कादंबरी (शतशब्दकथा)

Submitted by अतुल. on 22 June, 2019 - 06:00

तशब्दकथा लिहिण्यासाठी तंद्री लावली. तोच दरवाजाची बेल वाजली. मनात चरफडतच दार उघडले. बघतो तर दारात कादंबरी उभी!

“काय लेखका... विसरलास मला?”

“नाही गं. ये ना..” मी ओशाळून म्हणालो.

ती आत आली. बसली. थकल्यासारखी वाटत होती.

“काय लिहितोयस?”

“अं... शतशब्दकथा...”

“अरे वा”, कसनुसे हसंत तिने विचारले “जमली का?”

“नाही... मला जमणारही नाही” मी अपराध्यासारखा बोललो

“जमेल! कर प्रयत्न. लिही”

“अं?”

“लिही म्हणाले ना?” ती जवळजवळ ओरडलीच

मी खजील झालो. लिहू लागलो.

तोच अचानक कादंबरीची नजर निर्विकार झाली. कपाळावर धर्मबिंदू चमकले. तिला धाप लागली. आणि शून्यात बघत तिने खुर्चीवर मान टेकवली.

हातातला पेन टाकून मी ओरडलो, “कादंबरीऽऽऽ...”

... आणि शंभर शब्द संपले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शतशब्द कथा वाचताना मला अगदी असेच वाटते नेहमी. सुरेख लिहिलय अगदी.
"कादंबरीऽ कादंबरीऽऽ" असं दोनदा ओरडायची सुध्दा सोय नाही शंभर शब्दांच्या बंधनामुळे. Lol

धन्यवाद सर्वाना Proud

शालीजी... ओरडलो अखेर. तो सिम्बॉल सापडत नव्हता Happy