चला आपण यांना मदत करूया.

Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 07:40

मैत्रीचा लढा करोनाशी

टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे अनेक जणांचा रोजगार बुडतोय, आणि ज्यांचे हातावर पोट आहे अशा अनेक जणांना उपाशी दिवस काढावे लागत आहेत.

मैत्रीचे सांगोल्याचे मित्र शाम पवार अशा अनेक कुटूंबांच्या संपर्कात आहेत.

आवाहन क्र. १

राजस्थान, डोह येथील रहिवासी असून एकूण 57 लोकांचा कबिला आहे यामध्‍ये 13 कुटुंबीय, ज्यामधे पंधरा मुली आणि 17 मुले आहेत, डोंबारी काम व औषध विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. जत शहराच्या बाहेर चार किलोमीटरवर पाल टाकले आहे. अजून यांना कसलीही मदत मिळाली नाही.

आवाहन क्र. २

हत्तीद, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर हे ४७६४ लोकसंख्या, ७८९ कुटूंब असलेलं गाव. गावातल्या ३० कुटूंबांना अशाच मदतीची गरज आहे. यात विधवा, परित्यक्ता महिला व वृध्द, निराधार कुटूंब आहेत. यादी

IMG-20200413-WA0053.jpg

आवाहन क्र. ३

जत चे यल्लमा देऊळ प्रसिद्ध आहे. देवळात दर्शनासाठी येणारे भाविक इथल्या देवदासींना भिक्षुकी देत असतात. पण सध्या देऊळ बंद आहे. परिणामी या देवदासींवर भुकेलं रहायची वेळ आली आहे.

या ४५ जणी जवळच्या देवदासी वस्तीत राहतात. त्यांना अजून कुठलाही मदत मिळालेली नाही.

यापैकी काही देवदासींना मुलेही आहेत.

आवाहन क्र. ४

IMG-20200413-WA0054.jpg

जत शहरातच राहणारे हे मदारी लोक. एकूण 34 कुटुंब, ज्यात 55 मुले आणि 52 मुली आहेत. सापाचे व माकडाचे खेळ दाखवून हे पोट भरतात. सध्या त्यांना काही काम नाही.

IMG-20200412-WA0063.jpg

या लोकांना १५ दिवसाचे राशन द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला निधी हवा आहे. प्रत्येक कुटुंबाला निदान १५ दिवस पुरेल इतके साहित्य देण्याचा प्रयत्न आहे. याचा खर्च प्रत्येकी रु. ८५० आहे.

IMG-20200413-WA0055.jpg

तुम्हाला शक्य असेल तेवढा निधी द्यावा असं या कुटूंबांच्या वतीने आवाहन करत आहोत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपत्तीच्या वेळी असो की नेहेमीच्या मेळघाटातल्या कामांकरता असो, मैदानात उतरून काम करणारे तळमळीचे स्वयंसेवक हीच मैत्रीची खरी ताकद आहे. परंतु ह्यावेळी परिस्थिती निराळी आहे. लोकहो तुर्तास आपापल्या घरीच रहा आणि ही माहिती / निवेदन सर्वदूर पसरवा.

नेहेमीप्रमाणेच ह्या लेखालाही आपल्या मित्र मंडळात फिरवा आणि यथाशक्ती मदत करा ही विनंती.

नेहेमीप्रमाणेच ह्या लेखालाही आपल्या मित्र मंडळात फिरवा आणि यथाशक्ती मदत करा ही विनंती.
Submitted by हर्पेन on 13 April, 2020 - 17:45 >>>>>
आम्हाला घर बसल्याच, अशा गरजूंसाठी काही करायची संधी देताय त्याबद्दल धन्यवाद हर्पेन.

एकदा मनात आले की ७८९ उंबर्‍याच्या गावात ३० घरे उपाशी आहेत तर बाकी ७५० त्यांना (अशा परिस्थितीतही) आळीपाळीने मदत न करू शकण्याइतके -- आपण स्वार्थी झालोय?
पण मला अति-ग्रामीण भाग / दुष्काळी भाग, तिथल्या असुविधा याचा काहीच अनुभव नाही, तेव्हा त्यांचीही काही मजबुरी असेल, आपण उगाच कोणाविषयी मत बनवू नये, असे वाटले....

