मस्त पड म्हणा

Submitted by झंप्या दामले on 3 October, 2013 - 15:07

सकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया … आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले !

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
(आधी विडंबन-कविता आणि खाली मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)

कविवर्य कुसुमाग्रज यांची क्षमा मागून
विडंबन - मस्त पड म्हणा

पार्श्वभूमी : गणपती मिरवणुकीत अचकट विचकट नाचणे हा प्रकार फार वाढलाय, त्यात परवाच्या विसर्जनाला मरणाचा पाऊस पडला. कल्पना करा अशी एक मिरवणूक संपवून एका मोठ्या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता मंडळाच्या अध्याक्षाकडे आलाय

‘ओळखलत का भाऊ मला?’ - पावसात आलं कोणी,
बापडं होतं फार दमलेलं, केसांवरती पाणी
दम खात बसला कसनुसा हसला बोलला वरती पाहून
'गणपती बाप्पा पाहुणे आले, गेले मांडवात राहून

डी जे वरती पोरं आपली चारचौघात नाचली
मोकळ्या तोंडी जातील कशी, खैनी सुद्धा पोचली
भिंत रचली, गाणी वाजली, नाचून सारे मेले
उस्ताद तुम्ही हातावरती चिंचोके हो ठेवले

पोरांना या घेऊन संगे काढता पाय घेतो आहे
भरल्या चपला पुसतो आहे चिखलगाळ काढतो आहे’

पिशवीकडे हात जाताच हसत हसत उठला
‘ 'चपटी' नको भाऊ मला जरा थकवा वाटला
झाला काटा ढिला तरी पडला नाही फणा
"डोक्यावरती पांघरूण घेऊन मस्त पड" म्हणा’

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ कविता : फक्त लढ म्हणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
.........
.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मा.बो.करांनो !
@विजय देशमुख : तुम्ही दबा धरून बसता की काय माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया द्यायला Wink
असो पण माझ्या प्रत्येक लिखाणावर तुमची प्रतिक्रिया येणार हे आता मी गृहीतच धरले आहे Happy

इब्लीस : हाहाहा .... नाही रे ... आदर्शवादी असता तर गुटख्याने तोबरे भरून DJ वर मरेस्तोवर नाचला नसता Happy

दामले, अहो मी अधाशी आहे वाचनासाठी, आणि एकवेळ जिटॉक बंद असलं तरी चालेल, पण माबो चालुच हवं Happy
तसही ऑफिसमध्ये दुसरं काय करणार... Biggrin

जोतिराम >>>> सर वगैरे नका हो म्हणू .... उगाच पोक्त झाल्याचा फील येतो Happy

विजय : तसही ऑफिसमध्ये दुसरं काय करणार >>>> हाहाहाहा.... माझ्याच पन्थातले दिसताय !