असेन मी, नसेन मी, तरीही असतील मालिका या...

Submitted by kalpana_053 on 13 September, 2009 - 03:05

विडंबन काव्य..... असेन मी, नसेन मी..... या कवितेवरील.

असेन मी, नसेन मी, तरीही असतील मालिका या
घराघरात पोचुनि सदस्य बनून राहिल्या या

जीवंत नाती सभोवती, संवाद मात्र आटले
स्वगत सारखे मनीं अघटित काय घडणार ते
हातात रिमोट-पाखरू, दर्शवी कृतिशून्यहिनता

सासू सुनेस न बोलती, न वेळ-काळ मापती
काम उरकूनि द्वयी 'अगाध' वाहिनी पाहती
फोनवरी चर्चा रंगती, माता कुमारी वाढल्या कश्या?

कुणास काय ठावुके, कसे कोण जीवंत पुन्हा?
तारूण्ये नाहीच लोपली युगानु-युगांच्या वाटचाली या
बालकांचे वृद्ध जाहले, तरी न संपल्या मालिका या

गुलमोहर: