आणि कोरोना वर यशस्वीरित्या मात केली...

Submitted by Priya ruju on 3 April, 2020 - 04:01

मायबोलीचे बरेच सभासद परदेशात आहेत. कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे असे सगळीकडून वाचायला मिळत आहे. सभासदांपैकी कोणी हे अनुभवले किंवा जवळच्या कोणाचे पाहिले असेल तर कोरोनावर कशी मात केली हे वाचायला आवडेल. एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कालच worldometer नावाच्या साइटवरून मिळालेल्या माहितीवरून एक्सेल फाईल बनवली. त्यात आतापर्यंत मृत झालेले लोक व बरे झालेले लोक यांच्यातील गुणोत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही आकडे खालीलप्रमाणे.

मृत्युमुखी पावलेले लोक बरे झालेल्या लोकांच्या संख्येच्या मानाने खालीलप्रमाणे ..
- अमेरिका 58 टक्के
- इटली 78 टक्के
- स्पेन 41 टक्के
- युके आणि आयर्लंड - 1700 टक्के !
- फ्रान्स - 37 टक्के
- इराण - 20 टक्के
- जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड - 5 ते 10 टक्के.
- ब्राझिल व फिलिपिन्स - 192 टक्के !
- भारत - 39 टक्के.
- जागतिक सरासरी टक्केवारी - 24 टक्के

गंभीर स्वरूपात असलेले लोकही बरे झालेल्यांच्या मानाने जवळजवळ अशाच टक्केवारीत आहेत.

मला हा मुद्दा मांडायचा आहे की हा रोग जसा सांगितला जातोय तितका सौम्य नाहीय. म्हणजे सध्याची रोगप्रतिकारक्षमता व वैद्यकीय उपचार पाहता प्रत्येक 100 बर्या होणाऱ्या व्यक्तिंमागे 24 लोक मृत होतील (जागतिक सरासरी प्रमाणे).

माझ्या दोन न्यू यॉर्क च्या मित्रांना झाला आहे... आता 3 आठवडे झाले... पहिले दहा दिवस tylenol घेत होते....आता Tylenol घेणे बंद आहे. Temp कंट्रोल मध्ये आहे...
संध्याकाळी रोज वीस मिनिटे जीवघेणा खोकला येतो... ब्रिथिंग त्रास अजूनही आहे... एकाला अजूनही थोडासा डायरिया होत आहे...
घरात आहेत क्वारंटाईन मध्ये... डॉक्टर बरोबर दर आठवड्याला व्हिडीओ कॉन्फ होते त्यांची...
ओव्हरऑल जास्त त्रास नाही आहे... TV बघणे, गेम्स खेळणे, रेगुलर लाईफ चालू आहे... डॉक्टर नी मास्क घालून बॅकयार्ड मध्ये वॉल्क करायला सांगितले आहे...

@च्र्प्स ते घरी आहेत हे नशीब. ताप नसेल तरी कोरोना असू शकतो असे तिथल्या helpline ने सांगितलं माझ्या बहिणीला. तिलाही कोरडा खोकला आणि breathing problem होता. घरीच relax राहून त्रास कमी होत गेला.

जोवर सगळ्या केसेसचा निकाल लागत नाही तोवर किती बरे झाले आणि किती गेले, या तुलनेला आर्थर नाही.
बरं व्हायला , म्हणजे टेस्ट निगेटिव्ह यायला वेळ लागतो.
ग्राफ जास्त चा़गलं चित्र दाखवेल.

वर काही आकडे आले ते बघून चेक केले

228,005 (80%)
Recovered / Discharged

58,467 (20%)
Deaths

हा लेटेस्ट आकडा
दहाबारा दिवसांपूर्वी हाच मृत्युदर १३-१४ टक्के होता तो आता २० टक्केवर आला आहे.
कोरोना पसरत जातोय तसा प्राणघातक होतोय का?

एक तर नक्की की यात मृत्युदर कमी आहे, आणि फक्त वृद्धच मरतील या पोकळ गप्पा आहेत. कोणाचेही शरीर साथ सोडू शकते.

प्रत्येक देशाची ही मृत्युदराची टक्केवारी सेपरेट काढल्यस काहीच्या काही विषमता आढळते. कुठे पाच टक्के तर कुठे ऐंशी टक्के.
त्यात भारतातली टक्केवारी एवढ्यात काढण्यात अर्थ नाही.
तरी रेकॉर्डला काढायची झाल्यास,
मृत्यु ७२
बरे झालेले १९२
म्हणजे सध्या मृत्युदर २७ टक्के

हे वाचून घाबरू नका
पण काळजी जरूर घ्या. तो तुमच्या जवळपासच आहे हे ध्यानात ठेवा.

