मनाधीश जो ईश सर्व प्रेमीजनांचा
मुळारंभ आरंभ तो शृंगाराचा
नमू राधिका मूळ प्रेमाची गाथा
गमू पंथ आनंत या क्रुष्णाचा
मना प्रियजना प्रेमपंथेची जावे
दिसे सुंदरी कोणी तिजला बघावे
तिला निंद्य ते सर्व सोडुन द्यावे
तिला वंद्य ते सर्व प्रेमे करावे
प्रभाते तिच्या गल्लीत चक्कर मारावा
मिळे छोकरी, आधी पाठ्लाग करावा
प्रेमाचार हा थोर सांडू नये तो
कट्ट्यावरी तोची कार्टा धन्य होतो
मना मुलींपासूनी दूर जाऊ नये रे
मना सर्वथा त्यांना दुखवू नये रे
मना सर्वदा प्रिती सोडू नको हो
मना अंतरी तिचाच विचार राहो
मना'बापका डर' सोडूनी द्यावा
मना भावाला तिच्या गटवावा
मना काळजी नको तिच्या घरच्यांची
कधी आन्घोळ केली नाही
कधी कपडे धुतले नाहीत
मी टूथब्रश सुद्धा माझा कधी वापरलेला नाही
चाल :- देहाची तिजोरी
बायकोची मजुरी नित्य तीची सेवा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा
पीते चहा डोळे मिटुनि जात बायकांची
मनी नवरयाच्याकारे भीती लाटण्याची
सरावल्या डोक्या वरती टेंगुळ का फ़ुटावे..
मरण धाड देवा आता मरण धाड देवा.......
विडंबन काव्य..... असेन मी, नसेन मी..... या कवितेवरील.
असेन मी, नसेन मी, तरीही असतील मालिका या
घराघरात पोचुनि सदस्य बनून राहिल्या या
जीवंत नाती सभोवती, संवाद मात्र आटले
स्वगत सारखे मनीं अघटित काय घडणार ते
हातात रिमोट-पाखरू, दर्शवी कृतिशून्यहिनता
सासू सुनेस न बोलती, न वेळ-काळ मापती
काम उरकूनि द्वयी 'अगाध' वाहिनी पाहती
फोनवरी चर्चा रंगती, माता कुमारी वाढल्या कश्या?
कुणास काय ठावुके, कसे कोण जीवंत पुन्हा?
तारूण्ये नाहीच लोपली युगानु-युगांच्या वाटचाली या
बालकांचे वृद्ध जाहले, तरी न संपल्या मालिका या
"तरुणाई"...........
धडधड माझे हृदय उडे ..
बघता ललना चोहीकडे.. ll
नटण्यामध्ये दिवस सरे
बंटी बबली सवे फिरे
काळ बदलला.. मुली न कळल्या.. कश्या बदलल्या..
कपडे तोकडे.. चोहीकडे.. ll १ ll
डिस्क रिमिक्स चंदेरी हे..
सिनेजगत भुलवीत आहे..
"तरुणाई" त्या ओघाने..
बघा कशी वाहते आहे..
चित्त भंगले .. वित्त खंगले .. पालक दमले..
जिकडे .. तिकडे.. चोहीकडे.. ll २ ll
विडंबन काव्य....... (केळीचे सुकले बाग..... या कवितेवरील)
स्पर्धांचे फुटले पेव, गाऊनिया गाणी
घर-घरातली गायकी खुले, घशांची निगराणी
जशी कुठे लागली स्पर्धी, पळती कसे सारे
कुणीतरी "संदेश" पाठवा, रडत-भेकत सांगति बिचारे
किती "पडद्या"ची लागे तळमळ, स्वप्नाळू जीवा
गळ्यातील गायनरस, आळवित मारवा
कितीतरी गायली गाणी, रियाझही झाले
गळ्यांचे तुटले ताण, बघुनी मोहज्वाला.......
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
=========================================================
उठेन मी बसेन मी.. उभी असेन नीट मी..
डाएट फूड खाऊनी .. उद्या असेन फिट मी.. ll
हवेस हुंगले तरी.. वजन बरेच वाढले ..
(चांदोबा चांदोबा भागलास का? या कवितेवरील विडंबन...)
लेकरा, सोनुल्या रुसलास का?
परदेशी नोकरीमागे धावलास का?
परदेशी झाडं डॉलरची.....
इंडियात झाडं रुपयांची.....
आईबाबांच्या घरी येऊन जा.....
आईच्या हातचं खावून जा.....
आई तुझी उभी दाराशी......
चित्त आहे तिचं पिलापाशी......!!!
विडम्बन काव्य 'देवा तुझे किती सुन्दर आकाश ' वर आधारित :
"नेत्यास इशारा"
नेत्या तुझा किती | भकास प्रभाग |
लुटोनी बोडका | झाला ऐसे ||१||
उजाड़ शिवार | कोरडे कालवे |
घोडे नाचविले | कागदांमाजी ||२||
भुकेली लेकरे | खंगली हो गुरे |
शेतकरी झुरे | उदासोनी ||३||
कर्जाचे डोंगर | डोईजड झाले |
रस्त्यावर आले | सारे लोक ||४||
तुम्बडी भरोनी | हाव आटपेना |
भस्म्या, क्षयरोग | माणुसकीचा ||५||
नको आता तुझी | फोल आश्वासने |
नादी न लागणे | चोरट्यान्च्या ||६||
तुझी प्रकरणे | लटके बहाणे |
भारता ग्रहणे | ग्रासियेले ||७||
(मान्यवर कवींची माफी मागून..)
नसतोस घरी तू जेव्हा
कसं शांत शांत वाटते
भूणभूण कसली नाही
मी एकांतवासी असते..
नसतोस घरी तू जेव्हा
माझ्या आरश्यात मला मी बघते
किती प्रेम तुला दिले अन
किती गुन्हे तव केले न्याहाळते..
नसतोस घरी तू जेव्हा
मैत्रिंणींशी गप्पा मी मारते
एकीच्या बोलण्यात मात्र
विरहाची भावना दिसते..
नसतोस घरी तू जेव्हा
सेलफोनची किणकिण वाढते
माझ्या लक्षात येईपर्यंत
फोनबील दुप्पट झालेले असते..