इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत. या दोन वर्षात जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटण्यासाठी त्यांचेकडे गेलो त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. परंतु असे जीवन संपवणे याला कायदेशीर मान्यता नाही व तसे केल्यास ती आत्महत्या ठरेल व आयुष्यात त्यांनी कधीही कायदा मोडला नाही त्यामुळे तो मार्ग त्यांना वापरावयाचा नाही. जे काही करेन ते कायदेशीरच असले पाहिजे हा त्यांचा निश्चय आहे.
यावर आपले व्विचार काय आहेत ?
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?
सर, जीवनाच्या किती विविध
सर,
जीवनाच्या किती विविध अंगांना तुम्ही सहज स्पर्शून जात आहात आणि तेही इतक्या झंझावाती वेगात! सलाम!
कोणतीही महत्वाची कर्तव्ये
कोणतीही महत्वाची कर्तव्ये शिल्लक नसतील अथवा ती पार पाडण्याची क्षमता नसेल ,तर शाररीक, मानसिक आजार /त्रास असणार्या व्यक्तीला इच्छामरणाचा हक्क असावा.
नाही.
नाही.
सरसकट कायदा झाल्यास त्याचा
सरसकट कायदा झाल्यास त्याचा गैरवापर व्हायची शक्यता बरीच आहे त्यामुळे हे केस बाय केस बेसिस वर ठरवण्यात यावे. थोडे इन्सेन्सिटिव वाटेल पण.. भारतातल्या न्यायप्रक्रियेचा वेग पाहता..हे खटले प्रलंबित राहिले तर त्यांची इच्छा कदाचित आपोआप पुर्ण होइल.
(नुकतच बॉस्टन लीगल नावाच्या मालिकेत अशीच एक केस दाखविली ज्यात जज. कायद्यात बदल करायला नकार देते पण अशा व्यक्तिची इच्छा मरणाची इच्छा मान्य करते.. After a lot of deliberation and compelling arguments)
बॉस्टन ग्लोबल नावाच्या
बॉस्टन ग्लोबल नावाच्या मालिकेत
<<
बॉस्टन लीगल म्हणायचंय का तुम्हाला?
दोन एकसारखे धागे झाले आहेत.
दोन एकसारखे धागे झाले आहेत.
हो. लिव्हिंग विल द्वारे तो
हो. लिव्हिंग विल द्वारे तो अधिकार असावा.
हो. पण भारतात सध्या असा
हो.
पण भारतात सध्या असा कायदा योग्य प्रकारे अमलात येऊ शकेल अशी सामाजिक सुव्यवस्था आणि सुस़स्कृतता नाही. उदा. सध्या गर्भपाताची परवानगी आहे पण त्याचा कीती गंभीर दुरूपयोग सर्वच सामाजिक स्तरातून केला जातोय हे उघड दिसते आहेच. इच्छा मरणाचा कायदा झाल्यास त्याचा असाच दूरूपयोग होण्याची शक्यता जास्त वाटते.
माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे
माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत.
कोणतीही महत्वाची कर्तव्ये शिल्लक नसतील अथवा ती पार पाडण्याची क्षमता नसेल ,तर शाररीक, मानसिक आजार /त्रास असणार्या व्यक्तीला इच्छामरणाचा हक्क असावा.
अहो पण आपल्या थोर हिंदू धर्मात म्हणतात ना की शरीराचे सर्व भोग ही कर्माची फळे असतात. समजा आहे हा जन्म संपवला तरी भोग भोगणे संपले नसेल तर दुसरा जन्म येईल नि दुसर्या जन्मात आणखीन वाईट भोग भोगावे लागतील!!
लिंबूटिंबू लवकर इकडे या, हे लोक बघा धर्म बुडवतात!
हे झाले धार्मिक कारण.
जरी धर्म, देव यातून बाजूला काढला तरी -
"शाररीक, मानसिक आजार /त्रास असणार्या व्यक्ती" च्या इच्छेला कोर्ट मान्यता देईल का? देत असेल तर काही लोक त्यांच्या त्या अवस्थेचा फायदा घेऊन त्यांचे मृत्यूपत्र सोयिस्कर रीत्या बदलून घेतील ना? मग ते बरोबर होईल का? माहित आहे ना, कधी कधी मृत्यूपत्राबद्दल पूर्वी ज्यांचे नावहि ऐकले नाही असे नातेवाईक आपला हक्क सांगतात, कोर्टात जातात. मग भिजत घोंगडे! त्यात त्यांनी खुनाचा आरोप केला तर? या झंझटी हव्या आहेत का? म्हणजे आजारी माणूस बिचारा स्वतःचे भोग भोगतो, नि अर्थातच बाकीच्यांना त्याचा त्रास होतोच. पण निदान मृत्यूनंतर तरी सारे कसे शांत शांत होते. त्या ऐवजी मेल्यावरहि त्यांना अधिक त्रास व्हावा असे वाटते का?
इच्छामरणाचे दुसरे नाव
इच्छामरणाचे दुसरे नाव आहे,'संथारा व्रत' ! हे व्रत घेण्यासाठी कोठल्याही कायद्याची गरज नाही. जेवण, पाणी बंद करा आणि 'हरीका बुलावा' येईपर्यंत वाट पहा.
'संथारा व्रत' हे शिंदे
'संथारा व्रत' हे शिंदे साहेबांनी सांगितलेले व्रत माझ्या आजीने स्वीकारले होते मृत्युच्या आधी १५ दिवस. पंधरा दिवसातच तिचा मृत्यू झाला . तिच्या वयाच्या ८९ व्या वर्षी. तिला अजिबात जगायची इछ्या नव्हती त्यामुळे तिने जेवण /पाणी औषध सगळच बंद केल .नाही म्हणजे नाही तिने ऐकलच नाही कुणाच
पण हे व्रत स्वीकारायला जबर इछ्याशक्ती लागतेच आणि मनाचा खंबीरपणा
इच्छामरणाचे दुसरे नाव
इच्छामरणाचे दुसरे नाव आहे,'संथारा व्रत' ! ................प्रायोपवेशन! अन्नपाणी वर्ज्य करून देहत्याग करणे.
काही घरातल्या म्हातार्यांना
काही घरातल्या म्हातार्यांना संथारा 'दिलेला' पाहिलाय, अन म्हणूनच चर्चाप्रस्तावाला नाही असे उत्तर दिलेले आहे.
दोन दोन धागे झाले आहेत.
दोन दोन धागे झाले आहेत. संपादकांनी चर्चा एकाच धाग्यावर आणावी. दुसर्या धाग्यावर मी इच्छामरणा संबंधी दुवे दिले आहेत. परत परत तेच तेच लिहायला नको वाटते.
<<काही घरातल्या
<<काही घरातल्या म्हातार्यांना संथारा 'दिलेला' पाहिलाय>> बापरे . काहीतरी भयानकच
सुजा, भयानक नव्हे, वास्तव आहे
सुजा, भयानक नव्हे, वास्तव आहे ते!
ह्यावरच मागे एक मक्ता रचला होता मी!
'बेफिकीर' पुढची पिढी पाहुनी कळले
की म्हातार्यांना भूक भूक का होते
जैन समाजातील वृद्ध असा संथारा वगैरे घेताना आढळतात, पण अनेकदा ते नक्की काय असते हे समजत नाही.
हे संथारा व्रत घेण्याएवढी व
हे संथारा व्रत घेण्याएवढी व त्याचे पालन करण्याइतकी कठोर मनःशक्ती व्रुद्धांची अश्या वेळेस असते? मला वाटले होते की वयस्कर व नैसर्गिक मृत्यूने निवर्तलेल्या व्यक्तींची तहान भूक आपोआपच कमी होत जाते. प्राणी व पशु पक्षी देखील असा अन्नत्याग करतात असे ऐकले होते.
