विडंबन

झेंडा ....

Submitted by देवनिनाद on 8 January, 2010 - 02:24

अवधूत गुप्ते ... यू आर सिंपली ग्रेट असं आदरपुर्वक म्हणून झेंडा ह्या गाण्याचे विडंबन करत आहे ...(चाल ओरीजनल गाण्याप्रमाणे)

योग्य प्रदर्शनाची, पाहतोय वाट
स्पष्टीकरण ही देतोय काटोकाट
आपली माणसं, नेते अपुले चार
चित्रपटास या, अडवती फार
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती || १ ||

आजवर घेतली मेहनत
त्याचं होईल का पाणी
नेते नाही म्हणाले
तरी जनता ऐकेल का कहाणी
काय करू देवा किती घालू गार्‍हाणं
नेते म्हणती गोष्ट आमची काढती घाण
विठ्ठला ..... || २ ||

बुजगवण्यागत आहेत का व्यर्थ हे प्रयत्न
उभ्या उभ्या संपुन जातील का यत्न
डोकं काम करेना माझं
बघुनी उमगलं कुंपण इथं शेत खाई ताजं

गुलमोहर: 

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी

Submitted by सूर्यकांत डोळसे on 7 January, 2010 - 23:37

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी
बालिके, जरा जपून जा कॉलेजवरी

तो छचोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल चिठ्ठी फे्कतो
मस्ताऊन, माजून जाळे टाकतो
सांगतो अजूनही तुला खरोखरी

सांग कामांधास काय जाहले
त्यांनी छेडल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग ढंग संग लागली
एकटीच वाचशील काय तू पोरी?

त्या तिथे असंग संग त्यात गुंगला
ट्पोर-ट्पोर्‍यासवे बेधूंद दंगला
तो पहा ढोल इज्जतीचा वाजला
हाय माजले फिरुन तेच टपोरी.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

गुलमोहर: 

खरेसाहेब…माफ़ करा : ४ : दिवस असे की …

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 January, 2010 - 07:10

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

सावकारांच्या कर्जाखाली बुडतो…
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही…..

व्याजाचे हे एकसंधसे तुकडे…
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही…..

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी…
परि जगावयाला शोधू पाहे सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो…
परि ते पिच्छा सोडत नाही…

येतो म्हणताना ओठ कापती थोडे…

गुलमोहर: 

खरेसाहेब माफ़ करा : ३ : जरा चुकीचे ….

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 January, 2010 - 22:56

जरा चवीचे.., जरासे बेचव…
जरा चवीचे.., जरासे बेचव, खाऊ काही,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
आला नाही ढेकर तोवर खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
पाठ फिरू दे त्यांची नंतर, ओरपू तर्री..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
पर्याय नकोशा बर्गरवर चल शोधू काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून

गुलमोहर: 

'खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 January, 2010 - 01:06

एवढंच ना? विडंबन करू... एवढंच ना?
आमचं हसं, आमचंच हस्सं..., Angry घेऊन कागद एकटेच लिहू,
एवढंच ना?

मक्त्याला कोण? मतल्याला कोण? गझलेला अवघ्या वाचतंय कोण?
शब्दाला शब्द, प्राचीला गच्ची, यमकाला यमक जुळवत लिहू,
एवढंच ना?

कवितेला मीटर होतंच कधी? काव्याला व्याकरण होतंच कधी?
शब्दांचे सोस, यमकाचे कोश, तिरकस प्रतिसाद अनुभवत लिहू,
एवढंच ना?

वाचलंत तर द्याल, तुमचीच 'राय' , टाळलंत तर टाळाल, आम्हाला काय?
स्वत:च कवी, स्वत:च वाचक, स्वत:च समीक्षक होवून लिहू,
एवढंच ना?

