(शतशब्दकथा)

खीर (शतशब्दकथा)

Submitted by पद्म on 11 September, 2019 - 07:56

उशिर झाला होता. जेवणंसुद्धा उरकत आली होती. आता आलोच होतो; म्हणून जेवायला बसलो!
वाढणार्‍याने सगळं वाढलं, पण बाजुच्या ताटात दिसणारी खीर मला वाढली नव्हती. बाजुच्याने मात्र चाटुन पुसून खीर संपवली होती.

तेवढ्यात त्याने आवाज दिला, "भाऊ, खीर!" ईथे मला एक वाटी मिळाली नव्हती, याला दुसरी वाटी पाहिजे होती.

"खीर संपलीये!"

तो थोडा नाराज झाला. त्याने दुसर्या कुणालातरी आवाज दिला, "दादा, खीर मिळेल का?" कित्ती हावरटपणा!

त्याने अजून तीन चार जणांना कामाला लावलं... शेवटी थोडीशी खीर सापडली. मला तर राग आला त्या हावरटपणाचा...

विषय: 
शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - "प्रेस टु............." - चौबेजी

Submitted by चौबेजी on 5 September, 2019 - 05:37

"काहीही होत नाही, तू फुकट घाबरतोस."

"हे बघ कुठेतरी लाल बटन आणि त्याच्या शेजारी लाल रंगावर पांढरी कवटी पाहिली तर बटन दाबायच्या आधी कोणीही सेन्सिबल माणूस दहा वेळा विचार करेल."

"न्यूक्लिअर वॉर ऑलरेडी घडलंय. अजून काय वाईट होणारे?"

"इथे लिहिलंय प्रेस टु...... टु व्हॉट?? पुढचं गेलंय. बटन दाबू नकोस."

क्लिक!

"इथे लिहिलंय प्रेस टु...... टु व्हॉट?? पुढचं गेलंय. बटन दाबू नकोस."

"न्यूक्लिअर वॉर ऑलरेडी घडलंय. अजून काय वाईट होणारे?"

विषय: 
शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी- "दाह" - निरु

Submitted by अ'निरु'द्ध on 5 September, 2019 - 05:22

काय सुखाने रहात होतो आम्ही.
उबदार वातावरण, अन्नाचा सुकाळ, अवतीभवती छान ओलावा, कायम सुखकारक संवेदना.
आणि छान छान जोडीदारिणी.
बागडणारी आमची बाळंही.

पण अचानक हे काय झालंय काहीच कळत नाही.
अंगाचा नुसता दाह होतोय.
होरपळून जातोय नुसता.
गुदमरायलाही होतंय.
अंगावरच्या रोमारोमात वेदना जाणवतेय, मरणप्राय.

खेचतंय कोणीतरी खाली खाली.
अजून खाली.

जीवन (वैज्ञानिक शतशब्दकथा)

Submitted by अतुल. on 4 July, 2019 - 09:06

गुलाबी अचानक गेली. इतक्या वर्षांची साथ संपली. पांढरा हताश झाला. नाजूक केशरीकडे बघून आता दिवस काढायचे. त्याला सहज भूतकाळातले उतार चढाव आठवले. पिवळा त्याचा वर्गमित्र होता. त्याचा नंबर नेहमी वर असे. पांढऱ्याला असूया वाटायची. कारण तो स्वत: फारशा शार्प नव्हता. पण नंतर काळ बदलला. पांढऱ्याने खूप ताणतणाव सहन केले. पण बघता बघता त्याने सर्वांवर मात केली. वर आला.

प्रत्येकाची अशीच काही ना काही कथा होती. धागेच ते. मागचे सगळे टाके त्यांना आठवत होते. पुढचे कसे पडतील माहित नव्हते!

विषय: 

कादंबरी (शतशब्दकथा)

Submitted by अतुल. on 22 June, 2019 - 06:00

तशब्दकथा लिहिण्यासाठी तंद्री लावली. तोच दरवाजाची बेल वाजली. मनात चरफडतच दार उघडले. बघतो तर दारात कादंबरी उभी!

“काय लेखका... विसरलास मला?”

“नाही गं. ये ना..” मी ओशाळून म्हणालो.

ती आत आली. बसली. थकल्यासारखी वाटत होती.

“काय लिहितोयस?”

“अं... शतशब्दकथा...”

“अरे वा”, कसनुसे हसंत तिने विचारले “जमली का?”

“नाही... मला जमणारही नाही” मी अपराध्यासारखा बोललो

“जमेल! कर प्रयत्न. लिही”

“अं?”

“लिही म्हणाले ना?” ती जवळजवळ ओरडलीच

मी खजील झालो. लिहू लागलो.

क्रश (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 23 January, 2019 - 05:20

खुप दिवसांनी शशक लिहीलीये, बघा जमलीये का..
सूचनांचे स्वागत आहे
--------------------------------------------------------------------------------------------

छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.
जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती.

विषय: 

खेळ (शतशब्द कथा)

Submitted by सौ. पूजा नरेगल on 23 September, 2018 - 11:34

एक छोटासा प्रयत्न कथा लिहीण्याचा
*****************************

"संपल सगळं, हा शेवटचा वार असेल ह्याचा. अचूक नेम धरला आहे त्याने.
पळायला वाटच नाही आणि त्राण सुद्धा नाहीत.
त्याच्या निशाण्यावर मी एकटीच नाही, अजून एक जण सुद्धा आहे. एका दगडात दोन पक्षी मारुन 'खेळ' संपवायचा आहे याला."

इतका वेळ इकडून तिकडे पळत होती, ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात,
मधल्या रिंगणात सुद्धा जाऊन आली पण तो पाठलाग काही सोडत नव्हता. आता तिच्या समोर होती खोल आणि अंंधःकारमय विहीर.

शब्दखुणा: 

धक्का (शतशब्दकथा)

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 2 July, 2018 - 03:51

धक्का (शतशब्दकथा)

"अरे म्याडम चला लवकर...ट्रेन जाईल.." तो तिला धक्का देतंच गर्दीत दिसेनासा झाला ... पहिला दिवस
"चलो म्याम…….." दुसरा दिवस
"बाजू......Excuse" तिसरा दिवस
असाच पंधरवडा गेला.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - (शतशब्दकथा)