माहितीबद्दल धन्यवाद. नक्कीच मदत करेन. हत्तीदला मी गेलोय लहानपणी. माझ्या आईची एक मावशी (घाडगे) इथे दिली आहे त्यांच्याकडेच गेलो होतो. सधन कुटुंब आहे ते. आता काहीच सम्बन्ध नाही राहिला. तरी आईला दाखवेन हा मेसेज. धन्यवाद.

लंपन, अंजू, सुनिधी, कारवी प्रतिसादाकरता धन्यवाद
कारवी, आपल्याला दूर राहून तिथल्या परिस्थिती बाबत नाही सांगता येणार हेच खरे.
लंपन, तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला हे वाचून चांगले वाटले

Update:

तारीख १५ एप्रिल २०२०

नियोजनाप्रमाणे आज दुपारी २ पर्यंत १३ कुटूंबांना राशन वाटप होईल असं काल सकाळी ठरवलं होतं. प्रत्यक्षात काल नवीन घोषणा झाल्यावर वेळा बदलल्या. सामान मिळायला खूपच जास्त वेळ लागला. आज संध्याकाळी ५ पर्यंत कणीक मिळणार होती तो टेंपो रात्री ८.३० पर्यंत जागेवर पोचला नव्हता. तसंच शाम राहतो डोंगरगाव, जिल्हा सांगोला. ही कुटूंबे जत ला. त्यामुळे जिल्हा सीमा सामान घेऊन ओलांडता येत नाहीयेत. शाम आतल्या रस्त्यानी बाईकवरून जात आहे. अशा अडचणी आहेत.

तारीख १६ एप्रिल २०२०
आज संपूर्ण दिवस परवानगी आणि तहसीलदार यांची भेट घेण्यात गेला. थोडा माल मोटर सायकल वर आणला.
सकाळी 9 वाजता सर्व माल आणतो एकत्र सहा जण आहोत .
तहसीलदार यांना विनंती केली उद्या थोडा वेळ काढा . बघतो जमते का, अथवा सर्कल यांना पाठवतो असे म्हणाले.
वाटप केलेले रिपोर्ट जमा करा आणि काय देताय त्याची यादी द्या तसेच आणखीन आम्ही काही सुचवले तर होईल का असेही म्हणाले. सर्व टेन्शन संपले आहे उद्या वाटप होई ल

तारीख - १८ एप्रिल २०२०
आज आपण एकूण २० किट दिल्या.
किट देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी सर्कल आले होते , त्यांनी आपल्या कार्यक्रमांची नोंद घेतली. स्वतः प्रत्येक ठिकाणी सोबत फिरले.

तहसीलदार यांनी किट वाटप यादी जमा कराव्यात असे सांगितले आहे. आज काही देवदासी आणि किन्नर यांना दिले. राजस्थानी बंजारे यांच्या पासून सुरवात केली. राजस्थानी लोकांसोबत बैठक घेऊन त्यांची आपण सांगितल्या प्रमाणे माहिती घेतली. हे लोक किट पाहून खूपच आनंदी झाले, त्यांनी तसें व्यक्तही केले.
विशेष बाब म्हणजे आपल्या किट मधे 1)सागर काळे, पार्ले बिस्कीट 60पॅक,
2)दिलीप चव्हाण, हळद पुडी 60 पॅक, 3) मिरची पुड , 60 पॅक मोफत वाटण्यासाठी वरील तीन शामच्या मित्रांनी दिले ,
ज्या मुळे किट घेऊन गेल्यावर लहान लहान मुले समोर आली, किटमधून पहिल्यांदा त्यांच्या आईने त्यांना बिस्कीट पॅकेट दिले, मुलं खूष.

हर्पेन,

अपडेट देण्याबद्दल धन्यवाद, विपु मधुन मेल पाठवली आहे मिळाली का?

कोरोनाकाळात आम्ही पुणे पोलिसांची परवानगी मिळवली व शक्य तितकी मदत करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊ लागलो.

या कालावधीत आम्ही:

पोलिसांना नियमीत जेवणाचे डबे
पोलिसांना नियमीत नाश्ता
सात गरीब कुटुंबियांना अन्नधान्याची मदत
एक अनाथाश्रम व तीन वृद्धाश्रमांना अन्नधान्याची मदत
एका ज्येष्ठ दांपत्याला औषधे व किराणा माल पुरवणे
आम्हीच बनवलेले मास्क्स वाटणे

अशी काही कामे केली व ही कामे सुरू आहेत.

समाजातील अनेक सहृदय नागरिक आमच्या पाठीशी उभे राहत आहेत.

काही अनुभवः

१. पोलिस नागरिकांशी खूपच सहृदयतेने वागताना आढळले. मात्र नागरिकच पोलिसांच्या सहृदयतेचा गैरफायदा घेताना दिसले. कित्येक लोक उगाचच फिरत होते किंवा अतिशय किरकोळ कारणांसाठी वाहने घेऊन रस्त्यावर आलेले होते.

२. सुरुवातीला मास्कचा वापर किंवा तीन फूट अंतर वगैरे नियम नागरिकांनी सर्रास धुडकावलेले होते. हळूहळू गांभीर्य वाढल्यावर आता मास्क लावून शिस्तीत रांगेत उभे राहत आहेत.

३. काही डॉक्टरांनी एरवी आठ ते दहा तास उघडा असलेला दवाखाना या काळात चक्क चोवीस तास उघडा ठेवला. काही डॉक्टर मात्र 'आम्हालाही कोरोनाचे भय आहेच की 'असे म्हणत घरी थांबले.

४. ग्रामीण भागात मास्कचा वापर व तीन फूट किमान अंतर याचे गांभीर्य अजूनही पुरेसे नाही.

५. शेतकर्‍यांची पिके पडून आहेत. ती पिके ज्यांना हवी आहेत त्यांना मिळतही नाहीत. ही पिके शहरापर्यंत पोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था नाही. यासाठी लागणार्‍या परवानगींची प्रक्रिया अतिशय किचकट व नकारात्मकता निर्माण करणारी आहे.

६. पॅथॉलॉजी लॅब्ज, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर बंद असलेली आढळली. उघडी असली तरी तेथे योग्य तो मेडिकल स्टाफ आलेलाच नव्हता.

७. मजूरकामे मिळत नसल्याने गरीब लोक डोळ्यातून पाणी काढत हात पसरत आहेत. येथे कोणतीही मदत पोचलेली नाही.

८. शहरी भागात मॉर्निंग वॉकचे खूळ कमी होताना दिसत नाही. त्यावर निर्बंध येत असल्याचे पाहून नागरिक आता इमारतींच्या टेरेसेसवर घोळक्याने जमू लागले आहेत व गप्पा ठोकत आहेत.

९. रोजच्यारोज बटर, पाव विकण्यासाठी लहानसहान वाड्या, वस्त्या येथे फिरणार्‍यांना कच्चा मालही मिळेनासा झाला आहे व हातात असलेला पक्का माल विकायला बाहेरही जाता येत नाही. असा एक पुरुष डोळ्यांत पाणी आणून त्याची कहाणी सांगत होता.

१०. मूळ परराज्यातील असलेले काही नागरिक लॉक डाऊनच्या आधी काही कारणाने मूळ गावी गेलेले होते. ते तिकडेच अडकले आहेत. निदान ते त्यांच्या मूळ गावी तरी आहेत. आपण बातम्यांमध्ये पाहत आहोत की ज्यांना मूळ गावी जायचेच आहे असे हजारो हतबल लोक अडकलेले तरी आहेत किंवा रस्त्याने शेकडो किलोमीटर चालत जाऊ लागलेले आहेत.

११. शहरातील काही चौकांमध्ये पोलिस सुजाण, सुसंस्कृत नागरिकांच्या कानीकपाळी ओरडून अक्षरशः हात टेकत आहेत पण नागरिक बाहेर पडतच आहेत.

१२. उद्या काय होणार असे वाटून किराणा माल, भाजीविक्रेते यांच्याकडे नागरिक जरूरीहून अधिक माल विकत घेण्यासाठी झुंबड उडवत आहेत.

१३. ग्रामीण भागातील अनेक स्थानिक यात्रा, धार्मिक उत्सव रद्द करण्यात आलेले आहेत. हे योग्यच आहे मात्र यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसानही होते आहे.

बेफिकीर +१.ग्रामिण भागात अजूनही गांभीर्य नाही आहे.घरांची बांधकामे सुरू आहेत,दळणकेंद्रात गर्दी आहे,घोळक्याने लोक गप्पा करत आहेत.सगळं पूर्वीसारखंच सुरू आहे.

