतु पंखच छाटले जातात.
स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर यायचं,
घरदार, बायकामुलं सोडून,
कित्येकानी हुतात्मे व्हायचं,
बाकीच्यानी आश्वासनं झेलायची,
आशा-निराशेच्या वादळात जे मिळतं ते घ्यायचं,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - शेतकरी