हितगुज ग्रूप

कॉपीराईटबद्दल प्रश्न

Submitted by सुपरमॉम on 25 August, 2014 - 18:01

मला एका क्राफ्ट प्रोजेक्ट्साठी मराठी सण व त्याबद्दलची माहिती सचित्र बनवायची आहे. उदा- दिवाळी, पोळा, दसरा इ.

तर यासंबंधित चित्रे, फोटो असलेली एखादी वेबसाईट आहे का ज्यातली चित्रे प्रिंट करून वापरता येतील? विकीपीडिया वरची सगळी चित्रे प्रताधिकार मुक्त असतात का?
मी नेटवर बराच सर्च केला पण कोणती चित्रे प्रताधिकार मुक्त आहेत हे कसे ओळखायचे? मला यातली शून्य माहिती आहे. कोणी गाईड करू शकेल का?

बच्चे कंपनी आणि घराच्या रंगणार्‍या भिंती

Submitted by नलिनी on 8 August, 2014 - 12:21

माझ्या पाहाण्यात बर्‍याच घरात मला हि समस्या दिसली की त्या घरातील लहान मुले बर्‍याचदा पेन, स्केचपेन, पेन्सिल वापरून भिंतींवर लिखाण करतात, अर्थात त्या रेघोट्याच जास्त असतात.
आपण कोणाच्या घरात भाडेकरू म्हणून राहात असू तर आपल्याला भिंती पुर्ववत करून द्याव्या लागतात. स्वतःचे घर असेन तर हौशेने दिलेल्या रंगावर आपल्याला ह्या रेघोट्या नको असतात. तर आपण ह्यासाठी काय करू शकतो ह्यासाठी हा धागा.

१) घरात मुल रांगायला लागले ही की शक्यता गृहीत धरायला हवी की आपले मुल उद्याला भिंतींवर लिहिणार, त्यासाठी आधीपासूनच उपाययोजना करायला हव्यात.

व्यसन नावाचा राक्षस!

Submitted by अविनाश खेडकर on 8 August, 2014 - 02:23

आज एका मित्राच्या अंतयात्रेस गेलो होतो. आमचा १० वर्षाचा सहवास कायमचाच संपला होता. त्याचे कुटूंबीय आक्रोश करत होते. त्याच्या ऐन तीशीत या जगाचा नोरोप घेण्याने सगळ्यांनाच हळहळ वाटत होती. पण माझ मन त्याचा मृत्यू मान्य करायला तयार होत नाही. कधी काळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा तरूण दारूच्या नादाला कधी लागला ते आम्हालाही कळल नाही. पुढे त्याचे हे व्यसन एव्हढे वाढले कि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

मुलाचा अभ्यास कसा घ्यावा

Submitted by राज1 on 24 July, 2014 - 04:05

माझा मुलगा 2ND STANDARD (७ वर्षे) आहे.
घरी अभ्यास घ्यायला लागल्या वर T.V. वर किंवा खेळण्यातील गाड्या खेळत बसतो. आमच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तोंडी उत्तरे पटकन देतो. कधी मारल्यावर ५ किंवा १० मिनटे अभ्यास करतो. नेहमी मारून अभ्यास करून घेणे हि बरोबर नाही. शाळेतील HOME WORK हि नेहमी अपूर्ण आसतो.
त्याचे बोलणे हि थोडे बोबडे आहे. व तोंडात बोटे घालण्याची सवय आहे. या बद्दल कृपया सल्ला द्या.

विषय क्रमांक २: ३ असामी.

Submitted by Priyanka Pathak on 14 July, 2014 - 11:03

कंपनीतून परत येताना तीन बस बदलत घरी पोचणं म्हणजे अनुभवांची एक नवी साखळी सुरु करण्यासारखं आहे. रोज एका नवीन कडीची त्यात भर पडतेय, अन तिच्या लांबीबरोबरच मीही थोडीफार का होईना पण खऱ्या अर्थाने वाढतेय...
आज एकाच पदावर भूषित असलेल्या ३ वेगवेगळ्या व्यक्तींच्या ३ वेगळ्या स्वभावांच्या मजेशीर अनुभवाची भोक्ती ठरल्यानंतर मी या प्रवासाच्या प्रेमात पडलेय ....

विषय क्रमांक २ - बाई मागच्या बाई : रुक्मिणीबाई

Submitted by अनया on 13 July, 2014 - 13:01

विषय-२ : बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई

‘कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा, विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे.’ हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या रुक्मिणीबाई!

जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

विषय क्र.१ - ''मोदी जिंकले! पुढे काय?"

Submitted by vt220 on 8 July, 2014 - 09:07

१६ मे २०१४ - भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस. कॉंग्रेसच काय भारतीय जनता पक्षाने सुद्धा अपेक्षा केली नव्हती इतक्या जागा पक्षाला मिळाल्या. पक्षातल्या मोदीविरोधकांना सुद्धा ह्या जयात मोदींचा महत्त्वाचा वाटा मान्य करावा लागला. तळागाळातल्या लोकांना प्रगती नुसती आकड्यात दाखवून चालत नाही त्यांना ती अनुभवतासुद्धा आली पाहिजे. हीच सत्ताधाऱ्यांची खरी कसोटी असते. २००४ सालच्या निवडणुकीत भाजप पक्षाने "इंडिया शायनिंग" करत अर्थव्यवस्थेची वाढ दाखवण्याचा आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

लिखाण

Submitted by मित्रहो on 15 May, 2014 - 12:20

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.”

इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन श्री नितीन गडकरी यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2014 - 02:20

Nitin Gadkari.jpg

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.

या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप