कुसुमाग्रजांची कविता "कणा", हिंदी भावांतराचा एक प्रयत्न

Submitted by सोन्याबापू on 29 August, 2015 - 00:55

कुसमग्रजांची "कणा" हिंदीत भावांतरित करायचा एक प्रयत्न केलाय, कसा वाटतो नक्की सांगा

पहचाने क्या गुरूजी हमको?’
भिगत आये कोय,
कपडे उसके कसमसायें,
बालों में था तोय.

एक क्षण बैठा फिर वो हँसता
बोलत ऊपर देख,
‘गंगामैय्या आवत घरपे,
अतिथी बने रहैक’.

मैहर उसका पाते ही वो
चहार दिवार में नाची,
खाली हात जाती कैसे,
गृहलक्ष्मी बस बची.

दीवार टूटी, चूल्हा बुझा,
ले गई चल अचल,
प्रसादरूप अब तो है बस
नैनन में थोडा जल.

गृहलक्ष्मी को लेकर संग
सर अब हम लढे है
टूटी दिवार बांध रहे है,
कीचड़ मिट्टी फांद रहे है.

जेब में हात जाते देख
हसतां हुआ सीधा खड़ा
‘पैसेवैसे नहियो चाही,
बस अकेलासा लगा'.

टूट पडा मोरा घर
पर टुटल नहीं है रीढ़,
लड़ तो हम पूरा लेंगे गर
कृष्ण सम्हाले रथनीड!

टिप:- भावांतर हिंदीत असले तरी हा प्रयत्न मराठी भाषा प्रचारात एक खारीचा वाटा म्हणुन केलाय अन म्हणूनच एक मराठी साईट वर प्रकाशित करतोय, माननीय सदस्य अन संपादक मंडळास गैर वाटत असल्यास उडवून टाकवात अशी आगाऊ विनंती करतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

फक्त ती शेवटची ओळ जी आहे "पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा " हा ह्या कवितेचा सर्वोच्च बिंदू इथे तुम्ही बदललात आणि "लड़ तो हम पूरा लेंगे गर कृष्ण सम्हाले रथनीड" इथे कृष्णाला आणलंत ते काही पटलं नाही. तो स्वतः लढतो आहे, फक्त आपल्या गुरुचे आशिर्वाद/पाठिंबा मागतो आहे. दैववादी नाहीये तो, तर प्रयत्नवादी आहे. म्हणूनच तर "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा; पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा" असं म्हणतो तो.

शरी जी,

ह्या बाबतीत मी काही सांगू इच्छितो, इथे उल्लेख कृष्णाचा आहे तरी तो देव किंवा चमत्कारी पुरुष म्हणुन नाही तर गीताज्ञान पार्थाला देणारा गुरु ह्या अर्थाने अभिप्रेत आहे मला, गुरुशिष्य संवाद हा तो उपदेश अन ह्या कवितेतली २ पात्रे ह्यांच्यातला समानशील दुवा म्हणुन वापरला आहे, जसे नायक आपल्या प्रिय गुरुला "फ़क्त पाठीवर हात ठेवा" म्हणतोय तसेच अर्जुनाने प्रभु ला "तूच माझे सारथ्य कर म्हणजे मला स्थिर बुद्धि लढायचे बळ अन विजय मिळेल" असे म्हणल्या मुळे मला ते इथे वापरणे रास्त वाटले

नाही आवडले....
ही हिंदी शुद्ध नाही, त्यातही मराठी भाषेप्रमाणे काळजातही शिरत नाही. हवे तर गुलजार यांनी याच कवितेचा केलेला अनुवाद ऐका.
https://www.youtube.com/watch?v=F2k3mXp8BVM

प्रयत्न चांगला आहे!
दीवार टूटी, चूल्हा बुझा,
ले गई चल अचल,
प्रसादरूप अब तो है बस
नैनन में थोडा जल.
ह्या ओळी आवडल्या! ही शुद्ध हिंदी नाहीये पण कुठली तरी हिंदीची बोलीभाषा वाटते आहे (सिनेमात ऐकलेली). शेवटच्या ओळीचा अर्थ बदलाला आहे ते स्वतंत्र रचना म्हणून छान आहे पण जर कवितेचा भावानुवाद असेल तर ते नाही पटलं (तुम्ही शरी यांना दिलेलं स्पष्टीकरण वाचूनही).

खुपच चांगला प्रयत्न.
पण "फक्त लढ म्हणा" ची ऊंची गाठणे "कृष्ण सम्हाले रथनीड!" ला नाही जमले हेमावैम.

तरीही खुपच आवडले. पुलेशु

आवडला अनुवाद. शेवटच्या ओळीविषयी मला पण तसंच वाटलं. यमकात वाचायला छान वाटते आहे मात्र.

रीढ़

"सर, मुझे पहचाना क्या?"
बारिश में कोई आ गया
कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए

पल को बैठा, फिर हँसा, और बोला ऊपर देखकर

"गंगा मैया आई थीं, मेहमान होकर
कुटिया में रह कर गईं!
माइके आई हुई लड़की की मानिन्द
चारों दीवारों पर नाची
खाली हाथ अब जाती कैसे?
खैर से, पत्नी बची है
दीवार चूरा हो गई, चूल्हा बुझा,
जो था, नहीं था, सब गया!

"’प्रसाद में पलकों के नीचे चार क़तरे रख गई है पानी के!
मेरी औरत और मैं, सर, लड़ रहे हैं
मिट्टी कीचड़ फेंक कर,
दीवार उठा कर आ रहा हूं!"

जेब की जानिब गया था हाथ, कि हँस कर उठा वो...

’न न’, न पैसे नहीं सर,
यूंही अकेला लग रहा था
घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी...
हाथ रखिये पीठ पर और इतना कहिये कि लड़ो... बस!"

Reedh (Original Title Kanaa)
Original Marathi Poem : Kusumagraj
Translated by Gulzar

किरण कुमार ह्यांनी दिलेल्या लिंक मधील भावानुवादाचे शब्द !! Happy

सोन्याबापु,

प्रयत्न छान केला आहे तुम्ही...शुद्ध हिंदी नसुन ही भाषेचा बाज मस्त आहे..वर बरेच जणांनी म्हण्टल्या प्रमाणे शेवट्च्या ओळी मुळे गडबडतो आपण्...पण अर्थात तुमचे त्या वरचे स्पष्टीकरण वाचल्यावर नाही खटकत येवढे हे ही नक्की Happy

चांगला प्रयत्न.. आणि कृष्णाला आणलंत तरी काही बिघडलं नाही.. त्यानी महाभारतात स्वत: लढाई केलेलीच नाही.. जी केली ती अर्जुनानीच केली..

स्वतंत्र रचना म्हणुन खुपच सुरेख कविता आहे सोन्याबापू. प्रादेशिक हिंदीचा लहजा तर फारच उत्तम उतरलाय. अवधी बाज वाटतो आहे, बरोबर आहे का?

तुम्हाला वाटतंय ते तसंच ठेऊन आणखी एक प्रयत्न म्हणुन शेवटच्या दोन ओळी पुन्हा रचून मूळ कवितेत शेवटी जो आवेश आहे तो आणता येतोय का पहा ना. तो मुख्य पंच आहे. 'कणा' आहे तर ते यायला हवं Happy

गुलजारांचा हिंदी भावानुवाद आजच वाचला. थँक्स प्रसन्न. पण त्यातही तो शेवटचा भाव अचूक पकडला गेलेला नाहीये. हे माझं वैयक्तिक मत.

मित्रहो ह्यात अवधी भोजपुरी अन मैथिल ह्या तिन्ही भाषांतले काही काही शब्द आहेत, ही हिंदी प्रमाणित संस्कृतप्रचुर हिंदी आहे असे काही ही म्हणणे नाही माझे

गुलज़ार ह्यांचा भावानुवाद अप्रतिम आहे प्रसन्न भाऊ!

सई,

तुम्ही म्हणता ते खरे आहे, मे बी "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा; पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा" ह्या ओळी इतक्या आत रक्तात भिनलेल्या आहेत आपल्या की त्या मुळे " घर तो टूटा, रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी...हाथ रखिये पीठ पर और इतना कहिये कि लड़ो... बस!" ह्या ओळी थोड्या परक्या वाटु शकतात, अर्थात गुलजारांनी भावानुवाद केला आहे रुपांतर नाही (Translation and not transliteration) त्या मुळे शेवट त्यांनी आपल्या ढंगात केला आहे; ऑडीयो क्लिप ऐकली आहे का ? त्या मधे गुलजारांच्या धीरगंभीर आवाजात वेगळाच फील येतो. इथे सोन्या बापुंनी पण आपल्या शैलीत केला आहे शेवट.

आता ऐकेन प्रसन्न Happy
तुम्ही म्हणताय ते मात्र नेमकं खरंय. ते आत भिडलेलंच शोधलं जातंय प्रत्येक रचनेत. अपेक्षाही त्याच तीव्रतेची केली जातेय. पण त्यामुळे नवनिर्मितीवर अन्याय होतोय.

सोन्याबापू, क्षमस्व Sad

अवधी भोजपुरी अन मैथिल ह्या तिन्ही भाषांतले काही काही शब्द आहेत>> ग्रेटच _/\_ Happy

स्तुत्य प्रयत्न, अनुवाद अ-मराठी भाषक लोकांना कसा वाटतो ते महत्वाचे
आपल्या डोक्यात त्या ओळी इअतक्या रुतलेल्या आहेत की कोणताही अनुवाद वाचून समाधान होणे अशक्य
वाचनात आलेले अजून काही अनुवाद

http://tarjumaa.blogspot.in/2008/02/blog-post.html

http://hindi-kusumagraj.blogspot.in/2010/03/blog-post_5033.html

खूप आवडला अनुवाद.

टेक्निकली परफेक्ट आहे की माहीत नाही पण मराठी 'कणा' मधली गेयता / नादमयता गुलझार ह्यांच्या अनुवादापेक्षाही चांगली उतरली आहे. ( खूप धाडसी विधान आहे हे ह्याची कल्पना आहे ! )