भटकंती कोयना अभयारण्य

Submitted by त्रिनेत्र on 23 May, 2025 - 09:06

या भटकंतीसाठी वर्षभर जीव नुसता आसुसलेला असतो कारणच आहे तस, जायचंय अशा ठिकाणी जिथे इतर वर्षभर कुणालाही अगदी अधिकारी वर्गातील लोकांनाही परमिशनशिवाय जाता येत नाही. कोयना अभयारण्याच्या कोरमध्ये जाण्याचा हा योग, दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला हा योग असतो ते प्राणीगणनेसाठी.
मग काय मन एकदम एक्साईटेड काय काय घेऊ आणि काय काय नको दुर्बीण, कॅमेरा, पाण्याची वाटली खाऊ सगळं एकदम भरभरून मन भरून, त्यातच दरवर्षी सध्या हलकासा पावसाच्या सरी येत आहेत तर आम्ही चार मित्र फॉर्म भरून सर्व अधिकाऱ्यांची नीट जमवाजमव तपासून निघालो कोयनेच्या अभयारण्यात प्राणी बघायला. खूप उत्सुकता आणि गुड अशा जागांवर जाण्याचा एक सुंदर अनुभव घेण्यासाठी.

सकाळी साडेचार वाजताच अलार्म ला जाग आली मग काय सर्वांना फोन करून उठवलं रात्री जरा उशिरा झोप लागली होती. गाडीमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि सुसाट निघालो कात्रज च्या नवीन बोगद्यानी साताऱ्याकडे. मध्ये एका ठिकाणी छान नाष्टा केला चव जेमतेम होती पण नंतर पुढे परत गैरसम नको व्हायला आपली म्हणून पेट पूजा उरकून घेतली. बाकी वाफाळलेला चहा रस्त्याचा फोटो सेशन एखादी बुलेट दिसली तर तिचा फोटो काळे पांढरे ढग उगवता सूर्य या सगळ्या नजारांच एकदम मनापासून आनंद घेत गाडी हानत होतो.

सातारा शहरात उजवीकडे वळलो, गर्दी तशी कमीच होती. साताऱ्यातील बोगद्याच्या अलीकडं उजवीचा रस्ता धरला आणि थेट कास पठार गाठलं. हेच ते पठार जे अगदी भरभरून ओसंडत असतं ज्यावेळी फुले येतात, आता मात्र इथे चीटपाखरूही नव्हतं. आमची एकच गाडी जंगलातून सुसाट धावत होती दोन्ही बाजूला दर्या आणि धरण, मस्तपैकी गार थंड अशी हवा आणि त्या हवेमध्ये बरोबर घेतलेल्या खाऊचा आस्वाद घेत आम्ही निघालो. घाटाची वाट वळण घेत घेत कास्च्य तलावाभोवती गिरकी मारत गाडी निघाली.
लाल माती उडवत काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये आढळत आम्ही बामनोली या गावी पोहोचलो. वा काय ते सुंदर दृश्य समोर अथांग शिवसागर उन्हामुळे पाणी जरी आतवर गेलेला असेल तरीसुद्धा खूप मोठा पाणीसाठा.
गाडी पार्क केली आणि थेट अभयारण्याच्या ऑफिसला भेट घेतली, तिथे आम्हाला सांगितलं दुपारनंतर आपण निघूया.
मग पुन्हा एकदा शेजारच्या हॉटेलमध्ये मोर्चा वळवला थोडी थट्टा मस्करी आणि चहा नाष्टा याच्यामध्ये तास दीड तास कसा गेला कळल नाही.
इकडे रील बनव मित्रांच्या खोड्या काढ यात थोडा वेळ गेला.
मग कराडकर आले पुणेकराले लांबून येणारे पण बरेच लोक आले सगळ्यांशी ओळख करून घेतली आणि पुन्हा अभयारण्याच्या ऑफिसकडे सगळे गेलो.

ऑफिसमध्ये जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला आत मध्ये राहण्यासंदर्भात पूर्ण नियम आणि माहिती समजावून सांगितली. आता आम्हाला नावेतून वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात येणार होतो. ज्याला आपण संवर्धित केलेले कोर अभयारण्य म्हणूया, प्रत्येकी दोन दोन जण एका कुटीवर आम्ही रात्रभर मचानीवर बसून राहणार होतो. त्याच्याबरोबर समोर प्राण्यांचा वास्तव जग पौर्णिमेच्या रात्री आमच्या समोर उलगडणार होतं बघा.
किती मन भरून आलं होतं, हे सगळं पाहायला आतुर झालो होतो.

आता सुरू झाला आमचा छोटासा ट्रेक नावेपर्यंत आणि नावेतून सर्वांना एकेक स्टॉप किनाऱ्याला सोडत मालदेव या ठिकाणापर्यंत.
पण इथवर पोहोचतो पर्यंत आम्हाला दोन्ही बाजूंनी जंगल आणि मध्ये पाणी असं सुंदर दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं आम्ही निष आम्ही निश्चिंत होऊन सोबत असलेल्या अधिकाऱ्याबरोबर निवांत या सफरीचा आनंद घेत होतो तासा दीड तासाच्या अवधीनंतर आमची बोट गदी शेवटी किनार्‍याला लागली शेजारीच दोन अडीचशे फुटाच्या उंचवट्यावर एक झाड होतं जांभळीच त्याच्यावर छानशी मचान मानली होती लाकडांनी आणि पानांनी मस्तपैकी त्याच्यावर अंथरून टाकलं होतं 30 मचान आम्हाला रात्रभर सोबत करणार होती.

नावेतून उतरलो तोवर आम्हाला न्यायला दोन अधिकारी तयारच होते आता अंधारून आलो होतो चंद्र उगवायला थोडी वेळ होती तिच्या सूर्यमामा सूर्यास्ताला चालले होते छान दुसर अशा वातावरणामध्ये पहिल्यांदा आम्हाला जंगलातील कुटीकडे नेण्यात आलं हातात एक एक लाकूड घेऊन सगळ्यात सूचनांचा पालन करत आम्ही चाललो होतो तोच रात्री सव्वा सात साडेसातला डावीकडच्या जंगलाच्या वरच्या बाजूने एका घळीतनं मोठा असा घोगरा आवाज आला आम्ही हाच तो अस्वलाचा आवाज इकडं माणसं फिरकत नसल्याने हिंस्र शापदांचा मुक्त संचार आहे भारी जंगलाचा काय तो फील चालत चालत पायवाटेने नदीच्या वाळलेल्या जमिनीवरनं ठशांचे माप घेत आम्ही कुठे पर्यंत पोहोचलो कुठेच सोलरचा दिवा होता त्या दिव्यावर रात्रभर तिथली लोकं विना तक्रार वर्षानुवर्ष काम करतात

गेल्यावर आम्हाला थोडा चहा नाश्ता देण्यात आला रात्रीचे जेवण उरकायला मस्तपैकी अंधारात आम्हाला साडेआठ नऊ वाजले किरण जंगल काय ते तिथे अनुभव रात किड्यांचा आवाज रात्रीचा आवाज हळूच घुमणारा घुबडाचा आवाज कान कशी नुसते जीव ओतून ऐकत होते आम्ही कमी बोलत होतो आणि जास्त जंगल वाचत होतो वेगवेगळ्या प्रकारचे मुंगळे मुंग्या काजवे प्रकाशाकडे झेपणारे किडे आणि भले मोठे भोंगे सुद्धा इकडे तिकडे पडलेले थोडा पानाचा आवाज झाला की आम्ही त्या बाजूने टॉर्च मारून काय दिसते का पाहत होतो कुठच्या समोरच मस्तपैकी खुर्च्या टाकून आम्ही शांत बसलो होतो एकमेकांकडे बघत ठरलं होतं तसं गप्पा कमी आणि निरीक्षण जास्त.

अर्ध्या तासातच आमच्यासाठी भाकरी आणि पिठलं आणि त्याच्याबरोबर पांढरा भाग असं छान पोटभर जेवण तयार झालं मस्तपैकी ताव मारला बरोबर कांदा आणि चटणी होतीच त्या अंधुक प्रकाशात पटापटा घेऊन अधिकाऱ्यांनी आम्हाला परत माझ्याकडे रवाना केलं चला आता मचान इकडे मोर्चा सुंदर फोटो येतील या आशेने घेतलेले मोबाईल डोळ्यांच्या लेन्स पुढे निकामी ठरले. चंद्र आणि थोडंसं धूसर पाणी याशिवायतात काही दिसतच नव्हतं मग काय केला मनाचा कॅमेरा चालू आणि झाली टिपायला सुरुवात.

चौघेही एकमेकांच्या आधाराने मचानीवर चढलो आमचा एक लठ्ठवा मात्र वर यायला तयार नाही झाला तो म्हणाला रात्रभर मी पाण्यातल्या नावेवर झोपतो तरंग त्या पाण्यातल्या नव्हेत मला काय धोका आणि दिसलं काही प्राणी तर मला हळूच शीळ घालून उठवा आम्ही कसले त्याला उठवतोय आम्ही पण शांतपणे चढलो मचानीवर आणि बसून राहिलो वा वा काय तो चंद्रोदय पाण्यात नुसतं चमचम करत होते चांदणं चंद्र जसा उगवला पंधरा-वीस मिनिटातच वेगवेगळ्या प्राण्यांचा आणि पक्षांचा आवाज रात्रीचे पक्षी सुरुवात झाली आवाज यायला त्यात भयंकर आस्वलाचा आवाज वाटला नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरून येत होता म्हणून बरं जवळ असता तर 70 टक्के नाही शंभर टक्के तंत्रले असते आमची मनात काजव्यांचा उत्सव आणि समोरचा जंगल टिपूर चांदणं असं काय काय साठवत नुसतं वेचत होतो डोळ्यांनी पहाटे तीन-चार ला तिघांनी पण झोपायचा निर्णय घेतला आणि मग पुन्हा जाग आली ती सकाळी उजाडता उजाडता अस्वलाच्या आवाजाने वा ह सूर्योदयाला आपण जंगलात पाहिजे असा सूर्योदय सगळ्यांच्या नशीब नसतो शहरात तर अजिबातच नाही जंगलाचा पूर्ण आनंद घेत सकाळी आम्ही मचारीवरून उतरलो रात्रभर घेतलेले अनुभव एकमेकांशी शेअर करत पाने कडे निघालो हातपाय दोन फ्रेश होऊन पुन्हा एकदा तीरावर जाऊन बसलो आता मात्र छान उजाडलं होतं साडेसात वाजले असतील सकाळची नावाडी दादा आलाच चला आता आमचा मुक्कामाला व्हायची वेळ झाली.

: परतीच्या प्रवासात सगळ्या भिडून ना परत नावे घेत कुणाला काय दिसलं कुणाला काय दिसलं याची उत्सुकतापूर्वक आणि कुत्वालांना चर्चा करत पुन्हा एकदा बामणी ला पोहोचलो हा आणि सांगायचं राहून गेलं जाताना संध्याकाळी सूर्यास्ताजवळच एका दूर तीरावर आम्हाला एक दहा-बारा गावाचा कळप दिसला अगदी फॅमिली लांबूनच आम्ही त्यांना न्याय दुर्बीण होती बरोबर.

तर असा होता आमचा एकंदरीत कोयनेच्या अंतर्भागातला सुंदर असा प्रवास आणि निसर्ग अनुभव पुन्हा पुढच्या वर्षी नक्की भेटू बर का तोपर्यंत निसर्ग तारतम्य बाळगून फिरत राहा धन्यवाद
फोटो ईन्स्टाला milan_pataskar
इथ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>काय ते तिथे अनुभव रात किड्यांचा आवाज रात्रीचा आवाज हळूच घुमणारा घुबडाचा आवाज कान कशी नुसते जीव ओतून ऐकत होते आम्ही कमी बोलत होतो आणि जास्त जंगल वाचत होतो वेगवेगळ्या प्रकारचे मुंगळे मुंग्या काजवे प्रकाशाकडे झेपणारे किडे आणि भले मोठे भोंगे सुद्धा इकडे तिकडे पडलेले थोडा पानाचा आवाज झाला की आम्ही त्या बाजूने टॉर्च मारून काय दिसते का पाहत होतो

खूपच मस्त चित्रदर्शी वर्णन.
------
ते लठ्ठवा त्यांना भिती नाही नाही वाटली का पाण्यातील नावेत नुसतं कसं चालेल?

खूपच सुंदर वर्णन.
थॅंक्स, एक मस्त ठिकाण सुचवल्याबद्दल.
कास पठार नंतर वस्ती आहे का?
रस्त्यात खाण्यापिण्याची सोय आहे का?

खूपच सुंदर वर्णन.
थॅंक्स, एक मस्त ठिकाण सुचवल्याबद्दल.
कास पठार नंतर मधल्या भागात वस्ती आहे का?
?