आमच्या भागात बाहेरगावचे जे मजूर अडकून पडले आहेत त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था तालूका स्तरावर तहसीलमार्फत केलेली आहे .वृध्द,दिव्यांग , परगावचे मजूर जे गावात शेताचे कामासाठी आले व इथेच अडकले अशा लोकांना गहू,डाळ ,तांदूळ कीट दिली जात आहे.

arjun1988 मनापासून धन्यवाद
आपण कोणाच्या खात्यावरून मदत पाठवली आहे हे मला कळवाल का म्हणजे मला नक्की सांगता ये ईल. तसेच पावती कोणाच्या नावाने हवी हे देखील कळवावे.

वृध्द,दिव्यांग , परगावचे मजूर जे गावात शेताचे कामासाठी आले व इथेच अडकले अशा लोकांना गहू,डाळ ,तांदूळ कीट दिली जात आहे.<<<

उत्तम!

बेफिकीर रोचक अनुभव
अजूनही सविस्तर लिहावे ही विनंती<<<

धन्यवाद हरपेन,

आपले कार्यही उत्तम आहे

धन्यवाद बेफिकीर,

सध्या परिस्थिती अशी आहे की जितके काम करावे तितके कमी पडेल.
आपला चिनुक्स देखिल ह्यासंदर्भात पुणे परिसरातील लोकांकरता उत्तम कार्य करत आहे.
प्रत्येकाने आपापल्या परीने ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सहकार्य केले / हातभार लावला तर त्यामुळे सर्वांचाच फायदा होणार आहे.
अनेक मायबोलीकरांनी त्यांचा मदतीचा हात मैत्रीकडे पुढे केलेला आहे त्या सर्वांचेच मनापासून आभार.

छान धागा आणि उपक्रम

सध्या परिस्थिती अशी आहे की जितके काम करावे तितके कमी पडेल.
+७८६
आमच्या बिल्डीण्गचा ग्रूपही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच्या १५० अन्नाच्या पाकिटांवरून ७००-८०० पाकिटांपर्यंत पोहोचला आहे.
येणारया काळात प्रॉब्लेम सर्वांनाच आहेत. त्यामुळे मोठी मदत बहुतेकांना शक्य नसली तरी छोटी मदत जास्तीत जास्त लोकं करतील तेवढे चांगले या विचाराने खारीचा वाटा ऊचलणे चालू आहे.

जेम्स बॉन्ड आणि बब्बन, मनापासून धन्यवाद.
मला कृपया कोणत्या खात्यावरून मदत केली ते आणि पावती कोणाच्या नावाने फाडायची ते कळवाल का? धन्यवाद.

ऋन्मेषा, धन्यवाद तुझ्या प्रतिसादाबद्दल.

उपयुक्त धागा हर्पेन. आधी लेख वाचताना शंका आली की परदेशातून ही मदत करता येईल का ...पण पर्याय बघून चांगले वाटले.
मला एक मुलगी sponsor करायची आहे महिना एक ठराविक रक्कम देऊन , तुम्हाला माहिती असेल तर जरूर कळवा. आफ्रिकेचे बरेच सोर्स दिसले पण मी भारतीय प्रेफर करते. हे प्रकरण संपले की ते करायचा विचार आहे. ( माझ्या लेकीने हट्ट धरला आहे )
धन्यवाद .

हर्पेन, तीन वेळा प्रयत्न केला पैसे ट्रान्सफर करण्याचा पण काही तरी टेक्निकल प्रोब्लेम येत आहे. Call your bank असा मेसेज आला. उद्या पुन्हा प्रयत्न करीन. धन्यवाद

हर्पेन, तीन वेळा प्रयत्न केला पैसे ट्रान्सफर करण्याचा पण काही तरी टेक्निकल प्रोब्लेम येत आहे. Call your bank असा मेसेज आला. उद्या पुन्हा प्रयत्न करीन. धन्यवाद
>>>

अदिश्री, धन्यवाद.
मैत्री ऑफिसातून निरोप आहे की नक्की काय एरर कोड / मेसेज येत आहे हे कळेल का? त्यानुसार पाहता येईल.

We are unable to carry out your instruction. Please contact the bank.

हे आले तीन वेळा . आता वेगळे account वापरून पहाणार.
आज मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे कुठेतरी डोनेशन देणार होतोच. आणि तुम्ही हे सुचवले . आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहू. धन्यवाद .

Pages