आता जिणे बास झाले...
आता जिणे बास झाले
पावलो पावली उपहास झाले
वाट पाहतो रोज तुझी
तुझे येणे महामास झाले
झोंबता वारा सहीला परी
झुळुक येणे त्रास झाले
तरळते डोळ्यात पाणी
तुझ्या आठवांचे भास झाले
आपल्यांनीच छळीले आता
वैरीच आता विश्वास झाले
झेलले वार किती तरी
जखमांचे व्यास झाले
सजवले होते फुलांनी तरी
कफनाचे निमित्त खास झाले
राजेंद्र देवी.
रविवारी मित्राकडे पार्टीला गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असताना त्याचा लहान मुलगा - वय वर्षे पाच आमच्याजवळ आला. त्याने मित्राचे गाल धरून विचारलं, डॅडी मुसलमान म्हणजे काय ? मित्राचा चेहरा पडला.कारण एक मुसलमान मित्रही बरोबर होता. मित्राच्या बायकोने अरे असं काही नसतं असं सागून त्याला ओढलं. तेव्हां आमचा मुस्लीम मित्र मधे पडला. मित्राने मग सावरत त्याला विचारल कुठूनही काहीही ऐकून येतोस. कुणी सांगितला तुला हा शब्द. तर त्याने आईचं नाव घेतलं. आता त्याच्या बायकोचा चेहरा खर्रकन उतरला. ती कावरी बावरी होऊन इतर बायकांना सांगू लागली कि मुलाने विचारलं कि आमीर खानचं नाव आमीर खान का आहे ?
कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन (सॅन फ्रॅन्सिस्को बे एरिया) अर्थात कला दोन कर्यक्रम सादर करित आहे:
मध्यमवर्गालाही अंतर्मुख करणारं दोन अंकी नाटक "चाहूल" (५ जुलै दुपारी १ ते ३ - Ballroom ABC).
आणि थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्या तीन एकांकिका समीप रंगमंच मध्ये (६ जुलै दुपारी २ ते ५ - Room 551A+B).

अवश्य यावे !
एक सुखद बातमी
सोन्याचे भाव कमी झाले
मध्यंतरी सुमन कल्याणपूरकरचे ‘हरिनाम मुखी रंगते’ हे गाणे ऐकत होतो. त्यातील एक कडवे मनाला अतिशय भिडले. मीरा श्रीकृष्णाला विनवणी करते की, ‘‘घरट्यात माझीया आनंदाचा ठेवा । तूच यदुनाथा सदा असू द्यावा ॥ इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते । गोड नामी तुझ्या रंगते ॥‘‘ आणि त्यानंतर मी माझ्या घरट्यातील आनंदाचे क्षण टिपण्यास सुरुवात केली.
नमस्कार मंडळी!
मे महिन्यामधे मी फॅमीली सोबत (मी, बायको आणि मुलगा वय ६ वर्श) देव दर्शन (महालक्ष्मी व जोतिबा) आणि कोल्हापुर दर्शन साठी येनार आहोत. २ ते ३ दिवसाचा प्लान आहे.
दर्शनाची कुठुन सुरुवात करायची? रहाण्यासाठी व जेवणासाठी योग्य हॉटेल (रिजनेबल) तसेच कोल्हापुर दर्शनासाठी कोणती ठीकाणे आहेत ते जाणकारांनी सुचवीणे माहीती देणे, ही विनंती.
धन्यवाद!
।। श्री ।।
एकदा एका घरी हळदीकुंकवाला गेले असताना घरच्या बाईंनी माझी एका बाईंशी ओळख करून दिली. नांव, गांव, कुठे राहतो विचारताना लक्षात आले कि आम्ही नातेवाईकच आहोत. म्हणजे त्या बाई माझ्या चुलत आते जाऊबाईच लागत होत्या.त्याची खातरजमा झाल्यावर त्यांनी मला घरी बोलावले. त्या रहातही होत्या आमच्या घराजवळच. त्यानंतर लगेच श्रावणातल्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी घरी बोलावले. मी लहान असल्याने मीच आधी त्यांच्या कडे जाणे सयुक्तिक होते.
हा नवीन धागा सुरू करताना मनात एकच विचार होता की जुनी माहित असलेली...तर काही विस्म्रुतीत गेलेली नाट्यगीते यांची उजळणी यानिमित्ताने व्हावी.
या धाग्यावर नाट्यपदे पुर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही; पण त्या नाट्यगिताचा अर्थ, गायक, गायिका, नाटक, नाटककार, राग, ताल, त्याची पार्श्वभुमी, मनोरंजक किस्से इ. माहीती जरुर लिहावी. त्यामुळे त्या नाट्यगितांचे रसग्रहण करता येईल.
तसेच विस्म्रुतीत गेलेली नाट्यपदे ह्या धाग्यावर पुर्ण स्वरुपात दिलीत तर त्याची माहीती अनेकांना होईल.
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल
हा एक निलम खेळच आहे. हॅरी पॉटरच्या पंख्यांना नक्कीच आवडेल.
हयामध्ये दोन पात्रांची नावे द्यायची आणि ते समोरासमोर आल्याचा प्रसंग दाखवायचा. मग दुसरया पात्राचा धागा पकडुन नविन पात्राबरोबरचा प्रसंग रेखाटायचा.
उदा:१ डंबल्डोर्>>मेक्यानिगोल
प्रसंग->हॅरीला बाळ असताना डर्स्लींकडे सोडताना.
२. मेक्यानिगोल>>नेव्हिल
प्रसंग-> शाळेच्या पहिल्या दिवशी बेडुक हातातुन सुटतो तेव्हा त्या नेव्हिल कडे रागाने बघतात.
३. नेव्हिल>>------:)

याप्रमाणे दुसरे नाव पकडुन खेळ सुरु ठेवता येतो.