इच्छामरणाचे दुसरे नाव
इच्छामरणाचे दुसरे नाव आहे,'संथारा व्रत' ! हे व्रत घेण्यासाठी कोठल्याही कायद्याची गरज नाही. जेवण, पाणी बंद करा आणि 'हरीका बुलावा' येईपर्यंत वाट पहा<<<
सुरेश शिंदे सर, माफ करा, पण आपल्या ह्या मताशी असहमत आहे.
एक तर संथारा व्रत हे इच्छामरणाचे दुसरे 'नांव' नाही आणि संथारा माणूस स्वतःहून घेतो की त्याला दिला जातो हे कळायला अनेकदा वाव नसतो.
बेफि हे वास्तव आहे ?अस काही
बेफि हे वास्तव आहे ?अस काही असत? .. शी .कल्पनाच करवत नाही
बापरे भयानक आहे हा प्रकार
बापरे भयानक आहे हा प्रकार
ही घरातल्या म्हातार्यांना
ही घरातल्या म्हातार्यांना संथारा 'दिलेला' पाहिलाय,>>> आईग्ग!
कुफेहेपा संथारा लादणारे लोक्स?
अश्विनी संथारा म्हणजे अगदी
अश्विनी संथारा म्हणजे अगदी संथारा नव्हे गं.
जैनच लोक पाहिजेत असेही नाही.
म्हातार्यांच्या खाण्या- पिण्या औषधाकडे लोक सरळ काणडोळा करतात.
घराबाहेर गोठ्यात किंवा सामानाच्या खोलीत, शेतघरात ठेवतात.
असो.
माझ्या आजीने प्रायोपवेशन केले होते. नर्सकडून फक्तं आय वी लावून घ्यायची पण अन्नपाणी नाही.
म्हातार्यांच्या खाण्या-
म्हातार्यांच्या खाण्या- पिण्या औषधाकडे लोक सरळ काणडोळा करतात.
घराबाहेर गोठ्यात किंवा सामानाच्या खोलीत, शेतघरात ठेवतात. >>>> तेच गं. इब्लिसांच्या बोलण्याचा अर्थ कळला होता म्हणूनच वाईट वाटलं. पाप नाही का हे?
माणसाची जगण्याची आसक्ती संपली
माणसाची जगण्याची आसक्ती संपली की तो निघाला (मी नैसर्गिक मृत्युबद्द्ल बोलते आहे) प्रत्येकाला इच्छामरणी होता येतं, खरोखर आसक्ती संपली असेल तर.... आसक्ती संपली पण भोग संपले नसतील तर भोग भोगावेच लागणार, कटू सत्य (हे फक्त त्या व्यक्तीलाच नक्की माहित असतं, आसक्ती का भोग ?).
कायदेशीर नको मरणार्याच्या भिती, परावलंबित्वाची शिक्षा इतरांनी गुन्हा करून का भोगायची?
हो ना !
हो ना !
भारताच्या काही प्रांतांमध्ये
भारताच्या काही प्रांतांमध्ये वृध्द व्यक्तींना ते "डोईजड" झाले की विधिवत सर्व आप्त स्वकीयांना बोलावून सोहोळ्यानिशी त्या वृध्दाला कायमचा 'निरोप' द्यायची प्रथा आहे. अशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार असा अंदाज येताच असे कित्येक वृध्द घर, गाव सोडून परप्रांतात भीक मागून अर्धपोटी जगणे पसंत करतात. त्यामुळे अशा प्रथा जोवर लोकमान्य आहेत व त्या त्या जनतेला त्यात काही गैर वाटत नाही तोवर असा कायदा भारतात होणे घातकच ठरेल.
(कधी नव्हे ते) इब्लिसच्या ठाम
(कधी नव्हे ते) इब्लिसच्या ठाम "नाही" या उत्तराशी सहमत.
हो, अगदी माझ्यावर जरी "ये मृत्यो ये अन आता तरी सोडव या संसारतापातुन" अशी आळवणी करायची वेळ आली तरि नाही हेच उत्तर राहील.
