विडंबन

हे 'झाड' पाहिलस??

Submitted by उमेश कोठीकर on 31 October, 2009 - 01:37

श्रेष्ठ कवी श्री वैभव जोशी यांची माफी मागून.
मूळ कविता येथे (http://www.maayboli.com/node/7658)
............................................................................
हे 'झाड' पाहिलस?
हे आधी मानवी शरीर होतं फक्त...
कवीच्या मुंजाने धरण्याआधी...
नशीबाने रिकामं 'झाड' मिळालं
फिरत फिरत मुंजा इकडे डोकावला
मुंजा मेहेरबान झाला
आणि हे रूजलं
कवीचं 'झाड' म्हणून नावारूपाला आलं
हळुहळू याला वाटू लागलं की
आपण धरतो त्याच 'झाडाचे' डोके सुपीक
आपण प्रसवलो तरच शब्दांना अस्तित्व
आपलं 'फुगणं' तर 'झाडा'ची गरज
आपण चुकलो तरच टीकाकारांना महत्व
आता कधीतरी....
याच मुंजाची लहर फिरली तर

गुलमोहर: 

गधड्या पुन्हा जहाल्या, चुका परिक्षेत या......

Submitted by kalpana_053 on 26 October, 2009 - 03:00

उमाकांत काणेकर यांच्या "उघड्या पुन्हा जहाल्या......." या कवितेवरील विडंबन काव्य......

गधड्या पुन्हा जहाल्या, चुका परिक्षेत या
वाटती तुझ्या स्मृतींच्या, घटिका स्थिरावल्या

दुर्लक्ष कसे करू मी, घायाळ मन तळमळे
मित्रात फिरताना, माना खालावल्या

उठता तरंग देही, आधार एटीकेटींचे
ज्वरघात तो होऊनि, गाठी बाळा तया

खेदुनिया पांघरावी, माया भंगलेली
तू मोजल्यास नव्हत्या, चुका भ्रमातल्या.......

गुलमोहर: 

हव्यास तू

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 October, 2009 - 02:48

(प्राजू यांना अपेक्षित (http://www.maayboli.com/node/11585) असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती)

घरात अपुल्या भरून उरल्या
मद्यराणीचा सुवास तू
वेगवेगळ्या गचाळ गंधाची
उभी ठाकलेली रास तू

क्षणैक जागेवरी न थांबे
लडखडणारा त्रास तू
मित्रांच्या कुबड्या करुनी
तरंगणारा भकास तू

अखंड रिचवणारा... झरझर
घोट संस्कृतीचा दास तू
चाखण्यावरती पोसलेली
तुंदीलतनू आरास तू

डोळे मिटूनी तुला पहावे..
ग्लास तू ..... ग्लासात तू
तुझ्याविना ते कसे जगावे
मद्यकर्त्याचा श्वास तू

पेगवेड्या त्या जनांना
लागलेला ध्यास तू..
बाटलीतील उत्कटतेचा
झिंगला उल्हास तू

सदा सदाच पीत रहावे
न संपणारा प्रवास तू

गुलमोहर: 

रिमोट

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 October, 2009 - 14:09

(क्रांतीजीं क्षमा करतील या अपेक्षेत)

त्याला माझे आरवणे रुचलेच नसावे
त्याना माझे बंड कधी पचलेच नसावे

शब्दांचे ते घाव बोलके, उद्धटवाणी,
नाते भावातील तिथे रुजलेच नसावे

बडव्याने विठठला भजावे, असली माया,
वेडे गण.. त्यांना दैवत पटलेच नसावे !

त्याच्या पाट्या कशा कोरड्या? बहुधा त्यांनी
सेनानींचे सल्ले पण रटलेच नसावे

वर्षांचे साथी सगळे अवचित फुटलेले,
आदेशावर पुन्हा कुणी फिरलेच नसावे

येता जाता भाजप त्यांना डिवचत होता,
त्याचे 'जीना' भाटांना कळलेच नसावे !

त्या भात्यातुन काही शर हलकेच ढापले,
मी तगलो तैसे कोणी तगलेच नसावे !

