कुसुमाग्रजांची ‘कणा’ प्रादेशिक रूपांतरे
मराठीतील अनेक 'बोलीभाषा' या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे आणि अस्मितेचे आधारस्तंभ आहेत. त्या स्थानिक संस्कृती, परंपरा, लोकगीते आणि भावना थेट व्यक्त करतात, तसेच प्रमाणित मराठीला समृद्ध देखील करतात. बोली भाषांमधील संवादामुळे आपुलकी वाढते आणि ग्रामीण जीवनाचे जिवंत प्रतिबिंब साहित्यात उतरते. खरं तर, ही बोलीभाषा मराठी भाषेचा आत्मा आहे. बोलीभाषांच्या या अशा अनेक झुळझुळणार्या सरिता प्रत्येक संगमावर मराठीला समृद्ध आणि सौंदर्यवान वाहत्या नदीचे रूप बहाल करतात.