असेन मी .. नसेन मी..

Submitted by poojas on 7 September, 2009 - 11:17

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे

स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे

=========================================================

उठेन मी बसेन मी.. उभी असेन नीट मी..
डाएट फूड खाऊनी .. उद्या असेन फिट मी.. ll

हवेस हुंगले तरी.. वजन बरेच वाढले ..
म्हणून जेवणातूनी पदार्थ सर्व काढले ..
तूपास केले व्यर्ज घेत .. शुगर फ्रीचे कीट मी..
डाएट फूड खाऊनी .. उद्या असेन फिट मी.. ll

भल्या पहाटे जागते.. मधात लिंबू टाकते
पिऊन दीर्घ श्वास घेत .. रामदेव लावते ..
बसो कुणास लाथ .. ध्येय गाठण्यास धीट मी ..
डाएट फूड खाऊनी .. उद्या असेन फिट मी.. ll

मलाच फक्त ठाऊके.. कशी उद्या दिसेन मी..
मला बघून हांसले.. तयावरी हसेन मी..
जळेल मल्लिका बघून .. अश्शी दिसेन स्वीट मी..
डाएट फूड खाऊनी .. उद्या असेन फिट मी.. !!

गुलमोहर: 

एक प्रश्न आहे पुजा, तुझे इतरांना प्रतिसाद नसतात
असं का?
असु दे, अथवा नसु दे, ही पण छान कविताय