(द्विशतशब्दकथा)

नशा - (द्विशतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 30 October, 2019 - 08:31

लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली.
.
.
.
“आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.”
“आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?”
“काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?”
“ड्रग्स?”
“अदिती तशी मुलगी नाही.“
“दारू?”
“काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.”
“मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?”

विषय: 

बलात्कारी

Submitted by कटप्पा on 23 June, 2019 - 18:37

रात्रीचे दोन वाजले होते, संग्राम ने लाथ मारून दार तोडले, दुसऱ्याच क्षणी तो श्रेयस च्या घरात होता।
श्रेयस आणि त्याची आई दोघेही जागे झाले।संग्राम ला बघताच पुढे काय होणार त्यांना कल्पना आली।
संग्राम ओरडला, ऐ डॉक्टर.. आज सापडलास, तुला जित्ता नाय सोडणार आपण, माझ्या गरीब बहिणीला नासवलस, भेंन××।
श्रेयस ची भीतीने गाळण उडाली, मी काही नाही केले संग्राम, कोर्टाने मला सोडून दिले आहे, निघून जा नाहीतर पोलीस केस करेन।

कादंबरी (शतशब्दकथा)

Submitted by अतुल. on 22 June, 2019 - 06:00

तशब्दकथा लिहिण्यासाठी तंद्री लावली. तोच दरवाजाची बेल वाजली. मनात चरफडतच दार उघडले. बघतो तर दारात कादंबरी उभी!

“काय लेखका... विसरलास मला?”

“नाही गं. ये ना..” मी ओशाळून म्हणालो.

ती आत आली. बसली. थकल्यासारखी वाटत होती.

“काय लिहितोयस?”

“अं... शतशब्दकथा...”

“अरे वा”, कसनुसे हसंत तिने विचारले “जमली का?”

“नाही... मला जमणारही नाही” मी अपराध्यासारखा बोललो

“जमेल! कर प्रयत्न. लिही”

“अं?”

“लिही म्हणाले ना?” ती जवळजवळ ओरडलीच

मी खजील झालो. लिहू लागलो.

माझे क्रश (द्विशतशब्दकथा)

Submitted by Aditiii on 27 January, 2019 - 23:49

आज मला तो दिसला, काय क्युट दिसत होता म्हणून सांगू? निळा रंग त्याला शोभून दिसत होता. अर्थात कुठलाही रंग छानच दिसतो. आहेच तो इतका हँडसम. माझी निवड काही अशीतशी नसते. आधीचा पण असाच होता, खरंतर ह्याच्या पेक्षा छान. अगदी बॉलीवूड हिरो. पण काय करायचं? मला समजून घ्यायची, माझ्या बरोबर राहायची त्याची इच्छाच नसायची. सारखा लांबच राहायचा. मी जरा काही बोलायला गेले किंवा काही केलं तरी डोकं फिरल्यासारखं आरडाओरडाच करायला लागायचा. असा राग यायचा ना मला. तशी मी काही वाईट नाही दिसायला आणि सगळ्यांचंच कमी जास्त असतंच. पण माणसाचा स्वभाव पण बघावा ना. पण ह्यांचं आपलं वेगळंच.

Subscribe to RSS - (द्विशतशब्दकथा)