''वेदना''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 December, 2010 - 02:05

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे

राखतो या चेहर्‍याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहतो हा आसवांचा पूर आहे

काय लावू चाल मी या जीवनाला
जीवनाचे गीत तर बेसूर आहे

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

-डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

डॉक, मस्तच......

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहताहे आसवांचा पूर आहे
>>>>

वाहताहे आणि आहे पुन्हा पुन्हा खटकतेय...... "वाहतो हा आसवांचा पूर आहे" असं चालेल का???
लयीत छान वाटेल.....
लहान तोंडी मोठा घास..... चु.भु.द्या.घ्या. Happy

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

कैलासजी,
आणि तुमची ही गझल खास आहे !
Happy

छान गझल!

मक्ता अधिक आवडला.

शुभेच्छा!

( तुम्ही बशर नवाझांचे 'करोगे याद तो' किंवा अनंत ढवळेंचे 'मूक अरण्यातली पानगळ' वाचलेले आहेत का? माझ्यामते नसले वाचलेत तर जरूर वाचा. )

धन्यवाद!

कैलास ठिकठाक गझल.. तुझी ह्याआधीचीच गझल परत परत आठवत आहे

श्वास झाला मोकळा की कोंडल्यागत वाटते... - व्वा व्वा

भूषण : तुम्ही नमूद केलेली पुस्तके कुठे मिळतील?
मला पण हवी आहेत

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे

मस्त..

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहतो हा आसवांचा पूर आहे

छान आहे.

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

हा एकदम मस्त शेर.

गझलेतले फारसे कळत नाही. पण एक वाचक म्हणून पुढच्या शेराबद्दल माझ मत लहान तोंडी मोठा घास या सदरात नोंदवत आहे.

राखतो या चेहर्‍याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे

यातला लपविण्या हा शब्द मला खटकतो. हल्ली मागण्या, देण्या असे शब्द आढळतात. मला ते अपूर्ण वाटतात. लपविण्यास हा शब्द ठीक आहे. लपवितो पण चालले असते. चु.भू.दे.घे.

धन्यवाद रुणूझुणू... Happy

कौतुक्,तुझी ही ''दाद '' आवडली... मस्त विडंबन.. Happy

धन्यवाद अनिल.....:)

बेफिकीरजी.... आभार....'' मूक अरण्यातील पानगळ'' लवकरच मिळेल असं दिसतंय... Happy

दक्षिणा,मन्;पूर्वक धन्यवाद.. Happy

वर्षा..... ठांकु... Happy

किश्या.... धन्यवाद मित्रा.. Happy

आर्येश.... हा शेर मलाही फार आवडलाय... धन्स.. Happy

मंदार.... धन्यवाद मित्रा.. Happy

मिल्या.. धन्यवाद... मी सुद्धा अजून त्याच शेराच्या अंमलाखाली आहे... Happy

मूक अरण्यातील पानगळ मला दोनेक दिवसात मिळणार आहे....तुम्ही संपर्कातून पत्ता दिल्यास तुम्हाला कुरीयर करेन.... Happy

अनिलराव.... विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद...... मशहूर हेच मला अपेक्षित आहे.... काही शब्द उर्दूतून थेट मराठीत जसेच्या तसे वापरता येतात... मशहूर त्यातीलच एक आहे... Happy

हबा.. धन्यवाद मित्रा... Happy

अमित... धन्यवाद दोस्त.. Happy

मस्तच.

गझल (की गजल ?) अप्रतिम आहे ! एका मित्राच्या सांगण्यावरुन आवर्जुन वाचली. आता तुमची सर्व काव्यसंपदा वाचायचा बेत आहे ! Happy

पहिला शेर "शोले मधील ठाकुरची सुन - जया बच्चन " सारखी दु;खी का असायची हे सांगतो .:फिदी:

दुसरा शेर नंतर एक्ष्प्लेन करेन

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहतो हा आसवांचा पूर आहे

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.<<<

Sad

Pages