क्रश (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 23 January, 2019 - 05:20

खुप दिवसांनी शशक लिहीलीये, बघा जमलीये का..
सूचनांचे स्वागत आहे
--------------------------------------------------------------------------------------------

छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे. फिक्या तरीही फ्रेश रंगाचे फॉर्मल शर्ट, शक्यतो काळ्या रंगाची ट्राऊजर, गळ्यात नाजुकशी चेन, छोटुकले खड्याचे कानातले, महागातलं मेटल घड्याळ, हाय पोनीमध्ये बांधलेले केस आणि बेली शूज अशा पेहरावात येणाऱ्या त्या स्वप्नसुंदरीची छबी डोळ्यात टिपण्यासाठी तो आतुर होत असे.
जुजबी ओळख असली तरी त्याला ती आवडली होती.

मनातले प्रेम व्यक्त करण्याची शक्ती दे म्हणून देवाला विनवण्याकरिता मंदिरात गेला असताना तीही तिकडेच येताना दिसली.
ती शूज काढत असताना त्याचे लक्ष तिच्या पायाच्या बोटांकडे गेले.

प्रेमभंग झालेला तो सवाष्ण मुलींनी सगळे सौभाग्यालंकार घातलेच पाहिजेत असे जिथे तिथे मत मांडत फिरू लागला.
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. छान..
"सगळे सौ. घातले पाहिजेत" असे हवे होते का? Happy

सगळे सौ. घातले पाहिजेत" असे हवे होते का? >>> हो
बदल केला आहे Happy
१०० शब्दाची भरती केलीये पण
धन्यवाद अनघा. , शाली Happy

आवडली कथा Lol Lol हल्ली हा फार कॉमन प्रॉब्लेम झाला आहे नै का? Proud

बाय द वे, टो रिंग्ज तर लग्न न झालेल्या मुली पण घालतात ना? की नाही, माझीच माहिती चुकीची असेल.

मस्त जमलीय Lol
आता इच्छुक नवागतांचा अभ्यासक्रम वाढला म्हणायचा.

धन्यवाद सायली Happy

दिवेपण खुल्यात द्याची चोरी लोकांना>> गम्मत गं
असही ४ लोक विपु बघुन् येतातच एकाला सान्गितल तरी Proud ह्या विचाराने खुल्लम्खुल्लाच दिवे दिलेत Happy Proud

भारी.. hand मंगळसूत्र पण आलंय.. त्यामुळे आता मुलींच्या हाताकडे आणि पायाकडेच बघावं लागेल..
नवीन पिढी check out करताना मान खाली घालून बघेल..कल्पना छान आहे..

Twist मस्त..

hand मंगळसूत्र????
म्हणजे बाळांच्या हातात घालतात मनगट्या तसं का? काळे मणी आणि सोन्याचा मणी असतो.

hand मंगळसूत्र????
म्हणजे बाळांच्या हातात घालतात मनगट्या तसं का? काळे मणी आणि सोन्याचा मणी असतो. >>> हो, अन ते पायातले देखिल मुडनुसार घालतात
तसेही पुरुष कुठे काय घालतात ज्याने त्यांचे लग्न झालेय की नाही कळेल. सो.....

हा फोटो, नेट वरून घेतलाय

Screenshot_2019-01-23-18-34-26-416_com.whatsapp.png

हाहाहा Happy

https://www.maayboli.com/node/51031

मी हि अशाच आशयाची एक कथा लिहिली होती ... पूर्वी... पण तेव्हा शतशब्द कथेचा ट्रेंड नव्हता...म्हणून थोडी सविस्तरच लिहिलेली .

धन्यवाद वावे, मधुराणी (कित्ती गोड नाव), मयुरी Happy
मी हि अशाच आशयाची एक कथा लिहिली होती>>> आत्ताच वाचली, छान आहे Happy मन खरच वेडं असतं आणि क्रश त्याहुन जास्त वेड लावते Happy
hand मंगळसूत्र>>> गुड आयडीया

hand मंगळसूत्र>>> गुड आयडीया >>>>>>. मला इमेज अपलोड करता येत नाही, नाही तर दाखवलं असतं. तसंच अँकलेट पण असतं. मंगळसूत्र पायात पाहिलं तर आपल्या आजीच्या काळातल्या बायकांना चक्कर येईल. Lol

धन्यवाद DJ., आसा Happy
जमलाय पहिलाच प्रयत्न>>> तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे हुरूप आला Proud
येऊद्या अजुन>> नक्की

Pages