Submitted by ह.बा. on 18 November, 2010 - 00:18
***************
मला माहिती ना तुला माहिती
कुणाच्या मनाला किनारे किती?
लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती
नका रसरसू रे फुलांनो तिथे
जिथे ओठ ओठास बोलाविती
मरण घेउनी जन्मतो जीव जर
जिवाला जिवाची कशाला भिती?
तुका, ज्ञानराजा मराठीच का?
कपाळास नाहीत भगव्या फिती!
- ह. बा.
****************
गुलमोहर:
शेअर करा
मरण घेउनी जन्मतो जीव
मरण घेउनी जन्मतो जीव जर
जिवाला जिवाची कशाला भिती?
उत्तम शेर....
एकूणच गझल भन्नाट जमलीये... अभिनंदन.
लुटावी कशी कोण सांगेल
लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती
>> हा शेर जास्त आवडला..
छान आहे. ते बो/ओ करत बसलाय्स
छान आहे.

ते बो/ओ करत बसलाय्स त्यामुळे अडखळायला होतंय. बिन्धास्त बो किंवा ओ काय ते एक गझलेत लिही आणि पर्यायी शेर खाली त्.टि. सारखा लिही. हे आपलं माझं मत
हणमंतराव........ अप्रतिम
हणमंतराव........ अप्रतिम रचना.......!!!!
क्या बात है..!!
गुरूजी, सुर्यकीरणजी, अश्विनी
गुरूजी, सुर्यकीरणजी, अश्विनी के जी, बुंग्याजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे!!!
अश्विनी के जी,
बदल केला आहे. धन्यवाद!
>>लुटावी कशी कोण सांगेल
>>लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती>> मस्त
जबर्दस्त गझल ह. बा. जी, सगळे
जबर्दस्त गझल ह. बा. जी,
सगळे शेर आवडले!! जिवाला जीव आणि शेवट्च्यासाठी विशेष अभिनंदन!!!
हबा, नका रसरसू रे फुलांनो
हबा,
नका रसरसू रे फुलांनो तिथे
जिथे ओठ ओठास ओलाविती
वरच्या ओळीतल्या आशयाला धरून "ओलावती" जास्त संयुक्तिक वाटते......
बिनधास्त ओलावती लिहावे असे वाटते आहे....... तेच जास्त योग्य वाटतेय.
मार्मिक गझल... आवडली...
मार्मिक गझल...
आवडली...
शैलजाजी, विजयजी,
शैलजाजी, विजयजी, आनंदयात्रीजी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे!!!
भुंगाजी,
आपण सुचविलेला बदल छान आहे. परंतू मी तो शेरच बदलण्याचा विचार करतो आहे. मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे.
खुप आवडली.
खुप आवडली.
<<मला माहिती ना तुला
<<मला माहिती ना तुला माहिती
कुणाच्या मनाला किनारे किती?>> मस्त !
आवडली.:)
उमेश कोठीकरजी,
उमेश कोठीकरजी, रुणुझुणूजी
thanks!!!!
हनमंतजी, वाह बहोत सुंदर...
हनमंतजी, वाह बहोत सुंदर...
छान आहे
छान आहे
विद्यानंदजी,
विद्यानंदजी, कविताजी,
Pratisadabaddal Aabhari aahe!!!!
सुंदरच. अप्रतिम.
सुंदरच. अप्रतिम.
लुटावी कशी कोण सांगेल
लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती
मरण घेउनी जन्मतो जीव जर
जिवाला जिवाची कशाला भिती?
अफाट शेर, अप्रतिम गझल, लुटावी कशी कोण सांगेल का! सुन्या काळजाची कपाटे रिती! अशा ओळी वाचल्याव्रर
काळ्जातले रितेपन भरुन येते.खुपच छान.
ए ह बा.. मस्तच रे..
ए ह बा.. मस्तच रे..
शोभा१२३जी, samyaknanaजी,
शोभा१२३जी, samyaknanaजी, Yo.Rocksजी,
Thank u very much!
मस्त गज़ल. मतला - मक्ता एकदम
मस्त गज़ल. मतला - मक्ता एकदम अप्रतीम !!! जियो !!!
ह. बा.
ह. बा. मस्तय......
छान...
सावरी
सह्ही
सह्ही
मस्तच.....
मस्तच.....
गिरीष, सावरी, अमित,
गिरीष, सावरी, अमित, ऱोहित
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
ह.बा. फार आवडली गझल. मला
ह.बा.
फार आवडली गझल.
मला माहिती ना तुला माहिती
कुणाच्या मनाला किनारे किती?
व्वा!
धन्यवाद अजयजी!!!!!
धन्यवाद अजयजी!!!!!
सुंदर गझल. किनारे आणि कपाटे
सुंदर गझल.
किनारे आणि कपाटे जाम आवडलेत.
क्या बात है! आवडली!
क्या बात है!
आवडली!
खूप छान
खूप छान
Pages