प्रेमाचे श्लोक

Submitted by kaljayee on 3 October, 2009 - 03:15

मनाधीश जो ईश सर्व प्रेमीजनांचा
मुळारंभ आरंभ तो शृंगाराचा
नमू राधिका मूळ प्रेमाची गाथा
गमू पंथ आनंत या क्रुष्णाचा

मना प्रियजना प्रेमपंथेची जावे
दिसे सुंदरी कोणी तिजला बघावे
तिला निंद्य ते सर्व सोडुन द्यावे
तिला वंद्य ते सर्व प्रेमे करावे

प्रभाते तिच्या गल्लीत चक्कर मारावा
मिळे छोकरी, आधी पाठ्लाग करावा
प्रेमाचार हा थोर सांडू नये तो
कट्ट्यावरी तोची कार्टा धन्य होतो

मना मुलींपासूनी दूर जाऊ नये रे
मना सर्वथा त्यांना दुखवू नये रे
मना सर्वदा प्रिती सोडू नको हो
मना अंतरी तिचाच विचार राहो

मना'बापका डर' सोडूनी द्यावा
मना भावाला तिच्या गटवावा
मना काळजी नको तिच्या घरच्यांची
विचारे अशी सर्व 'फिल्डिंग' लावाची

नको रे मना आळस खेद्कारी
नको रे मना उशीर नाना विकारी
नको रे मना एकीवरच प्रेम करू
नको रे मना एकीसाठीच झुरु

मना जी आवडे तिला 'प्रेपोज' करावे
मना बोखारणे तिचे गोड मानीत जावे
स्वये सर्वदा नम्र प्रेमिक व्हावे
मना सर्व पोरींवरती प्रेम करावे

गुलमोहर: