सोडेक्सो कूपन कुठे मिळतात?

Submitted by अश्विनी डोंगरे on 5 May, 2014 - 00:01

मला माझ्या ऑफिसमधल्या लोकांसाठी गिफ्ट व्हाऊचर घ्यायची आहेत. सोडेक्सो बर्‍याच ठिकाणी चालत असल्यामुळे ते घ्यावे असा विचार आहे. ते मिळवण्यासाठी काही खास अटी आहेत का? अधिक माहिती कुठे मिळेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.sodexo.com/en/default.aspx

पुण्यात असाल तर खालील नंबरवर संपर्क साधा

Sodexo SVC India Pvt. Ltd.
810 - Lloyds Chambers, Block No 2, 409 Mangalwar Peth, Pune 411 011.
Tel : (D) +91 20 66406751
Fax : +91 20 66406761
www.sodexo.com

Sodexo - Benefits and Rewards Services
Tel: 020 – 66406759 / Mob: 9922991679

अजुन काही माहिती हवी असल्यास संपर्कातुन ईमेल करा.

अश्विनी, आमच्या ऑफिसमधे आम्हाला ११००/- रुपयेची कुपन्स दर महिन्याला मिळतात. मी दोराबजीची विकली ग्राहक असल्यामुळे कुपन्स संपवायला मला त्रास होत नाही, पण हल्ली बर्‍याच ठिकाणी सोडेक्सो कुपन्स घेत नाहीत. किंवा जादा चार्ज घेतात ( उदा. ग्राहक पेठ). शिवाय सोडेक्सो पेमेंट्सचे क्यु वेगळे असतात. डॉमिनोज, दोराबजी आणि बहुतेक हायपर सिटी सोडता हल्ली कुपन्स संपवणे ताप झाला आहे. आमच्याकडे कॅन्टीनमधे आणि प्रिमाइसमधल्या CC Day मधे चालतात. पण जरा चौकशी करुन मगच गिफ्ट कर. नाहीतर हल्ली क्रॉसवर्ड, मदर केअर, मम एन मी, वेस्ट साइड अशा बर्‍याच ठिकाणी गिफ्ट वाउचर्स मिळतात ती देवु शकतेस.

माउ ती बहुदा मील पास नाही " गिफ्ट व्हाऊच" बद्दल म्हणते आहे. जे ५००० पर्यंत टॅक्स फ्री असते. Uhoh

मीलपास बद्दल मनिमाउ +१

मनिमाऊ, बरोबर आहे. सोडेक्सो कूपन्स ( मील पास ) संपवणे जिकीरीचे आहे. आणि त्यातून कोणी घेतली तर खूपजण डिस्कउंट रेटलाच घेतात. म्हणजे १००रू. ची कूपन्स दिली तर ८५ रू. खरेदी करता येते.
कमिशन रेट ही खूप जास्त असतो. त्यामुळे जे कूपनं अ‍ॅट पार घेतात तिथूनच खरेदी करावी लागते. आम्हालाही मिळतात ऑफिसमधून त्यामूळे स्वानुभव आहे हा.

मी माझ्या किराण्यावाल्यालाच सोडेक्सोसाठीच्या प्रोसेस बद्दल सांगितले. मला तरी किराणा घेता येतो.

गिफ्ट वाउचर्स कशासाठी वापरतात >> टॅक्स बेनिफीट साठीच. ५००० रु पर्यंत चालतात वर्षाला.

मी लक्ष्मीरोडवरच्या बर्‍याच मोठ्या दुकाणात वापरते. ( वाम, जयहि<द, मेन्स अ‍ॅव्हेनुय , हाय फॅशन ). आपल्याला लिस्ट मिळते Happy

जादा चार्ज घेतात ( उदा. ग्राहक पेठ).>>>>
@मनिमाउ : ग्राहक पेठेत जादा चार्ज घेत नाहीत. फक्त विकांता ला संध्यकाळी सहा नंतर २% जादा चार्ज घेतात.