खेळ (शतशब्द कथा)

Submitted by सौ. पूजा नरेगल on 23 September, 2018 - 11:34

एक छोटासा प्रयत्न कथा लिहीण्याचा
*****************************

"संपल सगळं, हा शेवटचा वार असेल ह्याचा. अचूक नेम धरला आहे त्याने.
पळायला वाटच नाही आणि त्राण सुद्धा नाहीत.
त्याच्या निशाण्यावर मी एकटीच नाही, अजून एक जण सुद्धा आहे. एका दगडात दोन पक्षी मारुन 'खेळ' संपवायचा आहे याला."

इतका वेळ इकडून तिकडे पळत होती, ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात,
मधल्या रिंगणात सुद्धा जाऊन आली पण तो पाठलाग काही सोडत नव्हता. आता तिच्या समोर होती खोल आणि अंंधःकारमय विहीर.

त्याच्या चेहऱ्यावर विजयाचे गुढ हास्य उमटले, निट निशाणा साधून हल्ला केला... "धप्प.. धप्प.." दोन आवाज आले....

टाळ्यांचा गजर झाला. क्यारम बोर्ड वर "क्वीन" आणि "कव्हर" दोन्ही एकाच वेळी साधत "खेळ" जिंकला होता त्याने.
***********************

---- सौ. पूजा नरेगल

#EkVedaPrayatn

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड

एका दगडात दोन पक्षी मारुन 'खेळ' संपवायचा आहे याला." >>>
इथे 'खेळ' ऐवजी नुसतं खेळ लिहिलं तरी चालेल. उगाच जरा हिंट मिळते याने की हा कसला तरी खेळ आहे म्हणून.

सहीये.. Happy

छान