मनसे म्हणतो काकापरी रिमोट व्हावे,

गुलमोहर: 

फराळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 20 October, 2009 - 09:35

(जयंतरावाची माफी मागून... )

दमले फराळ करता, आता निजेन म्हणते
स्वप्नातल्या दिवाळी, थोडे रमेन म्हणते

चकली जराच चुकली, हा दोष मोहनाचा
आहे जशा सरळ त्या, तैशा तळेन म्हणते

साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते

अंदाज लाडवाचे, चुकले पुन्हा नव्याने
बेसन रवा मिळोनी, गोळे वळेन म्हणते

पाळीतला उगा का बसला रुसून शंकर ?
समजावण्यास त्याला, पुर्‍या चिरेन म्हणते

शेवेस गाळताना, का हात कंप पावे ?
रचना नव्या दमाच्या, नाना करेन म्हणते

जिन्नस मी न सारे, हे चाखले अजूनी
बकरा करू़न यांना, मी वापरेन म्हणते

बोलावलेच आहे, शेजारच्या स़ख्यांना

गुलमोहर: 

उभी माझ्यात मधुमेही ही फळी

Submitted by kalpana_053 on 18 October, 2009 - 07:25

आली माझ्या घरी ही दिवाळी...... या मधुसूदन कालेलकर यांच्या कवितेवरील विडंबन काव्य.......

उभी माझ्यात मधुमेही ही फळी
तारूण्यातच गाठून आली

गोड पक्वान्ने धुंद सुवास हा, मी तरी त्यास ना मुकावे
दिवस रात्री रे गोड्या संगती मस्ततृप्त मी व्हावे
मधु कायी वसे, चोरी मनीं ठसे
लागे ब्रह्मानंदी मम टाळी

पाऊल पडता घरी स्वानंदा, ओंजळ थरथरू लागे
लाडू वळता वाटे खावा, सुरस जिव्हेत आले
हर्ष दाटे उदरी, नाथ आले घरी
चोरी पचल्याची दिली मी टाळी

गुलमोहर: 

कुणाच्या कवितेला आधार कुणाचे?

Submitted by madhurag on 8 October, 2009 - 05:41

माझ्या बाबांनी केलेले विडंबन त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.

हल्ली रविवार सकाळ-सप्तरंगमध्ये एखाद्या कवितेवर केलेली विडम्बने छापून येतात. त्या निमीत्ताने.

मूळ कविता- `कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..'
-----------------------------------------------------------------------------------
कुणाच्या कवितेला आधार कुणाचे?

कशासाठी करावे ते असे विडम्बन?
कुणी लिहिले मूळचे ते काव्य परिपूर्ण?
लिहीतात येथे सगळे ओढून ताणून!
तरीसुध्दा शेवटी ते विडम्बन गाजे!

शब्द येथे सर्व जाती थकून भागून
मुळातले अलंकार जिरून झिजून
आशयाला देति धक्के इथून तिथून..
म्हणति तरिही आम्ही आता कवितेचे राजे!

गुलमोहर: 

देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?

Submitted by kalpana_053 on 4 October, 2009 - 07:06

'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' या कवितेवरील विडंबन....

देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?
'प्रेमा'साठी प्रेमवीर तळ ठोकून?
कोण बोले वंशासाठी नवस फेडीन?
आरोग्याची आस कुणी मनांत ठेवून
वरी कसे ठेवतात नैवेद्य हे ताजे

गुन्हे सारे जाती येथे नमून बोलून
काळा पैसा अंधारात हुंडीत घालून
देवापाशी घेती सजा 'आबातोबा' करून
म्हणती हे भक्तवीर आम्ही देवभोळे

देवाच्या खांद्यावर भक्ताचे ओझे?

गुलमोहर: 

शूर आम्ही उमेदवार

Submitted by स्मितागद्रे on 3 October, 2009 - 10:33

"शूर आम्ही सरदारच्या"निर्मिकांची क्षमा मागुन

शूर आम्ही उमेदवार आम्हाला काय कुणाची भिती
पैसा, सत्ता आणि किर्ती पायी , मतदार धरले वेठी

सत्तेच्या धुंदीत विसरलो देशाचे या हित
खुर्ची संगे लगीन लागल, जडली येडी प्रीत
सत्ते पायी विसरुन गेलो सारी नाती गोती

जिंकाव वा मारुन जिंकाव हेच आम्हाला ठावं
निवडणूकांच्या वेळीच देतो मतदारांना भाव
देशा वर जरी आली संकटे,विसरुन जातो निती

गुलमोहर: 

त्या काळच्या पंगतींची मज वाटते असूया गं....

Submitted by kalpana_053 on 3 October, 2009 - 06:34

'त्या सावळ्या तनूचे.....' या आत्माराम सावंत यांच्या कवितेवरील विडंबन........

त्या काळच्या पंगतींची मज वाटते असूया गं
न कळे 'बूफेत' आता मी पोटभरू माझे कसे गं!

या भोजनास जेव्हा लागे अथांग रांग
चोहीकडे बघत मी अवघडला माझा हात गं!

भुलवतात टेबलावरी या खाद्यान्नाचे बहु प्रकार
भरपेट भासले तरी 'तो' आभासच मज घडे गं!

खूपते मनास बूफे उदर ना भरे ते
डोळ्यास तो दिखावा उदरात जो वसे नं!

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन