अवघा रंग एक झाला . . . (आनंदवारी २०१७)

Submitted by जिप्सी on 4 July, 2017 - 08:45

पाहु द्या रे मज विठोबाचे रूप
लागलीसे भुक डोळा माझ्या . . .

 DCIM\100GOPRO\GOPR8497.JPGगळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...

शतकामागुन शतकं उलटली. पिढ्यांमागुन पिढ्या बदलल्या. बदलांचा हा रेटा गावांचे, माणसांचे चेहरे बदलतो. नवीन काही जन्माला येत, जुनं काही लयाला जातं. या सार्यामध्ये परंपरेची नाळ मात्र शाबूत असते. ती शतकांमागून शतकांना जोडत असते अन् पिढ्यांमागुन पिढ्यांना साधत असते. ही परंपराच मग एक सांस्कृतिक ठेवा बनते आणि जिवाभावाने जपली जाते. आपल्या महाराष्ट्रालाही असाच एक भव्य आणि उदात्त सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्या "पंढरीच्या वारीचा".

यंदाच्या या आनंदवारीची हि काही क्षणचित्रे.
स्थळः श्री क्षेत्र पंढरपुर आणि वाखरी येथील रिंगण

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी
तुका म्हणे होय मनासी संवाद, अपुलाची वाद आपणासी

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
 गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा, हार मिरविती गळां
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
 DCIM\100GOPRO\G0028009.JPG

प्रचि १७
 DCIM\100GOPRO\G0078219.JPG

प्रचि १८
 DCIM\100GOPRO\G0078188.JPG

प्रचि १९
 DCIM\100GOPRO\GOPR8466.JPG

प्रचि २०
 DCIM\100GOPRO\GOPR8494.JPGखेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे

प्रचि २१
 DCIM\100GOPRO\GOPR8462.JPG

प्रचि २२
 DCIM\100GOPRO\GOPR8461.JPG

प्रचि २३
 DCIM\100GOPRO\GOPR8246.JPG

प्रचि २४
 DCIM\100GOPRO\GOPR8240.JPG

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
 होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

प्रचि २८
 DCIM\100GOPRO\G0138353.JPG

प्रचि २९
 DCIM\100GOPRO\G0118294.JPG

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६
 DCIM\100GOPRO\G0188521.JPG

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०
 DCIM\100GOPRO\GOPR8925.JPGचालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी . . . .

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

Group content visibility: 
Use group defaults

सकाळीच आठवण आलेली जिप्सीचे प्रचि आले असतील वारीचे पण वेळ नाही मिळाला माबोवर येण्यासाठी. आता लॉगीन केल्याकेल्या पहिल्यांदा हा धागा उघडला, नेहमीप्रमाणेच सुंदर छायाचित्रे. यंदाही तुमच्यामुळे पंढरीची वारी घडली Happy
माऊली माऊली माऊली माऊली ___/\___

किती सुंदर! दरवर्षी नित्यनेमाने बघितले जातात तुमचे फोटो. दरवेळेस तितकाच आनंद मिळतो.

<<ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्या "पंढरीच्या वारीचा".>> खरच आपण खुप भाग्यशाली आहोत.. अशी संतपरंपरा अन अशी वेडी भक्ती लाभलेले आपण..
जिप्सी तुझे फोटो अन वर्णन नेहमीप्रमाणेच सुरेख... प्रत्यक्ष वारी दर्शन घडले फोटोतुन .. छान Happy

फोटो पाहून वाटले
निर्गुण निराकार साकारे भूवर
चित्ररुपे ||

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!!

दरवर्षी वारीत एक वेगळाच अनुभव येतो. वाखरीच्या रिंगणाचा अनुभव वर्णनातीत आहे. एकदा तरी जरूर अनुभवावा. जेंव्हा माऊलींचा घोडा रिंगणात धावतो तो क्षण म्हणजे नयनरम्य सोहळाच. Happy

सुंदर दर्शन! मस्त फोटो. इथे बसून पांडुरंगाचं, वारीचं दर्शन झालं. धन्यवाद जिप्सी.

एकदा तरी जरूर अनुभवावा.>>>>>>>>>.बघु कधी योग येतोय ते.
विठ्ठल तो आला आला आम्हा भेटण्याला>>>>>>..काल सकाळी हेच गाणं गुणगुणत होते मी. सुंदर आहे हे गाणं. Happy

काय सुन्दर प्रचि आहेत..
खुप खुप आभार याबद्दल....

प्रचि ८ मधल्या आजोबांच्या चेहेर्यावरचे तृप्त भाव बघुन एक क्षण हेवा वाटला त्यांचा..
शेवटचा प्रचि केवळ अप्रतिम...

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
>>
हे शब्द ऐकताना नेहेमी गळा दाटुन येतो माझा...आज तुमच्या प्रचिंसोबत हे वाचताना पण असाच अनुभव आला..

परत परत परत धन्यवाद...

अवांतर :
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

हे इतके दिवस मी असे ऐकत होते

तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे - भवसागर तरुन जाण्यासाठी असा अर्थ पण लावला होता माझा मी Happy
आज खरे शब्द कळले...

धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत

चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे....

अप्रतिम प्र चि ......

Pages