>>>> त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही <<<<<
हिन्दु धर्मशास्त्राप्रमाणे माझे जीवन, ये जन्मीचे वा पूर्वजन्मीचे, मी कृतार्थपणे(?) जगलोय असे म्हणण्याचा, केल्या कर्माच्या फलाचा हिशेब ठेवण्याचा अधिकारच नव्हे तर या कर्मामुले हे फल ही सन्गत लावण्याची अक्कलही इश्वराने मला बहाल न केल्यामुळे जगलेले जीवन अर्थात केलेले प्रत्येक कर्म "कृतार्थपणेच" केलय असे मी कधीच म्हणू शकत नाही. अन केल्या प्रत्येक कर्माचे फल मजसमोर ज्या रुपात भोगण्याकरता येईल त्यास सामोरा जाणे हेच इतिकर्तव्य असेल.
ही धर्मशास्त्रीय बाब
पण वर अनेकान्नी सुचविल्याप्रमाणे, या कायद्याचा महाभयानकरित्या गैरफायदा घेतला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
संथारा व्रत हे जैन धर्मातील आहे व ऐच्छिक आहे. मुद्दामहून केल्या जाणार्या आबाळीला त्याचे नाव देणे अयोग्य आहे. मात्र असे व्रत अस्तित्वात असल्यामुळे, कोणी कुटुम्बिय येनकेनप्रकारेण सततची भुणभुण लावुन जीणे हराम करुन एखाद्या व्यक्तिला संथारा घेण्यास प्रवृत्त करत असेल तर ते अयोग्य आहे, पापकारक आहे. असे होत असल्याचे ऐकण्यात नाही.
हिन्दु धर्मामधे वानप्रस्थाश्रम सांगितला आहे, त्या व्यतिरिक्त सर्व हवाला देवावर सोडून त्याचे भेटीकरताच, "प्रायोपवेशनाचा" मार्गही आहे.
स्वा. सावरकरान्नी प्रायोपवेशन करुन देहत्याग केला.
[त्यान्चेबाबत एक वाक्य आहे की "आयुष्यभर हिंसा/युद्ध/सैनिकीकरण्/ताकद यांचा पाठपुरावा करणारे सावरकर अंतिमतः मात्र स्व इच्छेने प्रायोपवेशन अर्थात उपोषण करुन इहलोक त्यागते झाले, तर आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार करणारे..... " जाऊद्यात, इथे आग लागायला नको. पण यावरुन हे नक्की सिद्ध होते की जन्ममरणाचा फेरा मानवाचे हाती नाही.
वर कुणी म्हणले आहे की "अमके पाप नाही का?", तर उत्तर हो असेच आहे. व त्या पापाचे फल जरुर जरुर मिळतेच मिळते, याच जन्मात भोगावे लागते हे नक्की! अतिपापी असेल तर पुढचा जन्म!
कित्येकजण भोळसट पणे विचारतात की मी या जन्मी तर पाप केले नाही तरि मला का त्रास? तर ते पूर्वजन्मीचे कर्मफल असते, ते भोगावेच लागते असे हिंदुधर्मशास्त्र सांगते.
असे भोगताना काही लोक इश्वराला शिव्याशाप घालतात, काही लोक इश्वराला मानतच नाहीत, काही लोक भोग भोगुन सम्पवुन टाकतात तर मजसारखे काही लोक सामोर्या आलेल्या प्रत्येक भोगातुन काही अध्यात्मिक उपयोगिता शोधतात.
