इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन श्री नितीन गडकरी यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2014 - 02:20

Nitin Gadkari.jpg

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.

या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.

यानंतर हाच अर्ज श्री सुमीत दलाल यांच्याकडुन पुन्हा ऐप्रील मधे केला गेला. याचा निकाल आज लागुन त्यांच्या विरुध्द कोणतीही चौकशी प्रलंबीत नसल्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन देण्यात आली आहे.

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान इनकम टॅक्स डिपार्ट्मेंटकडुन छापे मारले गेले होते पण त्यात काही निष्पन्न न होता तुम्हाला कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागणार नाही हे वेळेत कळवण्याची जबाबदारी इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने पार पाडली नाही.

फेबृवारी मधे केलेला अर्ज बाद का केला गेला हे आता दुसर्‍या एका आर टी आय च्या खाली विचारायची आवश्यकता निर्माण झाली आहे. या अर्जाचा निकाल जर निवडणुकी पुर्वी लागला असता तर केवळ श्री नितीन गडकरीच नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते आणि मतदार यांना मतदानापुर्वी एक दिलासा मिळाला असता.

भारतात कोणताही कायदा आणा त्याचा वापर न करता बेछुट आरोप करणारे कार्यकर्ते आणि निपक्षपाती पणे चौकशीला सामोरे जाता यावे म्हणौन पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा देणारे श्री नितीन गडकरी यांना स्वतः हुन काहीही न कळवणारे इनकम टॅक्स डिपार्ट्मेंट कुणा राजकीय नेत्याच्या नियंत्रणाखाली चालते असे म्हणावे लागेल.

असो एकापाठॉपाठ एक क्लीन चिट मधुन भाजप नेते बाहेर पडत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीन गडकरी यांचे हार्दिक अभिनंदन.

विरोधकांच्या मागे काही आगापिछा नसलेल्या बाबींविषयी चौकशीचा ससेमिरा लाऊन द्यायचा आणि त्या़ंची राजकीय प्रगती रोखायची असा काही जणांचा हेतू आता विफल होत चालला आहे असे आता गेल्या काही दिवसात मोदी, गडकरी, आणि अमित शहा यांना मिळालेल्या क्लिन चिट मधून स्पष्ट आहे.

आधी दंगल दंगल खेळून झाले, त्यातून मोदींना अडकवता येत नाही म्हटल्यावर अडानी अडानी बोंबलून झाले. मग स्वतः अडानी व सरकारी कागदपत्रांवरून अडानी व केन्द्र सरकारलाही त्याच रेटने जमीन दिली गेली म्हटल्यावर तिथेही मोदी विरोधक तोंडावर आपटले. मग स्नूपगेट स्नूपगेट म्हणून त्रास दयायचा काढायचा प्रयत्न झाला तो ही त्या मुलीने व वडिलांनी "आम्ही आभारी आहोत" म्हटल्यावर फसला. मग मोदींचा विवाह यावरुन अश्लाघ्य वैय्यक्तिक टीका झाली. पण मग एका वाचाळ नेत्याचा 'हाथ' एका आम आदमी के साथ नको त्या ठिकाणी असल्याचे फोटो सामोरे आल्यावर मोदींचा (कायदेशीर) विवाहाचा विषय आपोआप मागे पडला आणि मोदी विरोधकांचा पुन्हा मुखभंग झाला. तर ते असो. या दरम्यान गडकरींसारख्या इतर भाजप नेत्यांना बाकी काही सापडत नाही म्हटल्यावर अशा चौकशीद्वारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तर तेही असोच.

नितीन गडकरी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

<यानंतर हाच अर्ज श्री सुमीत दलाल यांच्याकडुन पुन्हा ऐप्रील मधे केला गेला. याचा निकाल आज लागुन त्यांच्या विरुध्द कोणतीही चौकशी प्रलंबीत नसल्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन देण्यात आली आहे.>
याचा अर्थ चौकशी पुर्ण होउन आता न्यायालयात आरोप वगरे दाखल करणार असतील..
याचा अर्थ क्लिन चिट असा होत नाही असाच ना?

लोकसत्ता दि. १२ / ०५ / २०१४

नितीन गडकरींना प्राप्तिकर विभागाकडून दिलासा

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि नागपूरमधील पक्षाचे लोकसभेसाठीचे उमेदवार नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने क्लीन चीट दिली आहे. गडकरी यांच्याविरूद्ध प्राप्तिकर खात्याकडून कोणतीची चौकशी सुरू नसून, त्यांच्याविरुद्ध एकही चौकशी प्रलंबित नसल्याचे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.
गडकरी यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाकडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, तसेच कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, ही माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्तिकर विभागाला विचारण्यात आली होती. सुमित दलाल यांनी ही माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना प्राप्तिकर विभागाने गडकरी यांच्याविरुद्ध एकाही प्रकरणी चौकशी सुरू नसल्याचे म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाच्या या माहितीमुळे गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नितिनचंद्र , धन्यवाद ,.........

हा सगळा अट्टाहास श्री नितीन गडकरी लोकसभेवर निवडौन यावेत या सदिच्छेपोटी होता. कालच्या एक्झीट पोल मध्ये श्री नितीन गडकरी सेफ झोन मध्ये आहेत असे दिसले. खास बाब म्हणजे नुसते आरोप केले म्हणजे नागपुरची जनता आपल्याला निवडुन देईल अश्या भ्रमात असलेल्या अंजली दमानिया तिसर्‍या नंबरावर आहेत.

काल एबीपी माझा वर अंजली दमानिया एकदम नरम आलेल्या दिसत होता. अजूनही 'गिरा तो भी टांग उप्पर' ही वृत्ती कायम असली, तरी लक्षणीय बाब म्हणजे निदान आवाजातला माज आणि अरेरावीपणा तरी साफ उतरला होता. आता निवडणूक निकालांनंतर त्यांची एखादी बाईट/मुलाखत बघणे मनोरंजक ठरावे.