नागपंचमी आठवणीतल चित्र

Submitted by निर्झरा on 28 July, 2017 - 07:45

पुर्वीच्या बायका शिकलेल्या नसायच्या, पण त्यांना बर्‍याच कला अवगत असायच्या. अशीच एक कला माझ्या आजीची. चित्रकलेत तिने प्राविण्याच कुठलही कागदोपत्री सर्टीफिकेट मिळवल न्हवत. पण तिच्या हातानी काढलेल्या साध्या रेषा खुप सुंदर वाटायच्या. मग त्या रांगोळीतल्या असोत की एखद्या कापडावर केलेल चित्ररेखाटन. बघतच रहाव वाटायच त्यांचाकडे. त्यातलाच एक नमूना तुमच्या साठी. या चित्राला जवळ जवळ २० हून अधिक वर्ष झाली असतील.

naagapanchami 1 .jpg
या चित्रातील प्रत्येकाची नाव तिने त्या वेळी सांगीतली होती. आता लक्षात नाहीत.
यात नाग-नागिण, त्यांची पिल्ल, वारूळ आणि ईतर यांचा समावेश आहे. यातील एक मेकांत गुंफले गेलेले नाग काढण्याची तिची विशिष्ट पद्धत होती. आधी गुणाकारच्या आकाराच्या फुल्या काढायच्या आणि मग त्या वळणदार रेषा काढून एकमेकांना जोडायच्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं चित्र!! आणि चित्राशी निगडित असलेल्या आपल्या भावना पोहोचल्या. आपण एवढी वर्षे चित्र संभाळून ठेवलेत याचेच कौतुक आहे.

मस्त.

आपण एवढी वर्षे चित्र संभाळून ठेवलेत याचेच कौतुक आहे>>> ++ 111