Submitted by रुणुझुणू on 17 December, 2010 - 11:16
मन अथांग सागर
त्यात भावना लहरी,
एक सौख्याने फुलली
दुजी दु:खाने बावरी !
मन उत्तुंग हिमाद्री
असे बर्फ भावनांचे,
काही उन्हाने वितळे
कुणा दैव गोठण्याचे !
मन एक वटवृक्ष
त्याच्या भावना पारंब्या,
काही रुजल्या मातीत
काही अधांतरी उभ्या !
मन मनच असावे
अन्य नको त्या उपमा,
भावनांच्या सौंदर्याला
नसे कशाचीच तमा !
गुलमोहर:
शेअर करा
मन अथांग सागर त्यात भावना
मन अथांग सागर
त्यात भावना लहरी,
एक सौख्याने फुलली
दुजी दु:खाने बावरी !
very nice...चांगला प्रयत्न आहे...keep it up..
मन मनच असावे अन्य नको त्या
मन मनच असावे
अन्य नको त्या उपमा,
भावनांच्या सौंदर्याला
नसे कशाचीच तमा
फार सुंदर..
आवडली ही अष्टाक्षरी....
छान!! शेवटची दोन आवडली..
छान!!
शेवटची दोन आवडली..
छानच ! [इतके दिवस प्रेमाला
छानच !
]
[इतके दिवस प्रेमाला उपमा नाही असे होते , आता मनाला पण नाही .. ठीऽके.
आणखी उपमा हव्या होत्या....
आणखी उपमा हव्या होत्या....
परीक्षित, डॉक, आनंदयात्री,
परीक्षित, डॉक, आनंदयात्री, नंद्या, दिनेशदा....सगळ्यांना धन्यवाद.
नंद्या, तुझ्या प्रतिसादाला सुद्धा उपमा नाही!
दिनेशदा, short is sweet. हो ना?
आपली ही कविता नुसती छान नव्हे
आपली ही कविता नुसती छान नव्हे खूप खूप छान आहे. खूपच आवडली!!!
आणखी कडवी हवी होती असे वाटणे हे त्या कवितेच्या दर्ज्याचेच लक्षण आहे. पुलेशू.
रुणु ,खुप सुंदर, मन मनच
रुणु ,खुप सुंदर, मन मनच असावे
अन्य नको त्या उपमा,
भावनांच्या सौंदर्याला
नसे कशाचीच तमा ! विशेष आवडले.
आवडली कविता!
आवडली कविता!
हबा, इतक्या कौतुकाबद्दल विशेष
हबा, इतक्या कौतुकाबद्दल विशेष धन्यवाद.
स्मिता, बित्तुबंगा आभार.
रुणू, अप्रतिमच...... येत राहू
रुणू, अप्रतिमच...... येत राहू देत.......
तुझ्या कविता म्हणजे गुलमोहराची एक एक फांदी हलवावी आणि अंगावर मस्त लाल फुलांचा सडा पडावा असच आहे....
असेच एक एक येत राहू दे....
सुंदरच! लालच सडा मस्त का बरे?
सुंदरच! लालच सडा मस्त का बरे? आम्ही काही शेकाप वाले नाही;
पांढरा, गुलाबी, निळा, जांभळा कोठलाही चालेल.
भावनांच्या सौंदर्याला नसे
भावनांच्या सौंदर्याला

नसे कशाचीच तमा !
"एक सौख्याने फुलली दुजी
"एक सौख्याने फुलली
दुजी दु:खाने बावरी !"
.... छान.
मन हे खरंच अथांग सागरासारखं आहे.
मन अथांग सागर त्यात भावना
मन अथांग सागर
त्यात भावना लहरी,
एक सौख्याने फुलली
दुजी दु:खाने बावरी !
रुणुझुणु,
मस्त मनाची कविता !
बहिणाबाईनी म्हणुन तर म्हंटलय ...

मन वढाय..वढाय
उभ्या पिकातलं ढोर ...
मस्त ( पहिलाच रिप्लाय )
मस्त
( पहिलाच रिप्लाय )
मन एक वटवृक्ष त्याच्या भावना
मन एक वटवृक्ष
त्याच्या भावना पारंब्या,
काही रुजल्या मातीत
काही अधांतरी उभ्या !
सही
सगळ्यांना धन्यवाद. तुम्हा
सगळ्यांना धन्यवाद. तुम्हा सगळ्यांकडून मिळणार्या प्रोत्साहनामुळे लिहिलेलं पोस्टायला हुरूप येतो.
( पण "अत्याचार" व्हायला लागले की सांगा हं नक्की ! )
भुंग्या, गुलमोहर अतिशय लाडका आहे माझा. त्याची उपमा दिलीस म्हणून मी दिलसे खुष !
दुसरे दोन कुठायत ? सर्वर तंदुरुस्त दिसतंय आज ! 
उमेश, शेकाप म्हणजे माबोवरचा आणखी एक शॉर्टफॉर्म काय ?:अओ:
चातक, चमचमणारं सौंदर्य मस्ताय !
झंडु,
अप्रतिम मन मनच असावे अन्य
अप्रतिम
मन मनच असावे
अन्य नको त्या उपमा,
भावनांच्या सौंदर्याला
नसे कशाचीच तमा ! >> छानच
सुन्दर...
सुन्दर...
http://merakuchhsaman.blogspot.com/
हे घे विडंबन
हे घे विडंबन
http://www.maayboli.com/node/22027
मन एक वटवृक्ष त्याच्या भावना
मन एक वटवृक्ष
त्याच्या भावना पारंब्या,
काही रुजल्या मातीत
काही अधांतरी उभ्या !
खुपच छान.....................
वर्षे...वाटच बघत होते. म्हटलं
वर्षे...वाटच बघत होते. म्हटलं अजून कसं नाही पडलं विडंबन
मूळ कवितेपेक्षा विडंबनच जास्त आवडलं....अगदी जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलास.
मेरा कुछ सामान (खरं नाव सांग ना.), कदम सर...धन्यवाद.
छानच आहे हे
छानच आहे हे
व्हेरी व्हेरी गुड !
व्हेरी व्हेरी गुड !
मस्तच!!
मस्तच!!
मन अथांग सागर त्यात भावना
मन अथांग सागर
त्यात भावना लहरी,
एक सौख्याने फुलली
दुजी दु:खाने बावरी !
मन एक वटवृक्ष
त्याच्या भावना पारंब्या,
काही रुजल्या मातीत
काही अधांतरी उभ्या !
ही दोन कडवी खूप आवडली.
अवल, शहाण्या माणसा, विजय,
अवल, शहाण्या माणसा, विजय, शैलजा.....ठयांकु !