हितगुज ग्रूप

तडका - आरक्षणाचा एल्गार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 11:18

आरक्षणाचा एल्गार

सरकार वरील रोषाची
अजुन भावना गेली नाही
दिल्या गेलेल्या शब्दाची
म्हणे पुर्तता झाली नाही

आता सरकार वरती असा
कठोर आरोपाचा मार आहे
धनगर समाज आरक्षणाचा
आंदोलनात्मक एल्गार आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका-ठाव मना-मनाचे

Submitted by vishal maske on 22 March, 2015 - 13:45

ठाव मना-मनाचे,...

कुणासाठी ठाव असतो
कुणासाठी घाव असतो
वेग-वेगळ्या मनामध्ये
वेग-वेगळा भाव असतो

जसे मनं बदलतील तसे
कधी अर्थ बदलु शकतात
कुण्या मनात उचलणारे
कुणा मनी आदळू शकतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

Submitted by vishal maske on 21 March, 2015 - 20:59

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

तडका - गुढी पाडवा

Submitted by vishal maske on 20 March, 2015 - 22:22

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शब्दखुणा: 

काका

Submitted by vishal maske on 19 March, 2015 - 13:02

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

शब्दखुणा: 

तडका - घेरलेलं बजेट

Submitted by vishal maske on 18 March, 2015 - 22:05

घेरलेलं बजेट,...

बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे

बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र

शब्दखुणा: 

तडका- सरकारचा विरोध,...!

Submitted by vishal maske on 17 March, 2015 - 21:04

सरकारचा विरोध,...!

कुणी अडलेले आहेत
कुणी नडलेले आहेत
भु-संपादन विधेयकावर
कुणी इथे चिडलेले आहेत

जन कल्याणाचीच भुमिका
राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी
सरकारचा विरोध होण्याची
वेळच कशाला यायला हवी,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१८/०३/२०१५ दै.प्रजापत्र

शब्दखुणा: 

दोडक्याच्या सालींची ओली चटणी

Submitted by pltambe@yahoo.co.in on 17 March, 2015 - 02:44

साहित्य : अर्धी वाटी दोडक्यांची सालं, अर्धी वाटी शेंगदाणे,अर्धी वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,अर्धी वाटी कोथिंबीर,५-६ लसणाच्या पाकळ्या,थोडीशी कांदा व लसणाची पात,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,मीठ व एक चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर
कृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करून थोडेसे पाणी घालून चटणी वाटून घ्या.

दैनंदिन जीवनात,...

Submitted by vishal maske on 16 March, 2015 - 08:58

कधी मनं खवळले जातात
कधी मनं कळवळू शकतात
कधी विरोध उफाळले जातात
कधी विरोध मावळू शकतात

परिस्थितीचा आढावा घेत
कधी शाब्दिक उधाण असावेत
तर बदलत्या परिस्थितीनुसार
कधी वाणीवर लगाम असावेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१६/०३/२०१५ दै. प्रजापत्र

शब्दखुणा: 

राया...

Submitted by राजेंद्र देवी on 11 March, 2015 - 01:18

राया...

मखमली मंचकी पसरली, मखमली काया,
नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥

करून बसले मंचकी थाट
किती दिवस पाहिली वाट
उगवेल आता चैत्री पहाट
सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट
अत्तराच्या लावल्या या समया
नका सोडून जाऊ.... ॥१॥

ल्याले शालू भरजरी
देह झाला आज शेवरी
ठेवा बाजूला तुम्ही शेला
घ्या अलगद कवेत मजला
जाईल ज्वानी माझी वाया
नका सोडून जाऊ.... ॥२॥

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप