दुपार

Submitted by Abhishek Sawant on 5 December, 2015 - 15:21

दुपार

दुपारचे २ वाजले होते, रणरणत्या ऊनात काम करुन पांडबा थकला होता त्याने घरुन आनलेली भाकरी, भाजी सोबत खरडा आणि दही पण होते, जेवणावर ताव मारुन पांडबा त्याच्या शेतातल्या आंब्याच्या सावलीला नुकताच पहुड्लेला, शेजारी त्याचे बैल सावलीत बसून मोठमोठाले श्वास घेत रवंथ करत होते. पांडबा तसा वरकरनी शांत वाटत असला तरी त्याच्या मनात चिंतेचे काहुर उठले होते. नुकतेच झालेले मोठया मुलीचे लग्न त्यामध्ये झालेला खर्च. त्याच्या एकुलत्या एक मुलाला त्याने शहरात शाळेला पाठवलेले तो खर्च, असा सगळा खर्च होऊन पांडबा जवळ काहीच उरले नव्हते. आणि आता पेरणी साठी कूणापुढे हात पसरायचे? बॅंकेचे कर्ज काढयचं की कुणा सावकाराकडून पैसे घ्यावे? असे आणि बरेच काही प्रश्न त्याच्यासमोर उभे होते.
याच विचाराच्या तंद्रित तो आभाळाकडे बघत जमिनीवरच आपला टॉवेल हांथरुन तो त्या आंब्याच्या झाडाखाली पडला होता. आता हळूहळू त्याच्या डोळ्यावर झापड यायला लागली कदाचीत ऊनामुळे असेल किंवा अत्ताच त्याने पोट भरून जेवण केल्यामुळे असेल. झोप लागणार तितक्यातच बैलांच्या गळ्यातल्या घंटेच्या आवाजामुळे त्याची तंद्री भंगली. तो ऊठला आणि बाजूला असलेल्या कळ्शीतले पाणी त्याने ओंजळीने घेउन तोंडावर मारले. तसे ते त्याच्या अर्धवट पिकलेल्या झुबकेदार मिश्यांमधून नितळ्त राहिले. येणारा गार वारा त्याने डोळे मिटुन क्षणभर अनुभवला, खाली हांथरलेला टॉवेल टायनी उचलून झटकला आणि त्याच टॉवेल ने तोंड स्वच्छ पूसुन त्याने तो टॉवेल परत डोक्याला बांधला, अंगाला लागलेला पालापाचोळा झाडून तो ऊभा राहिला, दूरवर असलेल्या आपल्या घराकडे त्याने नजर टाकली काहीच हालचाल दीसत नव्हती, फक्त आणि फक्त नांगरलेल्या जामिनी आणि त्यातून निघणारे वाफांच्या लाटा. ऊनाने नूस्ता अंगाची काहीली होत होती,
त्याने कसलासा निर्धार केला आणि किशातली तम्बाकू काढली त्यावर नखाने चुना लावून तो तळ्हातावर चोळु लागला तम्बाकू चा एक भार भर्ल्यानंतर त्याला तरतरी आली. झाडाला बांधलेल्या एका बैलाचा कासरा त्याने सोडला आणि झपाझप पावले टाकत तो बैलाला घेउन पाट्लाच्या मळ्याकडे जाऊ लागला. ऊजाड रानातली ढेकळे तूडवत जात जात त्याच्या डोळ्यात अश्रू तरळ्ले. ज्या बैलानी त्याला आजवर साथ दिली त्याचाच सौदा करायला तो निघाला होता. त्याला तसे करायला नियतीने भाग पाडले होते......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks..

छान.