शाळात विषाणू बरसला.....
श्रावणात घननीळा बरसला...... या कवितेवरील विडंबन......
पुण्यात विषाणू बरसला स्वाईन फ्ल्यूद्वारा
कडमडला परदेशातून, भयभीत माता संसर्ग होय लेकरा
तापाने ज्याची वाट लावली तो फ्ल्यू पडला भारी
जिथे तिथे मुलांना भेटे आता स्वाईन न-आवरी
घरोघरी ओठांवर नाचे नांव त्याचेच विखारा
विषाणूच्या लक्षणात भेदरले हे शाळेचे पक्षी
होता साधी सर्दी तरीही उरात धडधड अक्षी (अशी)
हवाईमार्गे पसरवत आला स्वाईन-फ्ल्यू भरारा
पुण्याच्या विद्येच्या माहेरी रोगी स्वाईनचे बहु झाले
द्वारी मोर्चाने शाळांभोवती टाळेबंद लागले
जीवाच्या रक्षणे आला मास्क तो घरोघरा
कानोकानी स्वाईनफ्ल्यूच्या अफवाही गेल्या दशदिशा