सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाचे स्वागत करायला आता काही तासच उरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या भटकंतीचा मागोवा घेताना जाणवले कि यावर्षी जरा जास्तच भटकलो.
२०१६ ची सुरूवात माणदेशीच्या सफरीने झाली तर शेवट कोल्हापुर भटकंतीने.
साधारण ३ महिन्यांपूर्वी केदार ने अधिकृत रित्या पुणे-गोवा सायकल सफर जाहीर केली. नेहमेचे अधिक ओळखीतले मिळून ८ जण तयार झाले. केदार ने लगेच प्रॅक्टिस rides च एक वेळापत्रक सगळ्यांना पाठवलं आणि जमेल तास सगळ्यांनी ह्या rides ना हजार राहून तयारी सुरु केली. यथावकाश सुट्ट्या, आमच्यासाठी परत यायचं ट्रेन च तिकीट आणि सायकल साठी टेम्पो तसच राहण्याची सोय ह्या सगळ्याची चोख व्ययवस्था झाली. सफारीला १-२ आठवडे राहिले होते आणि अचानक आमच्यातले २ लोक ऐनवेळी उपटलेल्या महत्वाच्या कामामुळे कटाप झाले. इजा बीजा नंतर माझा तीजा झाला, तब्बेत बिघडली आणि मीपण आऊट झालो. पण कोकण साद घालत होत !
किती रंग,रुप ...किती प्रजाती....
ही तर ईश्वराची गोड निर्मिती...
पहाटेच्या प्रहरी किलबिलाट करती....
जणु आळवतात देवाची सुरेल आरती...
होउन स्वार वार्यावर उड्डाण करती...
दाणा पाणी पिऊन मजेत राहती...
निसर्गाच्या सानिध्यात असते यांची वस्ती...
झाडे,फुले,वेलींबरोबर करतात घट्ट दोस्ती....
पक्ष्यांची दुनिया अनुभवुन वाढवु खरी श्रीमंती...
विसराल मग आयुष्यातली खोटी मतलबी नाती.....
मी २०१२ सालापासून अंगोलात आहे. आणि एवढ्या काळात मी सहा घरे बदलली. ( पण घाबरू नका, त्यापैकी प्रत्येकी दोन दोन, एकाच एरियात होती, म्हणून दोन दोन चे गट करून लिहितो. )
११ आणि १२ ग्राफानिल, व्हीयाना, लुआंडा - साल २०१२
अंगोलात आल्याबरोबर पहिल्यांदा नऊ महिने मी ग्राफानिल या भागात राहिलो. प्र्त्येक मजल्यावर दोन फ्लॅट्स असलेली २ मजली बिल्डींग आमच्या कंपनीने घेतली होती. त्यात आम्ही सहा जण रहात होतो. दोन बेडरुम्स्चा
सुंदर फ्लॅट होता तो.
ग्राफानिल असे भारदस्त नाव असले तरी ते एक खेडेगाव होते. सर्व बैठी घरे होती. ही बैठी घरे हि खास अंगोलन
रायगड कितीही वेळा पहा नवीनच वाटतो. १९/२० नोव्हेंबरला रायगडला जाण्याचा योग जुळून आला. तिथली काही छायचित्रे.
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

एखादी ऐतिहासिक वास्तु आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला बघण्यासाठी वेळ भेटत नाही तसेच काहीसे प्रतापगड बाबतीत झाले.
एका निमित्ताने महाबळेश्वरला जाण्यात आले. आम्ही तेथून प्रतापगडला गेलो. त्यात वेळेमुळे काही मित्र नाराज झाले पण ठीक आहे होते असे कधी कधी.
आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते. कधी कधी त्याचे जाळे किती मजबूत आणि उपयोगी असते यावर एखादा लेख आपण वाचलेला असतो. घरातल्या गृहीणींना तर “काय मेले कोळीष्टके करून ठेवतात, सारखी सारखी साफ करावी लागतात” असेच वाटत असते. पण स्पायडरमॅन चित्रपटामुळे कोळी आपल्याकडे मुलांमधे भलतेच "पॉप्युलर" झाले आहेत. पण नवलाची गोष्ट अशी की आपल्या भारतात हजारो जातीचे वेगवेगळे छोटे मोठे कोळी आढळतात.