धागा छान आहे. यातून बरे झालेल्यांच्या बातम्या आणि त्यांच्या अनुभवकथनाच्या लिंक देखील शेअर झाल्यास ऊत्तम. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. काही फायद्याचे सापडेल

आकडे ईथून
https://www.worldometers.info/coronavirus/

मृत्यु ७२
बरे झालेले १९२
म्हणजे सध्या मृत्युदर २७ टक्के>>>>>
मृत्युदर कसा काढला जातो??

इंडिया कोविड ट्रॅकर नुसार भारतात आत्ता
Confirmed केसेस 3108 आहेत, ऍक्टिव्ह 2793, यापैकी बरे झालेले 229 व दगावले 86.

मग मृत्यूदर काढायला बेस काय घ्यायचा 3108, 2793 की (229+86) ?? (229+86) घेतला तर मृत्युदर मोठाच येणार.

युके आणि आयर्लंड - 1700 टक्के ! - ही टक्केवारी खरी असेल तर एव्हाना सगळे युके व आयर्लंड संपायला हवे.

मी वर लिहिल्याप्रमाणे ती टक्केवारी एकूण बरे झालेल्या लोकांच्या मानाने मृत्यू पावलेले लोक किती टक्के आहेत हे दर्शवते आहे.

मृत्युदर एकूण infected लोकांच्या मानाने मृत्यू पावलेले किती यावर ठरवला जात आहे.

वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे एखादी व्यक्ती बरी झाली हे सांगायला सध्या काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे तेव्हढे दिवस थांबून हे आकडे पुन्हा पाहायला हवेत. (माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 20 दिवस)

जिथे बरे झालेले लोक कमी आणि मृत्यू पावलेले लोक जास्त असतील तिथे मी काढलेली टक्केवारी जास्तच येणार.

@ साधना
मृत्युदर कसा काढला जातो??
>>>
Closed Cases ज्यांचा निकाल लागला आहे. म्हणजे लागण झालेला पेशण्ट जगतोय की मरतोय हे कळले आहे.
मी वर दिलेली लिंक चेक करा. ओवरऑल जगाचा २० टक्के मृत्युदर आकडा तिथूनच कॉपीपेस्ट केलाय. आता चेक केले तर २१ टक्के झाला होता..

त्याच साइटवर हेही आहे - डेथ रेट खाली.
https://www.worldometers.info/coronavirus/coronavirus-death-rate/

आणि त्यात हे
https://www.worldometers.info/coronavirus/coronavirus-death-rate/#correct
How to calculate the mortality rate during an outbreak

We don't know how many were infected ("When you look at how many people have died, you need to look at how many people where infected, and right now we don't know that number. So it is early to put a percentage on that."[1][2]).
The only number currently known is how many people have died out of those who have been reported to the WHO.
It is therefore very early to make any conclusive statements about what the overall mortality rate will be for the novel coronavirus, according to the World Health Organization [1][

मृतांची संख्या भागिले रुग्णांची संख्या हा आकडा प्रत्यक्षापेक्षा बराच कमी येईल.

CFR = deaths / (deaths + recovered) हे सूत्रही काही जण वापरतात.
पण यात ज्यांची नोंद झाली नाही आणि जे बरे झाले अशा रुग्णांचा विचार होत नाही. ही संख्या लक्षणीय असेल. त्यामुळे यात मिळणारा आकडा खूपच वाढवून मिळेल.
Unreported cases would have the effect of decreasing the denominator and inflating the CFR above its real value. For example, assuming 10,000 total unreported cases in Wuhan and adding them back to the formula, we would get a CFR of 19.9% (quite different from the CFR of 21% based strictly on confirmed cases).

Neil Ferguson, a public health expert at Imperial College in the UK, said his “best guess” was that there were 100,000 affected by the virus even though there were only 2,000 confirmed cases at the time. [11]

Without going that far, the possibility of a non negligible number of unreported cases in the initial stages of the crisis should be taken into account when trying to calculate the case fatally rate.

इच्छुकांनी लिंक बघा.

A precise estimate of the case fatality rate is therefore impossible at present.

आमच्या दूरदूरच्या ओळखीचे केवळ चाळीस वर्षांचे एक गृहस्थ वेंटिलेटरवर आहेत. त्यांना सांगितले गेलेय की कोरोना होऊन त्यातून बऱ्या झालेल्या कोणाचे रक्त मिळाले तर थोडीशी आशा आहे.
आता प्रश्न असा की बरे झालेल्यांनी रक्तदान करावे की नाही? त्यांच्या स्वत:च्या प्रकृतीस धोका नाही ना ?
प्रतिसादात बदल : रक्त नव्हे तर प्लाझ्मा पाहिजे आहे.
बाकी माहिती खाली आलीच आहे.

कोरोना होऊन त्यातून बऱ्या झालेल्या कोणाचे रक्त मिळाले तर थोडीशी आशा आहे.
>>>

हे लॉजिक नाही समजले. अश्यांचेच रक्त का हवे आणि त्याचे काय करणार? कोणी जाणकार प्रकाश टाकेल का?

It not blood donation - it is plasma donation. The plasma of the recovered Corona patient contains antibodies against the virus. The patient on ventilator has a better chance of survival if his/her body gets those antibodies that can fight the virus as their own immune system is already weakened. China has some successes with this therapy but again it is not a full proof treatment.

यात पण दोन गोष्टी असतील नां.
एक म्हणजे असा रक्तदाता मिळणे तो ही अशक्तता नसणारा,
दुसरं म्हणजे त्याच रक्तगटाचा

घरात बसा आणि सर्व बातम्या ,आकड्यांच्या कोलांट्या उड्या ह्या सर्व गोष्टी कडे दुर्लक्ष करा.
फ्रेश वाटेल.
बातम्या वाचण्यात वेळ वाया घालवू नका त्या वेळेत दुसरे काही तरी करा विचार positive राहतील.
आता ज्या पद्धतीने मृत्यू दर काढत आहेत तो साफ चुकीचा आहे.
बरे झालेलं आणि मृत्यू झालेले ह्यांचा संबंध जोडून दर काढला तर जास्तच येणार .
बाधित लोकांचा पूर्ण आकडा आणि त्या प्रमाणात झालेले मृत्यू असे सूत्र वापरले तर दर खूपच कमी आहे.
बाधित झाल्या नंतर क्रिटिकल स्थिती येण्यास जास्तीजास्त २० दिवस लागत असतील त्या नंतर तो बरा तरी होईल नाही तर मरेल तरी.

२५ % लोकांमध्ये कोणतीच लक्षण दिसत नाहीत.
व्हायरस त्यांच्या वर काहीच दुष्परिणाम करत नाही .
हे विचारात घेतले तर मृत्यू दर 0 च्या पण खाली जाईल

७ ऑगस्टला रात्री बारीक ताप आला अन घशात खवखव झाली. २-३ दिवसानि वासाचे सेन्सेशन गेले तेव्हाच शंका आली होति. घाबरायचा प्रश्न नव्हता, फाईट करायचं ठरवलं होत. बाकी श्वासाचा काही त्रास झाला नाही. ऑक्सिजन लेव्हल सुरवातीपासूनच ९८-९९ होती. १४ ऑगस्टला टेस्ट केली. ती पोजिटीव्ह आली. लगेच वरच्या मजल्यावर होम क्वारंटाइन झाले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची टीम आली. त्यांनी मला न तपासता खाली भावाला भेटूनच चौकशी केली. अन शुगर आहे सांगितल्यावर लगेच एडमिट व्हावेच लागेल असे सांगितले. त्यानुसार अर्ध्या तासात गाडी आली आणि चाकण म्हाळुंगेच्या कोविड केअर सेंटर ला एडमिट केले. तिथे १० दिवसाचे क्वारंटाईन होते. पण डाएट प्रॉपर नसल्याने पाइल्स चा त्रास झाला. ब्लीडींग झाले. तिथले डॉक्टर म्हणाले कि वाय सी एम ला हलवू. पण भावाने खडकी कन्टोमेंट हॉस्पिटलला शिफ्ट केले. तिचे दुसऱ्याच दिवशी पाइल्सचा प्रॉब्लेम क्लियर झाला. पण चेस्ट एक्स रे काढला होता. त्यात न्यूमोनिया दिसला. त्याची ५ दिवसाची ट्रीटमेंट सुरु झाली. त्यात शुगर वाढली, बीपी शूट झाला असे कॉम्प्लिकेशन्स. मग अजून २ दिवस मुक्काम वाढला. पण एवढे होऊनही मला श्वासाचा अजिबात त्रास नाही.त्यामुळे घाबरले नाहीच. ऑक्सिजन लेव्हल मेंटेन राहिली. असे टोटल १७ दिवस काढल्यावर २९ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला.

आता एकदम ठिक. योगासने प्राणायामाचे ऑनलाईन क्लास लावला. १५ दिवसांपुर्वी ऑफिसही जॉईन केल.

आता एकदम ठिक. योगासने प्राणायामाचे ऑनलाईन क्लास लावला. १५ दिवसांपुर्वी ऑफिसही जॉईन केल.

वाचून बरं वाटलं. काळजी घेत रहा.

वाचून बरं वाटलं. काळजी घेत रहा. >> +१
करोनातून बरे झालेल्यांचे अनुभव वाचून चांगले वाटते.

Pages