काव्याच्या छंदा, लिहिण्याचा धंदा, लिहीत राहू कुणी वंदा वा निंदा,
काव्याच्या छंदा, कवितेचा धंदा, विडंबन करून जगतोय बंदा,

गुलमोहर: 

हव्या कशाला मग सलवारी (रसग्रहणासहित)

Submitted by के बालचंद्र on 5 January, 2010 - 21:55

हव्या कशाला मग सलवारी ?

भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?

नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढिगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ....!

टकमक बघुद्या बघणार्‍यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेवुद्या घेणार्‍यांना
सुखवू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
तिसाव्या शतकाची मी नारी ...!

स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी

गुलमोहर: 

केशवा का रे या (विडंबन)

Submitted by जागोमोहनप्यारे on 4 January, 2010 - 03:24

केशवा का रे या तुझ्या डोक्यात इतक्या उवा
तुझ्या डोक्यात इतक्या उवा..

तुझ्यासारखा तूच घाण्या
रोज टाळिशी का रे न्हाण्या
वेळोवेळी मस्तकातुनी
घाल की रे कंगवा...

वेडा होऊन निद्रानाशी
ब्लेड नि कात्री घेऊन खाशी
डोक्यावरच्या जटा कापिशी
पडे उवांचा थवा.......

शुभ्र पांढर्‍या लिखांसाठी
शाम्पू घे रे भरूनी वाटी
खसखस खसखस डो़के चोळण्या
साबण पण रे हवा...

गुलमोहर: 

आज कॅन्टीनात चहा ढोसतो जरी...

Submitted by shashank pratapwar on 3 January, 2010 - 15:10

आज कॅन्टीनात चहा ढोसतो जरी
लावतो खिशास हात पाहतो वरी

मी भिकार नी सुमार प्लेट धरतो
हात टाकुनी खुशाल ताव मारतो
घाबरून लाजुनी उधार मागतो
काढतो हळूच पाय गर्दी पाहुनी.

रांग आज पाहताच हाय बोम्बले
पैसे मागल्याविना कुणी न सोडले
ज्याने त्याने पैसे पैसे पैसे मागले
एकटाच फेकशील तु किती तरी?

त्या तिथे उधारखेळ पार संपला
मुष्टीलत्तीकासवे सुमार चोपला
देह पलंगावरी ठार झोपला
हाय बाधली कसून आज उधारी.

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

नालायक राज्यकर्त्यांनो (ए मेरे वतन के लोगो)

Submitted by वैभ्या on 30 December, 2009 - 05:38

हे विडंबन नसुन जन जागृती आहे असे समझले तरी चालेल,
(चालः- ए मेरे वतन के लोगो)

नालायक राज्यकर्त्यांनो, जरा लाज बाळगा मनी,
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||धृ||

तुम्ही केले किती घोटाळे, पैशांनी भरले वाडे,
टाळुचे खाऊन लोणी ,त्या प्रेतांना मग गाडे,
तुम्हा ठायी कसली निती, तुम्ही निर्लज्ज बेईमानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||१||

इथे रक्त सांडले ज्यांनी, त्यांना मरते समयी ना पाणी,
पण कैदेचा शत्रु जो, त्यासी रोज चिकन बिर्याणी,
जनतेच्या समोर तांडव, आणि आत मदन मस्तानी
शहिदांनी जे जे मिळविले , नका ओतू त्यावर पाणी..... ||२||

गुलमोहर: 

दमछाक..!!

Submitted by अभय आर्वीकर on 29 December, 2009 - 09:05

... दमछाक..!!

प्रतिसाद लिवता लिवता, दमछाक झाली,
अरे कोणी ओता पाणी,विझवा या मशाली...!!
.....................................................
मायबोलीवर गेल्या ४८ तासांत
'' उषा:काल होता होता, काळ रात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली " याच कवितेचे
विडंबनावर आधारित ५ कविता सादर झाल्या,
या " विडंबन फ्लु " चा संसंर्ग मलाही झाला.
आणि पेटत्या मशाली विझविण्यासाठी दोन
ओळी मी लिहुन टाकल्या.
....................................................

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन