नागपंचमी आठवणीतल चित्र
पुर्वीच्या बायका शिकलेल्या नसायच्या, पण त्यांना बर्याच कला अवगत असायच्या. अशीच एक कला माझ्या आजीची. चित्रकलेत तिने प्राविण्याच कुठलही कागदोपत्री सर्टीफिकेट मिळवल न्हवत. पण तिच्या हातानी काढलेल्या साध्या रेषा खुप सुंदर वाटायच्या. मग त्या रांगोळीतल्या असोत की एखद्या कापडावर केलेल चित्ररेखाटन. बघतच रहाव वाटायच त्यांचाकडे. त्यातलाच एक नमूना तुमच्या साठी. या चित्राला जवळ जवळ २० हून अधिक वर्ष झाली असतील.


