कोरोना

कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या लोकांची जन्मकुंडली

Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2020 - 01:46

मला कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, परिचितांच्या किंवा अन्य कारणाने आपण
सहजपणे त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थान , नाव ( प्रसिध्द केले जाणार नाही पण सॉफ़्टवेअर रेफ़रन्स साठी आवश्यक ) रोगनिदान झाल्याची तारीख किंवा मृत्युची तारीख हवी आहे.

९७६३९२२१७६ व्हाटसप वर ही माहिती कळवावी.

भारतात फ़ारच मृत्यु किंवा बाधीतांची संख्या अजुनतरी सुदैवाने मर्यादीत असल्यामुळे भारत बाहेरील लोकांची माहिती मिळाल्यास सुध्दा चालेल. माहितीसाठी आगावु धन्यवाद !

विषय: 

चला आपण यांना मदत करूया.

Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 07:40

मैत्रीचा लढा करोनाशी

टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.

मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.

आवाहन क्र. १

राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

आवाहन क्र. २

स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा - करोना माहात्म्य ||३||

Submitted by अभय आर्वीकर on 8 April, 2020 - 22:50

करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा

विषय: 

तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।

Submitted by अभय आर्वीकर on 8 April, 2020 - 01:43

करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका

करोना हा खलनायक नव्हे नायकच : करोना महात्म्य ।।१।।

Submitted by अभय आर्वीकर on 7 April, 2020 - 11:10

करोना महात्म्य ।।१।।
करोना हा खलनायक नव्हे नायकच

होय.... करोना महात्म्यच. गेल्या काही दिवसापासून माझ्या आकलनाप्रमाणे मी करोना या विषयावर लिहितोच आहे पण यानंतर थोडीशी सुसंगती यावी आणि या स्फुट लेखांचा एकत्रित संग्रह व्हावा म्हणून सलग लेखमाला लिहिण्याचा विचार करतोय.

विषय: 

(चिनी) विजनवास

Submitted by प्राचीन on 7 April, 2020 - 00:25

विजनवास
सकारात्मक विचार करणे हे नेहमीच आवश्यक असले तरी नेमकी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा बुद्धीच्या त्या धडपडीला मनाच्या आशंकारज्जूने बांधून घ्यावे लागते, हेही खरेच. गेल्या काही काळात माझे नवरोजी आणि मी अशाच काहीशा अवस्थेतून जात होतो. त्यातही नवरोजी अधिक प्रमाणात.. आता एक टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर त्याबद्दल लिहिण्याचं बळ आलंय.

‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

Submitted by Dr Raju Kasambe on 4 April, 2020 - 00:25

‘कोरोना’मुळे मला झालेली वैराग्य प्राप्ती

गेले काही दिवस ‘कोरोना’ नावाच्या राक्षसाच्या भीतीने आम्ही स्वतःला घरात कोंडून घेतल्यामुळे आम्हाला वैराग्याची भावना प्राप्त व्हायला लागली. आम्ही आयुष्यातल्या बहुतेक सुखसुविधांचा त्याग केला. त्याचा आम्ही इतक्या सहजपणे त्याग करू शकू असे आम्हाला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तेव्हा आता आपण आयुष्यातील पुढील वाटचाली बाबत ज्ञानी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे असे अस्मादिकांच्या डोक्यात आले.

आणि कोरोना वर यशस्वीरित्या मात केली...

Submitted by Priya ruju on 3 April, 2020 - 04:01

मायबोलीचे बरेच सभासद परदेशात आहेत. कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे असे सगळीकडून वाचायला मिळत आहे. सभासदांपैकी कोणी हे अनुभवले किंवा जवळच्या कोणाचे पाहिले असेल तर कोरोनावर कशी मात केली हे वाचायला आवडेल. एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.

विषय: 
शब्दखुणा: 

दिवस घरी हे काढायचे (विडंबन)

Submitted by Dr Raju Kasambe on 29 March, 2020 - 23:56

दिवस घरी हे काढायचे

फेसबुकात गुंतत जाणे
व्हाट्सऍप वर 'चॅट'त जाणे
कोरोनाचे संदेश धाडायचे
दिवस घरी हे काढायचे

मोजावे तांदळाचे दाणे
मोजावी पंख्याची आवर्तने
खिडकीतुन चांदणे मोजायचे
दिवस घरी हे काढायचे

माझ्या ह्या चाळी पाशी
थांबू नको अजिबात अशी
‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायचे
दिवस घरी हे काढायचे

दिवसभर हाततोंड धुणे
आठवणींना उजाळा देणे
कुटुंबासोबत खिदळायचे
दिवस घरी हे काढायचे

चणचण सुविधांची फार
बंद झाले हॉटेल बार
लिंबू पाणीही गोड मानायचे
दिवस घरी हे काढायचे

कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपण , तुम्ही आम्ही काय करू शकतो

Submitted by विक्रमसिंह on 29 March, 2020 - 03:54

आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात पारंपारीक युद्ध कधी वेशीवर आले नव्हते. आता हे जैवीक तर उंबरठ्यावर आले आहे. एकत्रपणे लढूया.

आताच एक राष्ट्रीय स्तरावरची वेबीनार ऐकली. सरकारच्या सर्व संस्था, संरक्षण यंत्रणा अगदी युद्धपातळीवर सर्व्शक्तिनिशी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उतरली आहेत याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपण सरकारच्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन करून आपले कर्तव्य बजावून आपण आजारी पडून आणखी एक भार बनत नाही ना हे पाहिले पाहिजे..

पंतप्रधान निधीला मदत तर करू शकतोच. ती सर्वांनी करावी. अगदी फूल ना फुलाची पाकळी. खारीचा वाटा का होईना.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कोरोना