XXXच्या (अपशब्दकथा)

Submitted by हायझेनबर्ग - एक... on 5 July, 2018 - 15:12

XXXच्या (अपशब्दकथा)

ओ SS शूक शूक ...हो हो तुम्हालाच म्हणतोय..
काय?
अहो कधीची तुम्हाला ती ही घालतोय...
काय घालताय? 'साद'?
साद नाही हो.. ती ही नाही का कधी तरी घालावीशीच वाटते.
घालावीशीच वाटते? माळ?
माळ नाही हो.. ती नाही का हो कोणी आपल्या डोक्यात गेलं की घालतात
हां! राख राख!
राखही नाही हो. ती नाही का हो कSकचून घालतात
करकचून? गाठ ... गाठ?
करकचून नाही हो .. कचकचून.. कचकचून म्हणजे दात ओठ खात
कचकचून काय घालतात बरं .. लाथ? लाथ?
ती गाढवं घालतात हो.. माणसं कचकचून घालतात ती..
काही सूचत नाही बुवा तुम्ही घाला मग बघू...
'अरे ये! बास की आता XXXच्या'
(घ्या! झाले शंभर)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०० नसतील झाले तर अजून एक दोन फुल्या फुल्यांचे शब्द लिहून टाकू.. त्यात काय.. शब्दांची काही ददात नाही आपल्याला. Proud

पण मला काय प्रश्न पडलाय फुल्या हव्या त्या हवं तिकडे लावता येतात की त्यात काही फ्लो, कोहिरन्स वगैरे बघावा लागतो . फुल्यांबद्दलच्या अज्ञानातून हा भाबडा निरागस प्रश्न विचारत आहे.

पण काहीही कारण नसताना कोणाला शुक्शुक करुन ती ही कशी घलणार? >>> अर्रर्र तुम्हाला कळालेच नाही का कोणाला घातली ते. Sad
ज्यांना घातली आहे त्यांना बरोबर कळेल आणि कळकळीने मनापासून दिलेली ह्याच्यासारखी सत्पात्री देवाण दुसरी नाही.

पण मला काय प्रश्न पडलाय फुल्या हव्या त्या हवं तिकडे लावता येतात की त्यात काही फ्लो, कोहिरन्स वगैरे बघावा लागतो . >>> सगळ्याला हो.
पण चांगला सराव असल्याशिवाय आदानप्रदानाच्या भानगडीत पडू नये.. दोन दिल्यातर एखादी घ्यायचीही तयारी ठेवावी लागते. पण प्रत्येकवेळी क्लोजर आपलेच असले पाहिजे मग कितीही खालच्या पायर्‍या ऊतराव्या लागल्या तरी बेहेत्तर (हा गोल्डन रूल आहे) नाही तर मानसिक त्रास होऊ शकतो. Proud

<<<< र्रर्र तुम्हाला कळालेच नाही का कोणाला घातली ते << नाही कळलं Sad
>>>>
माबोवर शशकची लाट आलीय त्याला वैतागले असतील.

आपल्यालातर आवडतात ब्वा शशक.

Biggrin
'कथा' विरहित शतशब्द तसे हे 'अपशब्द' विरहित अपशब्द का ? Lol
आपल्याला ही आवडायच्या. पण हल्ली समजतच नाहीत सो वाचल्यावर फार बावळट फीलिंग येते.