बायकोची मजुरी..

Submitted by नाना६२८१ on 13 September, 2009 - 14:10

चाल :- देहाची तिजोरी

बायकोची मजुरी नित्य तीची सेवा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा

पीते चहा डोळे मिटुनि जात बायकांची
मनी नवरयाच्याकारे भीती लाटण्याची

सरावल्या डोक्या वरती टेंगुळ का फ़ुटावे..
मरण धाड देवा आता मरण धाड देवा.......

गुलमोहर: 

यशवंत देवांचे असेच एक जबरी विडंबन आहे...

पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा
मरण धाड देवा आता मरण धाड देवा

हे त्याची फिरवाफिरव करून बनवलेले दिसते आहे Sad

मिल्या यांच्या मताशी सहमत.
कालच दिनानाथ नाट्यगृहात यशवंत देवांचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी हे विडंबन गीत सादर केले.
"......
मध्यंतरानंतर या मैफलीत यशवंत देव यांच्या सहधर्मचारिणी करुणा देव याही सहभागी झाल्या. देवांचे सर्वांशी कसे पटते आणि घरात कसकशा गमतीजमती घडतात, हे त्या सांगत असताना यशवंत देव यांनी जो प्रतिसाद दिला, तोही लाजवाब होता. प्रेक्षकांची तर हसता हसता पुरेवाट झाली. यातून देव हे किती मिश्‍कील स्वभावाचे आहेत, याचे प्रत्यंतर साऱ्यांनाच आले. "पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा' या त्यांच्या विडंबन गीताने तर या मैफलीवर कळस चढवला
......"