कशाशी न देणे कशाशी न घेणे
कशाशी न देणे कशाशी न घेणे
कशासाठी हे गळी लोढणे
जगण्यास जेथे हमीभाव नाही
कशासाठी हे हवे जन्मणे
कुठे नेतसे ना फुटे वाट नुसती
कशासाठी ही उरस्फोड करणे
जिथे चंद्र ही ना रंजवे मनाला
कशासाठी हे हवे चांदणे
असे फक्त पाणी डोळ्यास जेथे
कशासाठी ही हवी रांजणे
तुला पाहता न येते आताशा
कशासाठी ही हवी दर्पणे
सत्वहीन नुसती इथे माणसे
कशाला हवे वेगळे मारणे
उदासीच जेथे व्यापे मनाला
कशाला हवे समजावणे
नागवेच जेथे उभे सत्य आहे
कशासाठी हे हवे लाजणे