जसे की गेली सहासात वर्षे मला दातांचा त्रास आहे (कुंडलीमधे तो योग प्रबळ आहे), मी अजुनही कवळी वगैरे बसवु शकलो नाहीये, शब्दशः काहीही चावुन खाता ये त नाही कारण दाढाच नाहीत, पण मी त्याचाही फायदा उचलतो, एक तर चघळता ना लाळ जास्त मिसळते, एकेक घास शम्भरवेळा चघळला जातो, अन चव/वास्/स्वाद वगैरेवरची " वासना" दूर करण्यासाठी, आहारावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापेक्षा दुसरा अधिक चांगला पर्याय माझेसमोर तरी नाही अशी खात्री मी करुन घेतली आहे. व आहे त्यात सुखी आहे, ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान ही उक्ति जगतोय.
गेली साताठ वर्षे मूळव्याध व भगंदराचा त्रास आहे, यामुळे उठता बसता एकप्रकारची सावधानता आली आहे, इतकी की मी बसल्यावर बसल्याजागी चिरडून काही हत्या होत नाहीना हे बघण्याकरता मला वेगळा उपाय करावा लागत नाही इतका हळूवारपणे मी बसतो उठतो!
माझे कुन्डलीमधे याचेही योग प्रबळ आहेत.
कुण्डलीमधे हा योगही प्रबळ स्पष्ट दृगोच्चर आहे. असो.
अस्थमा हा तर माझे पाचवीला पूजल्याप्रमाणे माझी संगत धरुन आहे. मी त्याचाही फायदा करुन घेतोय.
उत्तररन्गामधे काय काय सोबत घेऊन जगावे लागणार याची चर्चा म्हणून वरील विषय बोलण्याचे ओघात मान्डला बरे!
तेव्हा आला दिवस नव्हे तर प्रत्येक क्षण साजरा करीत जगणे हेच श्रेयस्कर, उगाच कृतार्थ वगैरे भलिथोरली विशेषणे लावुन स्वतःचे जगण्याचे उदात्तीकरण न करता अजुनही काय करायचे राहिले आहे त्याची उजळणी करुन उर्वरित आयुष्य इश्वराचे आभार मानित व्यतित करावे हे उत्तम.
अन या पोस्टचे सुरवातीचे हे वाक्य....>>>>> हो, अगदी माझ्यावर जरी "ये मृत्यो ये अन आता तरी सोडव या संसारतापातुन" अशी आळवणी करायची वेळ आली तरि नाही हेच उत्तर राहील. <<<<< तर कुन्डलीत अशी वेळ येण्याचे योगही प्रबळ आहेत, सबब मी आत्तापासुनच मनाची अन शरिराचि तयारी करतोय. अष्टमातला शनि अन केतू मला असे "सहजासहजी" म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की " फुकाफुकी" थोडी मरू देणारेत??
<<भारताच्या काही
<<भारताच्या काही प्रांतांमध्ये वृध्द व्यक्तींना ते "डोईजड" झाले की विधिवत सर्व आप्त स्वकीयांना बोलावून सोहोळ्यानिशी त्या वृध्दाला कायमचा 'निरोप' द्यायची प्रथा आहे.>> कायमचा निरोप द्यायचा म्हणजे काय करायचं ?
सुजा, वेगवेगळ्या प्रकारे त्या
सुजा, वेगवेगळ्या प्रकारे त्या अगोदर तब्येतीने व्यवस्थित असणार्या वृद्ध व्यक्तीला आजारी पाडण्याचे प्रकार आहेत.
http://archive.tehelka.com/story_main47.asp?filename=Ne201110Maariyamma.asp
हे वाचा.
ह्या लिंकमधून << Thalaikoothal works thus: an extensive oil bath is given to an elderly person before the crack of dawn. The rest of the day, he or she is given several glasses of cold tender coconut water. Ironically, this is everything a mother would’ve told her child not do while taking an oil bath. “Tender coconut water taken in excess causes renal failure,” says Dr Ashok Kumar, a practicing physician in Madurai. By evening, the body temperature falls sharply. In a day or two, the old man or woman dies of high fever. This method is fail-proof “because the elderly often do not have the immunity to survive the sudden fever,” says Dr Kumar.>>
बापरे अकु.. हे भयंकर आहे.
बापरे अकु.. हे भयंकर आहे.
Pages